एक्स्प्लोर
केदार जाधवने 'ती' खंत बोलून दाखवली!

कोलकाता: महाराष्ट्राच्या केदार जाधवनं प्रयत्नांची शर्थ करूनही, टीम इंडियाला कोलकात्याच्या तिसऱ्या वन डेत पाच धावांनी चुटपूट लावणारा पराभव स्वीकारावा लागला. इंग्लंडनं हा सामना जिंकून तीन वन डे सामन्यांच्या मालिकेतलं भारताच्या विजयाचं अंतर 2-1 असं कमी केलं.
केदार जाधवनं 75 चेंडूंत 12 चौकार आणि एका षटकारासह 90 धावांची झुंजार खेळी उभारली. या मालिकेतील तडफदार खेळीबद्दल त्याला मालिकावीराचा पुरस्कार देण्यात आला.
मात्र केदारने आपल्या मनातील खंत बोलून दाखवली. मालिकावीराचा पुरस्कार मिळाला ठीक आहे, पण या पुरस्काराला विजयाचा टिळा लागला असता, तर आनंद झाला असता, असं केदार म्हणाला.
"शेवटचा सामना जिंकू शकलो नाही, याची खंत आहे.
मात्र माझ्या कामगिरीवर मी संतुष्ट आहे.
यापुढे आणखी चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न राहिल",
असं केदारने नमूद केलं.
या सामन्यात इंग्लंडनं भारताला विजयासाठी 322 धावांचं लक्ष्य दिलं होतं. अखेरच्या षटकांत भारताला विजयासाठी 16 धावा हव्या असताना, केदार जाधवनं पहिल्या दोन चेंडूंवर एक षटकार आणि एक चौकार ठोकून 10 धावा वसूल केल्या. पण पुढच्या दोन चेंडूवर त्याला एकही धाव मिळू शकली नाही. त्यामुळं पाचव्या चेंडूवर विजयी षटकार ठोकण्याच्या प्रयत्नात बाद झाला. डीप पॉइंटला सॅम बिलिंग्सनं त्याचा झेल पकडला. केदार जाधवनं 75 चेंडूंत 12 चौकार आणि एका षटकारासह 90 धावांची झुंजार खेळी उभारली. पण पुण्याच्या पहिल्या वन डेसारखं त्याच्या खेळीला विजयाचं सुख लाभलं नाही.अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बीड
बातम्या
पुणे
क्राईम
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
