एक्स्प्लोर
Pune Accident: पुणे सातारा महामार्गावर खड्ड्यामुळं अचानक ब्रेक दाबला, एकामागोमाग एक 3 कार एकमेकांना धडकल्या, भीषण अपघातात कारचं मोठं नुकसान
Pune Accident: पुणे सातारा महामार्गावरील नसरापूर, चेलाडी जवळच्या उड्डाणंपुला दरम्यान ही घटना घडली आहे.
Pune Accident
1/8

पुणे सातारा महामार्गावर रस्त्यावर खड्डा समोर आल्याने कारने अचानक ब्रेक दाबल्यानं एकामागोमाग एक अशा 3 कार एकमेकांना धडकून अपघात झाल्याची घटना घडली आहे.
2/8

पुणे सातारा महामार्गावरील नसरापूर, चेलाडी जवळच्या उड्डाणंपुला दरम्यान ही घटना घडली आहे.
3/8

सुदैवाने यात कुणालाही गंभीर दुखापत झाली नाही, कारचं मात्र यात मोठं नुकसान झालं आहे.
4/8

या घटनेनंतर साताऱ्याहून पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर काहीकाळ वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.
5/8

या घटनेनंतर करोडो रुपयांचा निधी खर्चूनही असा दर्जाहीन पूल आणि रस्ते कशासाठी? असा सवाल स्थानिकांनी एनएचआय समोर उपस्थित केला आहे.
6/8

स्थानिक नागरिकांनी वारंवार तक्रारी करूनही महामार्ग प्राधिकरणाकडून कोणतीही दखल घेतली जात नाही.
7/8

काम करताना दर्जा पाळला जात नसल्याने आणि वेळेवर देखभाल न केल्याने वाहनचालकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागतोय. त्यामुळं नागरिकांनी संताप व्यक्त केलाय.
8/8

पुणे सातारा महामार्गावरील नसरापूर, चेलाडी जवळच्या उड्डाणंपुला दरम्यान ही घटना घडली आहे.
Published at : 30 Sep 2025 11:00 AM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
व्यापार-उद्योग
पुणे
राजकारण
























