एक्स्प्लोर
Advertisement
केदारने आमचे सर्व डावपेच धुळीस मिळवले : मॉर्गन
पुणे : इंग्लंडने टीम इंडियाला दबावातून बाहेर निघण्याची संधी दिलीच, शिवाय केदार जाधवच्या दमदार खेळीने सर्व डावपेच धुळीस मिळवले, असं इंग्लंडचा कर्णधार इयॉन मॉर्गनने म्हटलं आहे.
केदार जाधवने 76 चेंडूंचा सामना करत शानदार 120 धावा ठोकल्या. त्याने इंग्लंडने दिलेल्या 351 धावांच्या आव्हानाचा यशस्वी पाठलाग करताना कर्णधार विराट कोहलीसोबत 200 धावांची भागीदारी रचत इंग्लंडचा विजय हिसकावला.
भारताच्या 63 धावांवर 4 विकेट होत्या, पण केदारने मैदानात येताच फटकेबाजी सुरु केली. तो एवढा चांगला खेळेल याचा आम्ही विचारही केला नव्हता. कारण त्याच्यावर इंग्लंड संघाने पूर्ण होमवर्क केला होता. त्याच्या आंतरराष्ट्रीय सामन्यातील फलंदाजीचे व्हिडिओ पाहिले होते. तरीही सर्व योजना निकामी ठरल्या, असं मॉर्गन म्हणाला.
केदार उत्कृष्ट खेळाडू असून त्याने ते सिद्ध करुन दाखवलंय. शिवाय विराटनेही आमच्या योजना यशस्वी होऊ दिल्या नाही, असंही मॉर्गनने सांगितलं.
संबंधित बातम्या :
क्रॅम्पमुळे केदार कोसळला, मात्र त्याचवेळी ड्रेसिंगरुममधून मेेसेज आला!
कोहलीमुळेच मोठी इनिंग खेळू शकलो : केदार जाधव
केदारसोबतची भागीदारी विसरु शकणार नाही : कोहली
केदारचं शतक ही भारतीयाने वनडेत ठोकलेली पाचवी फास्टेस्ट सेंच्युरी
भारताकडून दुसऱ्यांदा 350 पेक्षा जास्त धावांचा यशस्वी पाठलाग
पुणे वन डेत विराटची सचिनच्या विक्रमाशी बरोबरी
पुण्यात ‘विराट’ सेनेपुढे सायबांवर संक्रांत, टीम इंडियाचा धमा’केदार’ विजय
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
नाशिक
निवडणूक
Advertisement