(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Team India : ऑस्ट्रेलियात भारताचा वेगवान गोलंदाज हातोडा हाती घेत पिच दुरुस्त करु लागला, मुकेश कुमारचा व्हिडीओ व्हायरल
IND A vs AUS A: भारत अ टीमचा वेगवान गोलंदाज मुकेश कुमार पिच दुरुस्ती करत असताना पाहायला मिळाला. मुकेश कुमारनं हातोडा हाती घेत खेळपट्टी दुरुस्ती करत होता.
Mukesh Kumar Viral Video सिडनी: भारत अ आणि ऑस्ट्रेलिया अ यांच्यातील 4 दिवसांचा कसोटी सामना खेळवला जात आहे. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा ऑस्ट्रेलिया अ या संघानं 3 विकेट वर 139 धावा केल्या. ऑस्ट्रेलिया अ ला विजयासाठी 86 धावांची गरज आहे. तर भारत अ संघाला 7 विकेटची आवश्यकता आहे. ऋतुराज गायकवाडच्या भारत अ संघाला विजय मिळवण्यात यश येणार का याकडे लक्ष लागलं आहे. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर मैदानवर जे घलडलं त्याची जोरदार चर्चा सुरु आहे. भारत अ संघाचा वेगवान गोलंदाज मुकेश कुमार खेळपट्टी दुरुस्त करताना पाहायला मिळाला. मुकेश कुमार सोबत ग्राऊंड स्टाफ उपस्थित होता.
सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
सोशल मीडियावर मुकेशकुमारचा व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियानं त्यांच्या अधिकृत सोशल मिडिया हँडलवर व्हिडीओ शेअर केला आहे. क्रिकेट चाहत्यांना मुकेश कुमारचा हा अंदाज आवडला आहे. नेटकरी मुकेश कुमारच्या व्हिडीओवर प्रतिक्रिया देत आहे.
मुकेश कुमारनं या मॅचमध्ये शानदार गोलंदाजी केली आहे. मुकेश कुमारनं पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाच्या 6 विकेट घेतल्या. दुसऱ्या डावात त्यानं सॅम कॉन्सटेटची विकेट घेतली.
ऑस्ट्रेलियानं टॉस जिंकत पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारत अ पहिल्या डावात 107 धावा करता आल्या. ऑस्ट्रेलिया अ संघानं 195 धावा केल्या. भारत अ संघानं दुसऱ्या डावात 312 धावा केल्या. तिसऱ्या दिवस अखेर ऑस्ट्रेलिया अ संघानं 3 बाद 139 धावा केल्या. आता ऑस्ट्रेलिया अ संघाला 86 धावांची गरज आहे.
Anything goes in Mackay! 😆😆😆#AUSAvINDA pic.twitter.com/S4eV5LjXCK
— cricket.com.au (@cricketcomau) November 2, 2024
इतर बातम्या :