एक्स्प्लोर

Mohammed Shami Ind vs Eng : मोहम्मद शमीचे पुनरागमन तरी BCCI टेन्शनमध्ये! तिसऱ्या टी-20 नेमकं काय घडलं? जाणून घ्या सर्वकाही

Ind Vs Eng Rajkot T20 : इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या टी-20 सामन्यात टीम इंडियाला 26 धावांनी पराभव स्वीकारावा लागला.

Mohammed Shami Wicketless On His Comeback : इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या टी-20 सामन्यात टीम इंडियाला 26 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. या टी-20 सामन्यात, नाणेफेक जिंकल्यानंतर टीम इंडियाचा कर्णधार सूर्यकुमार यादवने प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल केल्याबद्दल सांगितले, जे ऐकून भारतीय चाहते आनंदाने उड्या मारू लागले. हा बदल म्हणजे वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगच्या जागी मोहम्मद शमीचे संघात पुनरागमन केले. मोहम्मद शमीला 14 महिन्यांनी टीम इंडियात परतण्याची संधी मिळाली आणि भारतीय चाहत्यांना आशा होती की शमी याच्या जुन्या फॉर्ममध्ये दिसेल. पण असं काहीही झालं नाही.

शमीची निराशाजनक कामगिरी

इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या टी-20 सामन्यात टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीचे पुनरागमन खूपच निराशाजनक होते. शमीने या संपूर्ण सामन्यात 3 षटके टाकली, ज्यामध्ये त्याने 25 धावा दिल्या पण एकही विकेट घेऊ शकला नाही. सामन्यादरम्यान शमीची जुनी धारही गायब होती.

चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी शमीला मिळवावा लागणार फॉर्म

टीम इंडियाला येत्या महिन्यात म्हणजेच फेब्रुवारीमध्ये आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये सहभागी व्हायचे आहे. जर या स्पर्धेत शमीची अवस्था अशीच राहिली, तर टीम इंडियासाठी किंवा भारतीय चाहत्यांसाठी ही बातमी चांगले नसेल. संघ निवडकर्त्यांपासून ते चाहत्यांपर्यंत सर्वांनाच शमीच्या पुनरागमनाची खूप आशा होती की, जेव्हा तो इतक्या महिन्यांनंतर गोलंदाजी करण्यासाठी मैदानात येईल तेव्हा विरोधी संघाला धक्का बसेल.

पण मैदानावर असे काहीही घडताना दिसले नाही. उलट, इंग्लंडच्या खेळाडूंनी शमीला चांगलाच धुतला. त्यामुळे शमी इंग्लिश फलंदाजांसमोर खूपच असहाय्य दिसत होता. चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी निवडलेल्या खेळाडूंच्या यादीत शमीचे नाव आहे. त्यामुळे मोहम्मद शमीला इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत त्याची गोलंदाजीची ताकद सिद्ध करावी लागेल अन्यथा त्याला संघाच्या प्लेइंग इलेव्हनमधून वगळले जाऊ शकते.

राजकोटमध्ये टीम इंडियाचा 26 धावांनी पराभव

सलग दोन विजयांनंतर इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या टी-20 सामन्यात टीम इंडियाला 26 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. आता चौथ्या टी-20 सामन्यात टीम इंडिया शानदार पुनरागमन करेल आणि एमसीएवर शानदार विजय मिळवून मालिका जिंकेल अशी अपेक्षा आहे.

हे ही वाचा -

Geoff Allardice Steps Down as ICC CEO : चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी ICCमध्ये मोठी उलथापालथ, CEO ने अचानक दिला राजीनामा, कोणाच्या दबावाखाली घेतला निर्णय?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ajit Pawar : फोटोसाठी मोठी गर्दी, अजितदादांनी थेट संचालकांना ढकललं मागं; बारामतीत नेमकं काय घडलं?
फोटोसाठी मोठी गर्दी, अजितदादांनी थेट संचालकांना ढकललं मागं; बारामतीत नेमकं काय घडलं?
Dhule News : अवघ्या दोन गुणांनी हुकली आर्मीत भरती होण्याची संधी, उच्च शिक्षित तरुणानं उचललं टोकाचं पाऊल; धुळ्यात हळहळ
अवघ्या दोन गुणांनी हुकली आर्मीत भरती होण्याची संधी, उच्च शिक्षित तरुणानं उचललं टोकाचं पाऊल; धुळ्यात हळहळ
Sanjay Raut on Disha Salian Case : दिशाच्या वडिलांनी मुलीच्या मृत्यूआडून राजकारण करू नये, संजय राऊत कडाडले; आदित्य ठाकरेंचं नाव घेत म्हणाले...
दिशाच्या वडिलांनी मुलीच्या मृत्यूआडून राजकारण करू नये, संजय राऊत कडाडले; आदित्य ठाकरेंचं नाव घेत म्हणाले...
पार्टीत पंजाबी गाणं मोठ्यानं लावलं, गर्लफ्रेंड म्हणाली, आवाज कमी कर अन् वाद वाढला; बॉयफ्रेंडला आला राग, थेट डोळ्यात गोळी घातली
पार्टीत पंजाबी गाणं मोठ्यानं लावलं, गर्लफ्रेंड म्हणाली, आवाज कमी कर अन् वाद वाढला; बॉयफ्रेंडला आला राग, थेट डोळ्यात गोळी घातली
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 12 PM TOP Headlines 12 AM 28 March 2025ABP Majha Marathi News Headlines 11 AM TOP Headlines 11AM 28 March 2025Disha Salian case : वडिलांच्या अफेअरने त्रस्त, दिशा सालियनने आर्थिक तणावातून जीवन संपवलं, नवीन माहिती समोरABP Majha Marathi News Headlines 10 AM TOP Headlines 10 AM 28 March 2025

