एक्स्प्लोर

Team India squad For T20 World Cup: शुभमन गिलचा करेक्ट कार्यक्रम, पण कॅप्टन असूनही चाचपडत असलेल्या सूर्याचे सुद्धा कोणी कान उपटले?

Team India squad For T20 World Cup: या वर्षी कर्णधार सूर्याची फलंदाजी अत्यंत निराशाजनक राहिली आहे, त्याला एकही अर्धशतक झळकावता आले नाही. आयसीसी टी-20 फलंदाजी क्रमवारीत एकेकाळी पहिल्या क्रमांकावर होता.

Team India squad For T20 World Cup: टी-20 वर्ल्डकप 2026 साठी साठी भारतीय संघाची घोषणा आज (20 डिसेंबर) करण्यात आली. या स्पर्धेत सूर्यकुमार यादव भारतीय संघाचे नेतृत्व करेल, तर खराब फॉर्ममुळे संघर्ष करणारा शुभमन गिल संघाला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. अक्सर पटेलची उपकर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली आहे. दरम्यान, भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध घरच्या मैदानावर 3-1 अशी टी-20 मालिका जिंकली असली तरी, 'मेन इन ब्लू' संघाच्या काही समस्या कमी झालेल्या नाहीत. सर्वात चिंताजनक बाब म्हणजे कर्णधार सूर्यकुमार यादवचा खराब फॉर्म. या वर्षी कर्णधार सूर्याची फलंदाजीची कामगिरी अत्यंत निराशाजनक राहिली आहे, त्याला एकही अर्धशतक झळकावता आले नाही. 35 वर्षीय खेळाडू आयसीसी टी-20 फलंदाजी क्रमवारीत एकेकाळी पहिल्या क्रमांकावर होता, परंतु आता तो धावांसाठी संघर्ष करत आहे. 

न्यूझीलंडविरुद्ध तो धावा करेल, अशी अपेक्षा 

इरफान पठाणने संघ निवडीवर भाष्य करताना सूर्याचे अप्रत्यक्ष कान उपटले आहेत. तो ट्विट म्हणतो की, जितेश शर्मा नक्कीच विचार करत असेल की आपण असं काय चुकीचं केलं, की आपली निवडच झाली नाही. सूर्यकुमार यादवसाठीही हा काळ खूप महत्त्वाचा आहे. वर्ल्डकपमध्ये खेळण्यासाठी त्याचा फॉर्ममध्ये असणं गरजेचं आहे. न्यूझीलंडविरुद्ध तो धावा करेल, अशी अपेक्षा आहे, जेणेकरून त्याला स्वतःच्या खेळावर पुन्हा विश्वास बसेल. 2025 मध्ये, सूर्यकुमार यादवची टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये सरासरी 13.62 होती, जी त्याच्या कारकिर्दीतील आतापर्यंतचा सर्वात वाईट काळ मानला जातो. अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पाचवा आणि शेवटचा टी-20 सामना जिंकल्यानंतर सूर्यकुमार यादव म्हणाला की, मी अधिक मजबूत होऊन परतेन. माझा यावेळी वाईट काळ खूप लांबला आहे. सूर्याने फलंदाजांचे आणि गोलंदाजांचे कौतुक केले.

आमचे लक्ष विशिष्ट प्रकारचे क्रिकेट खेळण्यावर होते

सूर्यकुमार यादव म्हणाला, "मालिकेच्या सुरुवातीपासूनच आमचे लक्ष विशिष्ट प्रकारचे क्रिकेट खेळण्यावर होते आणि आम्ही त्यावर टिकून राहण्याचा निर्णय घेतला. आम्ही वेगळे काहीही करण्याचा प्रयत्न केला नाही. आम्हाला प्रत्येक विभागात स्वतःला मुक्तपणे व्यक्त करायचे होते आणि त्याचे निकाल सर्वांना दिसत आहेत. कदाचित गेल्या काही मालिकांमध्ये आमच्यात हीच कमतरता होती. आम्हाला अशी फलंदाजी करायची होती; एकदा फलंदाज सेट झाला की, थांबणे शक्य नव्हते. आम्हाला या सातत्यपूर्ण आक्रमक हेतूची आवश्यकता होती आणि तेच दिसून आले."

तुम्हाला परिस्थितीला प्रतिसाद द्यावा लागेल

सूर्यकुमार म्हणतो, "बॉलिंगमध्येही आमची वेगळी योजना होती. पॉवरप्लेमध्ये बुमराहला एक षटक टाकायला लावणे, ड्रिंक्स ब्रेक झाल्यानंतर मधल्या षटकांवर नियंत्रण ठेवणे आणि नंतर त्याला डेथ ओव्हर्ससाठी तयार करणे ही रणनीती होती." वॉशिंग्टन सुंदरने उत्कृष्ट कामगिरी केली आणि संधीचा योग्य वापर केला. सामन्यादरम्यान आमच्यावर कधीकधी दबाव होता आणि आव्हाने होती. पण क्रिकेट म्हणजे तुम्ही परिस्थितीला कसे प्रतिसाद देता यावर अवलंबून असते आणि खेळाडूंनीही उत्तम प्रतिसाद दिला.

इतर महत्वाच्या बातम्या

महत्त्वाच्या बातम्या

Ind vs Eng : तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलिब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा
Video: तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलिब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा
Ajit Agarkar: निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांचा पगार किती कोटींच्या घरात? पदावर येताच बीसीसीआयने दिली होती तब्बल 300 टक्क्यांची घसघशीत वाढ!
निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांचा पगार किती कोटींच्या घरात? पदावर येताच बीसीसीआयने दिली होती तब्बल 300 टक्क्यांची घसघशीत वाढ!
मुथय्या मुरलीधरन ते वसीम अक्रम! 'असा' पराक्रम करणारे फक्त पाचच गोलंदाज, भारतीय खेळाडूचा समावेश आहे का?
मुथय्या मुरलीधरन ते वसीम अक्रम! 'असा' पराक्रम करणारे फक्त पाचच गोलंदाज, भारतीय खेळाडूचा समावेश आहे का?
Ravindra Jadeja : 'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही

व्हिडीओ

PM Modi On Gen Z Special Report : जेन झींशी संवाद साधण्यासाठी सरकारची खटपट : ABP Majha
Pocket Money Scheme Special Report : उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना पॉकेटमनी मिळणार
Vande Mataram Special Report : वंदे मातारमबाबत काँग्रेसचा ठराव, अमित शाहांचा हल्लाबोल
Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
Nashik Crime News : एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ
साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ
Ind vs Eng : तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलिब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा
Video: तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलिब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास
Embed widget