एक्स्प्लोर

Gold : शेअर बाजारापेक्षा सोन्यामुळं गुंतवणूकदार अधिक मालामाल, वर्षभरात 73 टक्के रिटर्न, 46 वर्षांचा विक्रम मोडला

Gold Price: गुंतवणूकदारांना सोन्यानं 2025 मध्ये दमदार रिटर्न दिले आहेत. 2025 मध्ये सोन्याच्या दरात 73-75 टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली आहे.  

Gold Price नवी दिल्ली: भारतातमधील सोने आणि चांदीमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी 2025 हे वर्ष फायदेशीर ठरलं आहे. सोन्याच्या दरात 73- 75 टक्क्यांची वाढ झाली आहे. 24 कॅरेट सोन्याचा 1 जानेवारी 2025 चा दर प्रति 10 ग्रॅम 78 हजार रुपये इतका होता डिसेंबर महिन्यात सोन्याचा एका तोळ्याचा दर 137000 रुपये आहे. गेल्या 46  वर्षातील ही सर्वात मोठी वाढ आहे.  

मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर सोने दरानं  135590 रुपयांचा उच्चांक गाठला आहे. शुक्रवारी बाजार बंद होईपर्यंत सोन्याचा एका तोळ्यचा दर 134200 रुपयांपर्यंत पोहोचला होता. यामुळं गुंतवणुकीचा सुरक्षित पर्याय म्हणून सोन्याला प्राधान्य देत आहेत. ऑक्टोबर 2023 पासून सोन्याचे दर 139 टक्क्यांनी वाढले आहेत.  सोन्याप्रमाणं चांदीचे दर देखील मोठ्या प्रमाणात वाढले आहेत.

पुढील वर्षी सोन्याचे दर वाढणार?

सोने आणि चांदीच्या दरातील तेजी 2026 मध्ये देखील पाहायला मिळू शकते. बाजार जाणकारांच्या मते सोने आणि चांदी गेल्या 10 वर्षात रिटर्न देण्यामध्ये सर्वात पुढे आहेत.  

मेहता इक्विटीज लिमिटेडचे उपाध्यक्ष कमोडिटीज राहुल कलांत्री यांनी दरातील तेजी आणि घसरणीनंतर देखील गेल्या आठवड्यात सोने आणि चांदीच्या दरानं उच्चांक गाठला आहे. सोन्याचे दर दोन महिन्यातील उच्चांकाजवळ आहेत. अमेरिकन फेडरल रिझर्व्हच्या व्याज दरातील 25 बेसिस पॉईंटच्या कपातीनंतर जागतिक मार्केटमध्ये चांदीच्या दरानं नवा उच्चांक गाठला आहे. चांदीच्या दरात 100 टक्क्यांची तेजी पाहायला मिळाली आहे.

गुंतवणूकदारांबाबत तज्ज्ञ काय म्हणतात?

गुंतवणूकदारांसाठी त्यांची रणनीती सांगताना रामास्वामी म्हणाले की किमतीमधील कोणतीही संभाव्य घसरण लाँग टर्म गुंतवणूकदारांसाठी हळू हळू खरेदी करण्याची चांगली संधी आहे. जर, सोन्याचे दर ठराविक रकमेवर कायम राहिले तर ते ऑक्टोबरच्या उच्चांकाला गाठू शकतात. 

मॅक्सवेलनं मत मांडलं की  गुंतवणूकदारांची रणनीती संतुलित असली पाहिजे. ज्या लोकांनी कमी दरांवर गुंतवणूक केली होत. त्यांनी  कोअर अलॉकेशन कायम ठेवत अंशत: नफा बुक करण्याबाबत विचार करावा. यासाठी कारण सांगण्यात आलं असून ते वोलॅटिलिटी आणि मॅक्रोइकोनॉमिक धक्क्यांशिवाय हेजच्या रुपात काम करते. नव्या गुंतवणूकदारांनी घसरण पाहता डॉलर कॉस्ट एवरेजिंग स्ट्रॅटेजी राबवावी, असं त्यांनी म्हटलं.  

(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)

महत्त्वाच्या बातम्या

नोकरीच्या शोधात असणाऱ्या युवकांसाठी मोठी बातमी, रेल्वेमध्ये 1 हजार 421 पदांसाठी भरती सुरु, कसा कुठे कराल अर्ज?
नोकरीच्या शोधात असणाऱ्या युवकांसाठी मोठी बातमी, रेल्वेमध्ये 1 हजार 421 पदांसाठी भरती सुरु, कसा कुठे कराल अर्ज?
Life Insurance : स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल,सरासरी प्रीमियममध्ये 42 टक्के वाढ
स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल
देशाला स्वातंत्र्य मिळालं त्यावेळी सोन्याला किती होता दर? आजचे दर काय? 80 वर्षात नेमकी किती झाली वाढ?
देशाला स्वातंत्र्य मिळालं त्यावेळी सोन्याला किती होता दर? आजचे दर काय? 80 वर्षात नेमकी किती झाली वाढ?
99 टक्के सरकारी नोकऱ्यांमध्ये घोटाळा, विशिष्ट जाती, वर्गातील लोकांनाच झुकतं माप, बाबा रामदेव यांचा गंभीर आरोप, पुन्हा आंदोलन करण्याचा इशारा
99 टक्के सरकारी नोकऱ्यांमध्ये घोटाळा, विशिष्ट जाती, वर्गातील लोकांनाच झुकतं माप, बाबा रामदेव यांचा गंभीर आरोप, पुन्हा आंदोलन करण्याचा इशारा

व्हिडीओ

Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Hasan Mushrif : रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या परिस्थितीवरुन पालकमंत्री हसन मुश्रीफ नाराज
रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या स्थितीवरुन हसन मुश्रीफ नाराज
Bar Council : बार काऊन्सिल ऑफ इंडियाच्या अध्यक्षांनी NALSAR प्रकरणी विद्यार्थ्यांची माफी मागितली, वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न
बार काऊन्सिलच्या अध्यक्षांनी विद्यार्थ्यांची माफी मागितली,वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न 
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
Rohit Pawar : तलाठी भरतीत भ्रष्टाचार झाल्याचं सिद्ध झालंय, तत्कालीन महसूलमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारुन राजीनामा द्या, रोहित पवार यांचं राधाकृष्ण विखे पाटील यांना आव्हान
मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ खातेवाटपात आपलं स्थान कुठं ठेवलं, कधीतरी आत्मपरिक्षण करा, रोहित पवार यांचा विखे पाटलांना टोला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार

Embed widget