Baramati : बारामतीमध्ये मूळ मतदाराऐवजी दुसऱ्यानंच मतदान केलं, दिवसभरात तीन प्रकार समोर, मतदानावेळी धक्कादायक प्रकार
Baramati : बारामतीमधील नगरपालिका निवडणुकीसाठी आज मतदान पार पडलं. यावेळी एका मतदाराच्या जागेवर दुसऱ्यानंच मतदान केल्याच्या तीन घटना घडल्या.

पुणे : बारामती नगर परिषदेसाठी आज मतदान पार पडलं. बारामतीमधील एकूण 41 जागा नगरसेवक पदाच्या आहेत आणि नगराध्यक्ष पदासाठी मतदान पार पडलं. सकाळी साडेसात वाजता मतदानाला सुरुवात झाली. बरामती मध्ये राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी विरुद्ध भाजप विरुद्ध शिवसेना विरुद्ध बसपा असे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत. प्रत्येकाने आपापल्या परीने प्रचार केला त्यानंतर आज मतदान पार पडलं. बारामती नगरपालिकेसाठी आज मतदान पार पडतं असताना धक्कादायक प्रकार समोर आले आहेत. एका मतदाराच्या जागी दुसराच कोणीतरी मतदान करुन केल्याच्या तीन घटना बारामतीत समोर आल्याचा दावा करण्यात आला आहे.
Baramati Nagar Parishad Election : बारामतीत मतदानावेळी भलताच प्रकार
एका मतदाराच मतदानच आधी कोणतरी करून गेला असल्याचं समोर आला आहे. बारामतीतील अहिल्यानगर देवी क्लब या मतदार केंद्रात हा प्रकार घडला आहे. अमित दिलीप कुलथे यांचे मतदान आधीच झालं होतं.अमित कुलथे मतदान केंद्रात दाखल झाले आणि त्यानंतर त्यांच्या हा प्रकार लक्षात आला. यानंतर त्यांच्याकडून निवडणूक केंद्रातील कर्मचाऱ्यांनी टेंडर वोट फॅार्म भरून घेतला आणि त्यानंतर अमित कुलथे यांनी मतदान केले आहे. मात्र याआधी अमित कुलथे यांच्या नावाने मतदान कोणी केले याबद्दल संशय आहे. याबद्दल या केंद्रातील निवडणूक अधिकाऱ्यांना प्रतिक्रिया देण्यास विचारणा केली असता प्रतिक्रिया देण्यास त्यांनी नकार दिला आहे.
आज दिवसभरात बारामती मधील दुसरी घटना समोर आली आहे. गणेश कदम याचं मतदान दुसऱ्याच कुणी केल्याचं गणेश कदम चा दावा आहे. प्रभाग क्रमांक 13 मधील सात नंबर शाळा येथे गणेश कदम हा मतदानासाठी गेला असता त्याचं आधीच कुणीतरी मतदान केलं असल्याचा त्याचा दावा आहे.
एक मतदार मतदानाला गेल्यानंतर त्याच्या जागी दुसरच कोणीतरी मतदान केल्याचा तिसरं प्रकरण समोर आलं आहे. बारामतीतला माध्यमांपर्यंत पोहोचलेला हा तिसरा प्रकार आहे. बारामतीतील ढवाणवस्ती मतदान केंद्रावर आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे. हा मतदार साडेपाच वाजण्याआधी मतदान केंद्रात पोहोचलेला होता. त्यानंतर ज्यावेळी कर्मचाऱ्यांच्या लक्षात आले की त्याच्या जागी दुसऱ्या कोणीतरी मतदान केले. त्यानंतर त्याच्या ओळखपत्राशी नाव मॅच न झाल्याने तो दुसरे ओळखपत्र आणण्यास तयार होता मात्र तरी देखील प्रशासनाने पुन्हा तो ओळखपत्र घेऊन आल्यानंतर त्याला आत मध्ये घेतलं नाही, असे त्या तरुणाचे म्हणणं आहे. त्यामुळे या तरुणाचा मतदानाचा हक्क हिरावून घेतला गेलाय.
राष्ट्रवादीत उभी फूट पडल्यानंतर ही पहिलीच निवडणूक आहे. 41 पैकी आठ जागा बिनविरोध करण्यात अजित पवारांना यश आले आहे.























