National Games of India 2022: वेटलिफ्टिंग स्पर्धेत महाराष्ट्राच्या कोमल वाकळेनं सुवर्णपदक जिंकलं!
National Games of India 2022: गुजरात (Gujarat) येथे झालेल्या 36 व्या नॅशनल गेम्समध्ये वेटलिफ्टिंग स्पर्धेत (Weightlifting Game) महाराष्ट्राच्या (Maharashtra) अहमदनगर (Ahmednagar) जिल्ह्यातील कोमल वाकळे (Komal Wakale) हिला सुवर्णपदक मिळालंय.
National Games of India 2022: गुजरात (Gujarat) येथे झालेल्या 36 व्या नॅशनल गेम्समध्ये वेटलिफ्टिंग स्पर्धेत (Weightlifting Game) महाराष्ट्राच्या (Maharashtra) अहमदनगर (Ahmednagar) जिल्ह्यातील कोमल वाकळे (Komal Wakale) हिला सुवर्णपदक मिळालंय. वेटलिफ्टिंग स्पर्धेमध्ये 87 किलो वजनगटात कोमलनं महाराष्ट्र संघाकडून खेळताना सुवर्णपदक मिळवलंय. कोमलनं एकूण 210 किलो वजन उचलून सुवर्णपदकावर नाव कोरलंय. कोमलच्या सुवर्ण कामगिरीनंतर तिच्यावर अहमदनगरसह संपूर्ण महाराष्ट्रातून कौतूकाचा वर्षाव होत आहे.
भारतात प्रतिष्ठीत असणाऱ्या या स्पर्धेत एकूण 36 क्रीडा प्रकारांत देशभरातील सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांचे संघ सहभागी झालेत. ही स्पर्धा 7 वर्षांनंतर गुजरात येथे झालीये. या आधीची स्पर्धा 2015 मध्ये केरळला झाली होती. कोमल वाकळे हिनं 36 व्या नॅशनल गेम्स वेटलिफ्टिंग स्पर्धेत सुवर्णपदक मिळविल्याबद्दल तिचं सर्वत्र अभिनंदन होत आहे. कोमलनं या अगोदरही अनेक राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धांमध्ये पदकं मिळवली आहेत. यापुढं देशसाठी खेळण्याचं स्वप्न असल्याचं कोमलनं सांगितलं आहे.
ट्वीट-
Congratulations to the Medallists of the Women's 87kg Weightlifting event
— National Games Gujarat (@Nat_Games_Guj) October 3, 2022
Komal Wakale (Maharashtra)🥇
BN Usha (Karnataka)🥈
T. Satya Jyothi (Andhra Pradesh)🥉#36thNationalGames #NationalGames #UnityThroughSports #JudegaIndiaJitegaIndia #NationalGamesGujarat #NationalGames2022 pic.twitter.com/xwE5x6WqPy
पुरुषांच्या दहा मीटर एअर रायफलमध्ये महाराष्ट्राच्या रुद्रांक्ष पाटीलचा सुवर्णवेध
ज्युनियर वर्ल्ड चॅम्पियन नेमबाज रुद्रांक्ष पाटीलने शुक्रवारी (30 सप्टेंबर) 36 व्या राष्ट्रीय स्पर्धेमध्ये (36th National Games 2022) सुवर्णपदकाचा (Gold Medal) वेध घेतला. त्याने पुरुषांच्या दहा मीटर एअर रायफल गटामध्ये चॅम्पियन होण्याचा बहुमान पटकावला आहे. यासह त्याने महाराष्ट्र संघाला सुवर्णपदकाचे खाते उघडून दिले. ठाण्याच्या आंतरराष्ट्रीय नेमबाज रुद्रांक्षने फायनलमध्ये अचूक नेम धरत 17 गुणांची कमाई केली. यासह किताबाचा मानकरी ठरला.
परळीच्या मराठमोळ्या श्रद्धा गायकवाडची सुवर्णपदकाला गवसणी
गुजरातमध्ये पार पडणाऱ्या 36 व्या नॅशनल गेम्स अर्थात राष्ट्रीय खेळ स्पर्धा 2022 मध्ये बीडच्या परळी येथील श्रद्धा गायकवाडने सुवर्णपदकावर नाव कोरलं आहे. स्केट बोर्डिंग क्रिकेट प्रकारात तिने केलेल्या या कामगिरीमुळे फ्रान्समध्ये होणाऱ्या आगामी ऑलिम्पिकसाठी भारतीय संघातही तिची निवड झाली आहे. या निवडीबद्दल तिचे सर्व स्तरातून अभिनंदन होत असून परळीसह अवघ्या महाराष्ट्रसाठी ही एक अभिमानाची गोष्ट आहे.
हे देखील वाचा-