BCCIने महिला टी-20 वर्ल्ड कपसाठी संघाची केली घोषणा; 'या' खेळाडूच्या हातात धुरा; जाणून घ्या कोणाला मिळाली संधी
Team India Squad Women T20 World Cup 2024 : बीसीसीआयने ऑक्टोबर महिन्यात होणाऱ्या महिला टी-20 वर्ल्ड कप 2024 साठी आपला संघाची घोषणा केली आहे.
Team India Squad Women T20 World Cup 2024 : बीसीसीआयने ऑक्टोबर महिन्यात होणाऱ्या महिला टी-20 वर्ल्ड कप 2024 साठी आपला संघाची घोषणा केली आहे. संघाची कमान अनुभवी खेळाडू हरमनप्रीत कौरकडे देण्यात आली आहे. यासह टीम इंडियामध्ये अनुभवी खेळाडूंसोबतच युवा खेळाडूंनाही संधी मिळाली आहे. स्मृती मानधना आणि शफाली वर्मा यांचा टीम इंडियात समावेश आहे.
महिला टी-20 वर्ल्ड कप 2024चा थरार येत्या 3 ऑक्टोबरपासून रंगणार आहे. भारताचा पहिला सामना न्यूझीलंडच्या महिला संघाशी आहे. हा सामना 4 ऑक्टोबरला होणार आहे. ही स्पर्धा यूएईमध्ये आयोजित केली जाणार आहे.
🚨 NEWS 🚨
— BCCI Women (@BCCIWomen) August 27, 2024
Presenting #TeamIndia's squad for the ICC Women's T20 World Cup 2024 🙌 #T20WorldCup pic.twitter.com/KetQXVsVLX
भारताने हरमनप्रीत कौरकडे कर्णधारपद सोपवले आहे. टीम इंडियाने स्मृती मानधना, शफाली वर्मा आणि दीप्ती शर्मा यांना संधी दिली आहे. त्यांच्यासोबत जेमिमाह रॉड्रिग्ज, रिचा घोष आणि यष्टिका भाटिया यांनाही संधी मिळाली आहे.
पूजा वस्त्राकर, रेणुका सिंह, हेमलता, शोभना आणि राधा यादव यांनाही संधी देण्यात आली आहे. भारताचा या स्पर्धेतील पहिला सामना न्यूझीलंडशी होणार आहे. हा सामना दुबईत होणार आहे. टीम इंडिया एकूण 4 गट सामने खेळणार आहे. यातील 3 सामने दुबईत तर एक सामना शारजाहमध्ये खेळवला जाणार आहे.
6 ऑक्टोबरला भारताचा सामना पाकिस्तानशी
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्याची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. टीम इंडिया सहा ऑक्टोबरला पाकिस्तानविरुद्ध मैदानात उतरणार आहे. हा सामना दुबईत होणार आहे. टीम इंडियाचा शेवटचा गट सामना ऑस्ट्रेलियाशी होणार आहे. जो 13 ऑक्टोबर रोजी शारजाह येथे खेळवला जाणार आहे. आणि याआधी श्रीलंकेविरुद्ध सामना होणार आहे. हा सामना 9 ऑक्टोबर रोजी होणार आहे.
आयसीसीस महिला टी-20 वर्ल्ड कप 2024 साठी भारताचा संघ : हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना (उपकर्णधार), शफाली वर्मा, दीप्ती शर्मा, जेमिमाह रॉड्रिग्स, ऋचा घोष (विकेटकीपर), यास्तिका भाटिया (विकेटकीपर), पूजा वस्त्राकर, अरुंधा रेड्डी , रेणुका सिंह ठाकूर, दयालन हेमलता, आशा शोभना, राधा यादव, श्रेयंका पाटील, सजना सजीवन
राखीव खेळाडू : उमा छेत्री, तनुजा कंवर आणि सायमा ठाकोर
हे ही वाचा :