PCB News : 'माझं शोषण, व्हिडीओच्या माध्यमातून ब्लॅकमेलही करायचा', पाकिस्तान महिला क्रिकेटरचा कोचवर खळबळजनक आरोप
Pakistan Cricket Board : पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने या आरोपानंतर संबधित कोचला निलंबित केलं आहे.
Pakistan Cricket Board Coach : पाकिस्तान क्रिकेट बोर्डाकडे (Pakistan Cricket Board) महिला क्रिकेटरने कोचवर केलेल्या विनयभंगाच्या आरोपानंतर राष्ट्रीय स्तराच्या एका कोचला निलंबित करण्यात आलं आहे. महिला क्रिकेटरने मुल्तान क्षेत्रातील कोच नदीम इकबाल (Nadeem Iqbal) यांच्यावर छेड काढल्याचा आरोप केला. ज्यानंतर ही निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान नदीम हा त्याच्या काळातील एक आघाडीचा वेगवान गोलंदाज होता. त्यावेळी त्याची तुलना महान गोलंदाज वकार युनूस यांच्याशी केली जात होती. पण आता नदीम याच निलंबन करण्यात आलं आहे. 50 वर्षीय नदीमने 80 प्रथम श्रेणी सामने खेळले आहेत.
दरम्यान या संपूर्ण प्रकरणाबाबद पीसीबीचे एक अधिकारी यांनी माहिती देताना ते म्हणाले की, ' सर्व प्रकरणाची चौकशी सुरु असून नदीमने नियमांचे उल्लंघन केले आहे. आमच्या चौकशीतून नेमकं प्रकरण काय होईल हे बऱ्यापैकी स्पष्ट होईल. पण सध्यातरी त्याने नियमांचे उल्लंघन केल्याचे दिसत आहे.’ एकेकाळी त्याची तुलना महान गोलंदाज वकार युनूसशी केली जायची. पण आता
'माझं शोषण करुन व्हिडीओच्या मदतीने ब्लॅकमेल करायचा'
दरम्यान पीडित महिला क्रिकेटरने पोलिसांना दिलेल्या माहितीत सांगितलं की,'काही वर्षांपूर्वी मुल्तानमध्ये पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचं महिला ट्रायल सुरु असताना नदीम तिथे कोच म्हणून उपस्थित होते. त्यावेळी मला संघात सामिल करुन घेण्याचं आमिष देत माझ्या जवळ आला आणि माझं शोषण केलं. त्याने माझा व्हिडीओही केला होता. ज्याच्या वापराने नंतर मला ब्लॅकमेल करायचा. ’’
हे देखील वाचा-