IND vs ZIM 1st T20: झिम्बाब्वेविरुद्ध आज तिसऱ्या क्रमांकावर कोण फलंदाजी करणार?; कर्णधार शुभमन गिलने सांगितलं नाव
IND vs ZIM 1st T20: टी-20 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात विराट कोहलीने आंतरराष्ट्रीय टी-20 फॉरमॅटमधून निवृत्ती जाहीर केली.
IND vs ZIM 1st T20: भारत आणि झिम्बाब्वे (India vs Zimbabwe) यांच्यात 5 सामन्यांची टी-20 मालिका खेळण्यात येणार आहे. आजपासून या मालिकेला सुरुवात होणार असून भारतीय वेळेनूसार सायंकाळी 4.30 वाजता या सामन्याला सुरुवात होईल. भारतीय संघाचे नेतृत्व शुभमन गिल, तर झिम्बाब्वे संघाच नेतृत्व सिकंदर राजा करणार आहे. टी-20 च्या जागतिक क्रमवारीत भारतीय संघ अव्वल स्थानावर आहे. टी-20 विश्वचषक पटकवल्यानंतर प्रथमच भारतीय संघ झिम्बाब्वेविरुद्ध खेळण्यास उतरणार आहे.
टी-20 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात विराट कोहलीने आंतरराष्ट्रीय टी-20 फॉरमॅटमधून निवृत्ती जाहीर केली. त्यामुळे विराट कोहलीच्या तिसऱ्या क्रमांकावर कोण खेळणार, त्याची जागा कोण घेणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. याचदरम्यान झिम्बाब्वे दौऱ्यासाठी कर्णधाराची भूमिका बजावणाऱ्या शुभमन गिलने याबाबत माहिती दिली आहे. झिम्बाब्वेविरुद्धच्या पहिल्या टी-20 सामन्यात ऋतुराज गायकवाड तिसऱ्या क्रमांकावर खेळणार असल्याची माहिती शुभमन गिलने दिली.
Shubman Gill confirms Ruturaj Gaikwad will bat at No.3 in the 1st T20i against Zimbabwe. pic.twitter.com/UAH35zyQ58
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) July 6, 2024
भारत विरुद्ध झिम्बाब्वे, आकडेवारी काय सांगते?
झिम्बाब्वेने टी-20 फॉरमॅटमध्ये भारतीय संघाला कडवी झुंज दिल्याचे आकडेवारीवरून दिसून येते. झिम्बाब्वेने गेल्या 5 टी-20 सामन्यांमध्ये भारताला कडवी टक्कर दिली आहे. झिम्बाब्वेने भारताला दोनदा पराभूत केले आहे, तर भारतीय संघाने तीन वेळा विजय मिळवला आहे. त्याचवेळी, आत्तापर्यंत भारत आणि झिम्बाब्वे 8 वेळा टी-20 फॉरमॅटमध्ये आमनेसामने आले आहेत, ज्यामध्ये टीम इंडियाने 6 वेळा विजय मिळवला आहे. तर झिम्बाब्वेने भारताला दोनदा पराभूत केले आहे.
भारत आणि झिम्बाब्वे यांच्यातील टी-20 फॉरमॅटमध्ये हेड टू हेड...
भारत आणि झिम्बाब्वे यांच्यात हरारे येथे एकूण 8 टी-20 सामने झाले आहेत. 2010 मध्ये या मैदानावर भारत पहिल्यांदा T-20 खेळला असेल. हरारे स्पोर्ट्स क्लब सॅलिसबरी स्पोर्ट्स क्लब म्हणून ओळखला जातो. या मैदानावर आतापर्यंत ४१ टी-२० सामने खेळले गेले आहेत. प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने 23 वेळा विजय मिळवला असून उपविजेता संघाने 17 वेळा यश मिळवले आहे. मैदानावर प्रथम फलंदाजी केलेल्या धावांची सरासरी संख्या 156 धावा आहे. दुसऱ्या डावात धावांची सरासरी संख्या 139 धावपटूंची आहे.
हरारेमध्ये हवामानाचा अंदाज काय?
भारत-झिम्बाब्वे सामन्यादरम्यान हरारे येथील तापमान 11 अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याची शक्यता आहे. झिम्बाब्वे, उत्तर गोलार्धात स्थित असल्याने, जून, जुलै आणि ऑगस्टमध्ये थंड हवामान अनुभवते. त्याचवेळी क्रिकेट चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे की पावसाची शक्यता नाही.
लाइव्ह स्ट्रीमिंग कधी, कुठे आणि कसा बघणार?
भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 4.30 वाजता सामना सुरू होईल. भारतीय चाहत्यांना सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवर भारत-झिम्बाब्वे टी-20 मालिका पाहता येणार आहे. याव्यतिरिक्त, तुम्ही थेट स्ट्रीमिंगवर सोनी लाइव्हवर पाहता येईल.
झिम्बाब्वेविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी भारताचा संघ:
शुभमन गिल (कर्णधार), ध्रुव जुरेल (विकेटकीपर), ऋतुराज गायकवाड, अभिषेक शर्मा, रियान पराग, रिंकु सिंह, वॉशिंग्टन सुंदर, आवेश खान, मुकेश कुमार, खलील अहमद, रवी बिश्नोई, साई सुदर्शन, जितेश शर्मा, तुषार देशपांडे, हर्षित राणा
India vs Zimbabwe चे वेळापत्रक-
पहिली टी-20 - 6 जुलै, हरारे
दुसरी टी-20 - 7 जुलै, हरारे
तिसरी टी-20 - 10 जुलै, हरारे
चौथी टी-20 - 13 जुलै, हरारे
पाचवी टी-20- 14 जुलै, हरारे
संबंधित बातम्या:
घरी गेल्यानंतर हार्दिक पांड्याने मेडल कोणाला दिले?; अखेर फोटो आला समोर, सोशल मीडियावर कमेंटचा पाऊस