Dinesh karthik : दिनेशच्या तुफान फॉर्ममागचं नक्की कारण काय? कार्तिकने स्वत:च केला उलगडा
IND vs SA : आधी आयपीएल गाजवल्यानंतर आता आंतरराष्ट्रीय सामन्यातही तुफान खेळी करणाऱ्या दिनेश कार्तिकच्या या यशामागील कारण काय? हे स्वत:च त्याने सांगितलं आहे.
![Dinesh karthik : दिनेशच्या तुफान फॉर्ममागचं नक्की कारण काय? कार्तिकने स्वत:च केला उलगडा Dinesh karthik says he wanted desperately to be in for world cup team this is the main reason behind hes Form Dinesh karthik : दिनेशच्या तुफान फॉर्ममागचं नक्की कारण काय? कार्तिकने स्वत:च केला उलगडा](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/06/17/a47c55bed5a0ddaacc543025c1d9e79a_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Dinesh Karthik in Form : भारताचा अनुभवी फलंदाज दिनेश कार्तिकने मागील काही काळापासून दमदार फॉर्म दाखवत आधी भारतीय संघात स्थान मिळवलं असून आता विश्वचषकासाठीही जवळपास त्याची निवड पक्की होऊ शकते, असं दिसत आहे. या फॉर्ममागील कारण स्वत: दिनेशने सांगतिलं आहे. मला काहीही करुन विश्वचषक खेळायचा होता, हेच माझ्या फॉर्ममागील कारण असल्याचं दिनेशने म्हटलं आहे. सामन्यानंतर हार्दिक पांड्यासोबत बातचीत करताना दिनेशने हे म्हटलं आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर बराच व्हायरल होत आहे.
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना भारताने तब्बल 82 धावांनी जिंकत मालिकेत बरोबरी साधली आहे. यावेळी सामन्याचा सामनावीर ठरला तो दिनेश कार्तिक. कार्तिकने मोक्याच्या क्षणी अर्धशतक झळकावलं. दरम्यान आय़पीएलमध्येही त्याने तुफान स्ट्राईक रेटने धावा केल्या होत्या. कालही त्याने असाच स्ट्राईक रेट कायम ठेवला. दरम्यान दिनेशच्या या कामगिरीमागील गुपित नक्की काय? असा प्रश्न हार्दिकने सामन्यानंतर दिनेशला विचारला. यावेळी त्याने उत्तर देताना दिनेश म्हणाला, ''मला यंदाचा विश्वचषक खेळाचाच या जिद्दीने मैदानात उतरत आहे. माझ्यासाठी विश्वचषक खेळणं फार महत्त्वाचं आहे. मी इतक्या वर्षे खेळत आहे त्यामुळे संघातून ड्रॉप होणं काय असतं मला माहीत आहे. भारतासाठी खेळणं किती अनमोल आहे मला माहीत आहे.''
In-flight insightful conversation 👌
— BCCI (@BCCI) June 18, 2022
Learning from the great @msdhoni 👍
Being an inspiration 👏
DO NOT MISS as @hardikpandya7 & @DineshKarthik chat after #TeamIndia's win in Rajkot. 😎 😎 - By @28anand
Full interview 📽️👇 #INDvSA | @Paytmhttps://t.co/R6sPJK68Gy pic.twitter.com/wx1o9dOPNB
दिनेशचं टी20 मधील पहिलं-वहिलं अर्धशतक
हे देखील वाचा-
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)