एक्स्प्लोर
Advertisement
विश्वविजेतेपदाचं स्वप्न अधुरं, जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत सिंधूचा पराभव
नोझोमी ओकुहाराने सिंधूवर 21-19, 20-22, 22-20 अशी मात केली.
ग्लॅस्गो : भारताच्या ऑलिम्पिक रौप्यविजेत्या पी. व्ही. सिंधूला जागतिक बॅडमिंटन विजेतेपद स्पर्धेतही अखेर रौप्यपदकावरच समाधान मानावं लागलं. जपानच्या नोझोमी ओकुहाराने उपांत्य फेरीत सायना नेहवाल आणि अंतिम फेरीत सिंधूचं आव्हान मोडीत काढून महिला एकेरीच्या सुवर्णपदकावर आपलं नाव कोरलं.
नोझोमी ओकुहाराने सिंधूवर 21-19, 20-22, 22-20 अशी मात केली. 2013 आणि 2014 सालच्या जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत सिंधूला कांस्यपदकावर समाधान मानावं लागलं होतं.
2016 सालच्या रिओ ऑलिम्पिकमध्ये ती महिला एकेरीच्या रौप्यपदकाची मानकरी ठरली होती. ग्लॅस्गोतल्या जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत महिला एकेरीचं सुवर्णपदक जिंकण्याचा सिंधूचा प्रयत्न असफल ठरला.
पीव्ही सिंधूचं विश्वविजेतेपदाचं स्वप्न हुकलं!
- जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या खात्यात, दोन रौप्य आणि चार कांस्य
- जपानच्या नोझोमी ओकुहाराकडून 21-19, 20-22, 22-20 ने मात
- प्रकाश पडुकोण यांची 1983 साली पुरुष एकेरीत कांस्यपदकाची कमाई
- ज्वाला गुट्टा आणि अश्विनी पोनप्पाला 2011 साली महिला दुहेरीचं कांस्यपदक
- सिंधूने 2013 आणि 2014 साली महिला एकेरीची कांस्यपदकं जिंकली
- सायना नेहवालला 2015 साली महिला एकेरीचं रौप्यपदक
- जागतिक बॅडमिंटन स्पर्धेच्या फायनलमध्ये धडक मारणारी सायना पहिली भारतीय
- पीव्ही सिंधूने 2017 साली रौप्य पदकावर नाव कोरलं
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
भारत
निवडणूक
निवडणूक
Advertisement