IND vs ZIM : रवि बिश्नोई अन् वॉशिंग्टन सुंदरपुढं झिम्बॉब्वेचा डाव गडगडला, भारतापुढं किती धावांचं आव्हान?
IND vs ZIM :टीम इंडियाचा कॅप्टन शुभमन गिलनं टॉस जिंकून पहिल्यांदा गोलंदाचीचा निर्णय घेतला होता. रवि बिश्नोई अन् वॉशिंग्टन सुंदरनं सहा विकेट घेतल्या.
IND vs ZIM हरारे : टीम इंडियाचा युवा कॅप्टन शुभमन गिलनं झिम्बॉब्वे विरुद्ध टॉस जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा घेतलेला निर्णय फिरकीपटूंनी सार्थ ठरवला घेतला. रवि बिश्नोईनं चार विकेट घेतल्या तर वॉशिंग्टन सुंदरनं दोन विकेट घेतल्या. वेस्ली मधेवेरे, ब्रायन बेनेट्ट, मैडेंडे आणि डायोन मायर्स यांच्या फलंदाजीमुळं झिम्बॉब्वेला समाधानकारक धावसंख्या गाठता आली. झिम्बॉब्वेनं भारताविरोधात 20 ओव्हरमध्ये 9 विकेटवर 115 धावा केल्या. भारताला विजयासाठी 116 धावांची गरज आहे.
कॅप्टन शुभमन गिलनं टॉस जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. तत्पूर्वी अभिषेक शर्मा, रियान पराग आणि ध्रुव जुरेल या तिघांना भारतीय संघात स्थान दिल्याचं त्यानं सांगितलं.
फिरकीपटूंपुढं झिम्बॉब्वेची फलंदाजी ढेपाळली
मुकेश कुमारनं झिम्बॉब्वेला पहिला धक्का कैय्याच्या रुपात दिला होता. त्यानंतर वेस्ली मधेवेरे आणि ब्रायन बेनेट्ट या दोघांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला. या दोघांची भागिदारी रवि बिश्नोईनं तोडली. बिश्नोईनं ब्रायन बेनेटला 22 धावांवर बाद केलं. यानंतर वेस्ली मधेवेरे 21 धावांवर बिश्नोईनंच बाद केलं.ल्यूक जोंगवे आणिब्लेसिंग मुजरबानी या दोघांना देखील रवि बिश्नोईनं बाद केलं. तर, वॉशिंग्टन सुंदरनं डायोन मायर्सला 23 धावांवर बाद केलं. रवि बिश्नोईनं 4 तर वॉशिंग्टनं सुंदरनं 2 विकेट घेतल्या. आवेश खनला सिकंदर रझा याची महत्त्वाची विकेट मिळाली.
क्लाइव मैडेंडे यानं 29 धावा करत अखेरीस झिम्बॉब्वेचा डाव सावरत संघाला 100 धावांचा टप्पा पार करुन दिला. झिम्बॉब्वेनं 20 ओव्हरमध्ये 9 विकेटवर 115 धावा केल्या. भारताला विजयासाठी 116 धावांची गरज आहे.
अभिषेक शर्मा, रियान पराग अन् ध्रुव जुरेलचं पदार्पण
भारत आणि झिम्बॉब्वे यांच्यातील 5 सामन्यांच्या टी 20 मालिकेत युवा खेळाडू अभिषेक शर्मा, रियान पराग अन् ध्रुव जुरेलनं पदार्पण केलं आहे. ध्रुव जुरेलनं यापूर्वी भारताच्या कसोटी संघात पदार्पण केलं होतं.
भारताची प्लेईंग इलेव्हन : शुभमन गिल (कॅप्टन), अभिषेक शर्मा, ऋतुराज गायकवाड, रियान पराग, रिंकू सिंग, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), वॉशिंगटन सुंदर, रवि बिश्नोई, आवेश खान, मुकेश कुमार, खलील अहमद
झिम्बॉब्वेची प्लेईंग इलेव्हन : इनोसेंट कैया, ब्रायन बेनेट, सिकंदर रझा (कॅप्टन), डायोन मायर्स, जॉनाथन कैंपबेल, वेलिंग्टनं मस्कदझा, क्लाइव मैडेंडे (विकेटकीपर), वेस्ली मधेवेरे, ल्यूक जोंगवे, ब्लेसिंग मुजरबानी, तेंडाई चटारा,
संंबंधित बातम्या :