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ajit Pawar : फोटोसाठी मोठी गर्दी, अजितदादांनी थेट संचालकांना ढकललं मागं; बारामतीत नेमकं काय घडलं?
फोटोसाठी मोठी गर्दी, अजितदादांनी थेट संचालकांना ढकललं मागं; बारामतीत नेमकं काय घडलं?
Dhule News : अवघ्या दोन गुणांनी हुकली आर्मीत भरती होण्याची संधी, उच्च शिक्षित तरुणानं उचललं टोकाचं पाऊल; धुळ्यात हळहळ
अवघ्या दोन गुणांनी हुकली आर्मीत भरती होण्याची संधी, उच्च शिक्षित तरुणानं उचललं टोकाचं पाऊल; धुळ्यात हळहळ
Sanjay Raut on Disha Salian Case : दिशाच्या वडिलांनी मुलीच्या मृत्यूआडून राजकारण करू नये, संजय राऊत कडाडले; आदित्य ठाकरेंचं नाव घेत म्हणाले...
दिशाच्या वडिलांनी मुलीच्या मृत्यूआडून राजकारण करू नये, संजय राऊत कडाडले; आदित्य ठाकरेंचं नाव घेत म्हणाले...
पार्टीत पंजाबी गाणं मोठ्यानं लावलं, गर्लफ्रेंड म्हणाली, आवाज कमी कर अन् वाद वाढला; बॉयफ्रेंडला आला राग, थेट डोळ्यात गोळी घातली
पार्टीत पंजाबी गाणं मोठ्यानं लावलं, गर्लफ्रेंड म्हणाली, आवाज कमी कर अन् वाद वाढला; बॉयफ्रेंडला आला राग, थेट डोळ्यात गोळी घातली
अभियंत्याच्या घरावर छापा, नोटा मापण्यासाठी चार मशिन आणली, आठ तास फक्त बंडलांची मोजणी; कंत्राटदारांच्या निविदा काढण्यात मदत करत असल्याचा आरोप
अभियंत्याच्या घरावर छापा, नोटा मापण्यासाठी चार मशिन आणली, आठ तास फक्त बंडलांची मोजणी; कंत्राटदारांच्या निविदा काढण्यात मदत करत असल्याचा आरोप
Dhananjay Munde & Chhagan Bhujbal : धनंजय मुंडेंना अजितदादांनी चार हात लांबच ठेवलं, छगन भुजबळांपासूनही अंतर राखलं; विधिमंडळ समित्यांच्या नियुक्तीवरून चर्चांना उधाण
धनंजय मुंडेंना अजितदादांनी चार हात लांबच ठेवलं, छगन भुजबळांपासूनही अंतर राखलं; विधिमंडळ समित्यांच्या नियुक्तीवरून चर्चांना उधाण
IPL 2025 SRH Vs LSG: केशरी कळी खुललीच नाही, बिचारी काव्या मारन शेवटपर्यंत रडवेल्या चेहऱ्याने बसून राहिली; लखनऊने हैदराबादला लोळवलं
केशरी कळी खुललीच नाही, बिचारी काव्या मारन शेवटपर्यंत रडवेल्या चेहऱ्याने बसून राहिली; लखनऊने हैदराबादला लोळवलं
Santosh Deshmukh Case: संतोष देशमुखांना अमानुष मारहाण करतानाचे 15 व्हिडीओ अखेर समोर आले, त्या व्हिडिओमध्ये नेमकं काय?
संतोष देशमुखांना अमानुष मारहाण करतानाचे 15 व्हिडीओ अखेर समोर आले, त्या व्हिडिओमध्ये नेमकं काय?
Embed widget