एक्स्प्लोर
Prince Charles Coronation Ceremony: ब्रिटनच्या राजाचा शाही राज्याभिषेक; 70 वर्षांनंतर होत असलेल्या राज्याभिषेक सोहळ्यावर हजारो कोटींचा खर्च, पाहा फोटो
ब्रिटनचे राजे चार्ल्स आणि त्यांची पत्नी राणी कॅमिला यांचा शाही राज्याभिषेक सोहळा पार पडला. वेस्टमिन्स्टर अॅबे चर्चमध्ये हा सोहळा पार पडला. ब्रिटनमध्ये तब्बल 70 वर्षांनंतर असा शाही सोहळा पार पडला.

King Charles III
1/15

ब्रिटनमध्ये तब्बल 70 वर्षांनंतर शाही राज्याभिषेक सोहळा पार पडला. राजे चार्ल्स (तिसरा) आणि राणी कॅमिला यांचा राज्याभिषेक सोहळा आज पार पडला.
2/15

यापूर्वी ब्रिटनमध्ये 1953 मध्ये राणी एलिझाबेथ यांचा राज्याभिषेक झाला होता. राणी एलिझाबेथ यांच्या मृत्यूनंतर आता किंग चार्ल्स यांचा आज राज्याभिषेक सोहळा पार पडला.
3/15

विशेष म्हणजे, या राज्याभिषेक सोहळ्यासाठी जगभरातील ब्रिटनमधील मान्यवरांसह इतर 203 देशांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
4/15

ब्रिटनमधील वेस्टमिन्स्टर अॅबे चर्चमध्ये राजा चार्ल्स तिसरा आणि राणी कॅमिला यांचा राज्याभिषेक करण्यात आला.
5/15

किंग चार्ल्स यांचा वयाच्या 74व्या वर्षी राज्याभिषेक झाला.
6/15

राज्याभिषेक झालेल्या वेस्टमिन्स्टर अॅबे चर्चमधील हे दृश्य आहे.
7/15

ब्रिटिश राजाचा ताफा ज्या मार्गावरून गेला, त्या मार्गावर हजारो लोक उपस्थित होते. यावेळी मुख्य रस्त्याच्या दुतर्फा ब्रिटीशांचे झेंडे फडकवण्यात आले.
8/15

या सोहळ्याची तयारी अनेक महिन्यांपासून सुरू होती. राजा चार्ल्स चर्चमध्ये जाण्यासाठी पांढरे घोडे असलेल्या सोन्याच्या रथावर बसले होते.
9/15

ड्यूक ऑफ ससेक्स प्रिन्स हॅरी पत्नी मेघनशिवाय वडिलांच्या राज्याभिषेक सोहळ्याला उपस्थित होते. या समारंभात त्यांची कोणतीही औपचारिक भूमिका नव्हती.
10/15

किंग चार्ल्स आणि क्वीन कॅमिला बकिंगहॅम पॅलेसहून वेस्टमिन्स्टर चर्चकडे निघाले. त्यावेळी त्यांचे अंगरक्षकही त्यांच्यासोबत चालत होते.
11/15

वेस्टमिन्स्टर अॅबे चर्चमध्ये आर्चबिशपने राजा चार्ल्स यांना शपथ दिली. यादरम्यान चार्ल्स म्हणाले - मी सेवा करण्यासाठी सज्ज झालो आहे.
12/15

ब्रिटनमधील चार्ल्स-कॅमिला यांच्या राज्याभिषेकाच्या वेळी रस्त्यावर असे दृश्य होते. सर्वत्र ब्रिटीशांचा झेंडा दिसत होता.
13/15

किंग चार्ल्स आणि क्वीन कॅमिला बकिंगहॅम पॅलेसहून वेस्टमिन्स्टर चर्चकडे घोड्यावरुन शाही थाटात निघाले होते.
14/15

राज्याभिषेक सोहळ्यात किंग चार्ल्सचे सैनिक आणि जगभरातील लाखो पाहुणे सहभागी झाले होते. सगळीकडे गर्दीच गर्दी दिसत होती.
15/15

राजा चार्ल्स III च्या राज्याभिषेकापूर्वी शाही जोडप्याने परिधान केलेल्या भव्य वस्त्रांची (शाही पोशाख) अशी चित्रे समोर आली होती. त्यावर सोनेरी डिझाईन केलेली होती.
Published at : 06 May 2023 05:36 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
भारत
सांगली
भारत
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
