Shane Warne : शेन वॉर्नला राजस्थानचा संघ देणार श्रद्धांजली, मुंबईविरोधात नव्या जर्सीमध्ये उतरणार
Memory of Shane Warne : शेन वॉर्न(Shane Warne) यांचं 4 मार्च, 2022 रोजी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं होतं. शेन वॉर्न यांना राजस्थान संघ अनोखी श्रद्धांजली देणार आहे.
Memory of Shane Warne : आयपीएलमधील 44 व्या सामन्यात 30 एप्रिल रोजी राजस्थान आणि मुंबई यांच्यामध्ये सामना होणार आहे. या सामन्यात राजस्थानचा संघ आपल्या पहिल्या कर्णधाराला अनोखी श्रद्धांजली देणार आहे. ऑस्ट्रेलियाचा दिग्गज फिरकीपटू शेन वॉर्न यांनी 2008 मध्ये राजस्थान संघाचे नेतृत्व केले होते. शेन वॉर्न(Shane Warne) यांचं 4 मार्च, 2022 रोजी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं होतं. शेन वॉर्न यांना राजस्थान संघ अनोखी श्रद्धांजली देणार आहे.
मुंबईविरोधात राजस्थानचा संघ नव्या जर्सीमध्ये मैदानात उतरणार आहे. नव्या जर्सीचा फोटोही राजस्थानने सोशल मीडियावर पोस्ट केलाय. इतकेच नाही तर राजस्थान संघाने शेन वॉर्न यांच्या भावालाही आमंत्रित केले आहे. शेन वॉर्न यांचा भाऊ जेसन मुंबईमध्ये आल्याचे राज्यस्थान रॉयल्सने सांगितलेय. डी वाय पाटील स्टेडिअममध्ये होणाऱ्या कार्यक्रमात ते सहभागी होणार आहेत.
A special jersey, to honour a special man. #ForWarnie 💗#RoyalsFamily | #RRvMI pic.twitter.com/fE3WApOHIz
— Rajasthan Royals (@rajasthanroyals) April 29, 2022
आयपीएल स्पर्धेचं सर्वात पहिलं जेतेपद शेन यांच्या कर्णधारपदाखाली राजस्थान रॉयल्स (Rajsthan Royals) संघाने उंचावलं होतं. त्यामुळे शेन यांना खास श्रद्धांजली देण्याचा निर्णय राजस्थान संघाने घेतला. त्यामुळे त्यांच्या आगामी मुंबई इंडियन्स (RR vs MI) विरोधात होणाऱ्या 30 एप्रिल रोजीच्या सामन्यात हा श्रद्धांजलीचा कार्यक्रम पार पडणार आहे. यावेळी राजस्थानचे खेळाडू नव्या जर्सीवर उतरणार आहेत. S23 कॉलरवर लिहिलेली जर्सी घालणार आहेत. नवी मुंबईच्या डी.वाय. पाटील (DY Patil Stadium) मैदानात शेन वॉर्नच्या आठवणींची खास गॅलरी देखील तयार केली जाणार आहे. यावेळी सामना पाहण्यासाठी आलेल्या प्रेक्षकांना ही गॅलरी पाहता येणार आहे. विशेष म्हणजे शेन यांनी जिंकलेला पहिला-वहिला आयपीएलचा खिताब नवी मुंबईच्या डी.वाय. पाटील मैदानातच जिंकला होता. त्याचठिकाणी त्यांना श्रद्धांजली दिली जाणार आहे.
Celebrating Warnie at our team hotel, made possible with our friends at @GrandHyattMum. 💗#ForWarnie | #RoyalsFamily pic.twitter.com/kRkLyUBxmL
— Rajasthan Royals (@rajasthanroyals) April 29, 2022
शेन वॉर्न यांची कारकीर्द
जगातील अव्वल दर्जाचा फिरकीपटू तसंच एक दिग्गज कर्णधार अशी शेन वॉर्न यांची ख्याती होती. ऑस्ट्रेलियाकडून अनेक वर्ष क्रिकेट खेळलेला वॉर्न क्रिकेट जगतात बहुतेक सर्वांना माहित आहे. वॉर्न यांनी 145 कसोटी सामन्यात 708 विकेट्स घेतल्या आहेत. तर 194 एकदिवसीय सामन्यात 293 गड्यांना माघारी धाडलं आहे. याशिवाय 55 आयपीएल सामन्यात वॉर्नने 57 विकेट मिळवल्या आहेत. मुरलीधरननंतर वॉर्न हा दुसरा गोलंदाज आहे ज्याने 708 विकेट घेतल्या आहेत. 2007 साली वॉर्ननं क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. वॉर्ननं क्रिकेटमधील प्रत्येक फॉर्मेटमध्ये आपली छाप सोडली आहे.