एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
भालाफेकपटू नीरज चोप्रा भारतीय सैन्यात दाखल!
नवी दिल्ली : ज्युनियर अॅथलेटिक्समधला भारताचा विश्वविक्रमी भालाफेकपटू नीरज चोप्राला भारतीय सैन्याने आपल्या सेवेत सामावून घेतलं आहे. नीरज ज्युनियर कमिशन्ड ऑफिसर म्हणून सेनादलाच्या सेवेत दाखल झाला आहे.
सेनादलाच्या सेवेत रुजू झाल्यामुळे आता आपल्याला कामगिरी आणि कुटुंबीयांवरही लक्ष केंद्रीत करता येईल, असं नीरज चोप्राने म्हटलं आहे.
गेल्या वर्षी पोलंडमध्ये झालेल्या वीस वर्षांखालील वयोगटाच्या जागतिक ज्युनियर अॅथलेटिक्स स्पर्धेत नीरज चोप्राने 86.48 मीटर्स अंतरावर भालाफेक करुन नव्या विश्वविक्रमाची नोंद केली होती.
विशेष म्हणजे रिओ ऑलिम्पिकमधल्या कांस्यपदक विजेत्या खेळाडूच्या 85.38 मीटर्स या कामगिरीपेक्षा नीरजची कामगिरी सरस आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
क्रिकेट
भारत
राजकारण
Advertisement