Team India squad For T20 World Cup: शुभमन गिलला का संधी दिली नाही? निवड समितीच्या अजित आगरकरांनी फक्त एकाच वाक्यात हिशेब केला! तिकडून सूर्याही पाच शब्दातच सगळं बोलला...
Team India squad For T20 World Cup: टी-20 विश्वचषक 7 फेब्रुवारी रोजी कोलंबोमध्ये पाकिस्तान विरुद्ध नेदरलँड्स सामन्याने सुरू होईल. त्याच दिवशी, भारताचा पहिला सामना वानखेडे स्टेडियमवर यूएईविरुद्ध खेळेल.

Team India squad For T20 World Cup 2026 : टी-20 वर्ल्डकपसाठी भारतीय संघाची आज (20 डिसेंबर) घोषणा करण्यात आली. मुंबईत बीसीसीआय मुख्यालयात, सचिव देवजीत सैकिया यांनी मुख्य निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर आणि कर्णधार सूर्यकुमार यादव यांच्या उपस्थितीत संघाची घोषणा केली. टीममध्ये ईशान किशनची वापसी झाली असली, तरी शुभमन गिलला दणका देण्यात आला असून त्याला थेट वगळण्यात आलं आहे. अक्सर पटेलला उपकर्णधार म्हणून नियुक्त करण्यात आले आहे, रिंकू सिंहची सुद्धा वापसी झाली असून संजू सॅमसनचे स्थान कायम आहे.
गिलला वगळलं, एकाच वाक्यात हिशेब!
अजित आगरकर यांनी सांगितले की शुभमन गिल सध्या धावा काढण्यास संघर्ष करत आहे आणि गेल्या वर्ल्डकपमध्येही तो खेळला नव्हता. दरम्यान, गिलच्या वगळण्यावर भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादव म्हणाला की, "आम्हाला टाॅपला एक कीपर हवा होता." वर्ल्डकपपूर्वी 11 जानेवारीपासून संघ न्यूझीलंडविरुद्ध तीन एकदिवसीय आणि पाच टी-20 सामन्यांची मालिका देखील खेळेल. टी-20 विश्वचषक 7 फेब्रुवारी रोजी कोलंबोमध्ये पाकिस्तान विरुद्ध नेदरलँड्स सामन्याने सुरू होईल. त्याच दिवशी, भारताचा पहिला सामना वानखेडे स्टेडियमवर यूएईविरुद्ध खेळेल. अंतिम सामना 8 मार्च 2026 रोजी खेळवला जाईल. ठिकाण नंतर ठरवले जाईल.
भारतीय संघ निवडीचे ठळक मुद्दे...
- शुभमन गिलचा संघात समावेश केला नाही, जो एक महत्त्वाचा निर्णय मानला जातो. तो फॉर्ममध्ये नाही.
- अक्षर पटेलला नवीन उपकर्णधार म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.
- संजू सॅमसन आणि इशान किशन दोघांनाही विकेटकीपिंगसाठी संघात समाविष्ट करण्यात आले आहे.
- रिंकू सिंह संघात परतला आहे आणि तो मधल्या फळीत आणि फिनिशर म्हणून महत्त्वाची भूमिका बजावू शकतो.
टी-20 विश्वचषकासाठी भारतीय संघ
सूर्यकुमार यादव (कर्णधार), अक्षर पटेल (उपकर्णधार), अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, संजू सॅमसन, हार्दिक पंड्या, रिंकू सिंग, शिवम दुबे, कुलदीप यादव, वॉशिंग्टन सुंदर, हर्षित राणा, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह आणि अर्शदीप सिंग (इशान किशन).
भारताचे सामन्यांचे वेळापत्रक
भारत 7 फेब्रुवारी रोजी मुंबईत अमेरिकेविरुद्ध विश्वचषक मोहिमेची सुरुवात करेल. त्यानंतर 12 फेब्रुवारी रोजी दिल्लीत नामिबिया, 15 फेब्रुवारी रोजी कोलंबोमध्ये पाकिस्तान आणि 18 फेब्रुवारी रोजी अहमदाबादमध्ये नेदरलँड्सविरुद्ध सामने होतील.
भारताचा सामना पाकिस्तानसह चार संघांशी होईल
टी20 विश्वचषकात भारताला तुलनेने सोपा गट देण्यात आला आहे. पाकिस्तान, अमेरिका, नामिबिया आणि नेदरलँड्ससह गट अ मध्ये संघाला स्थान देण्यात आले आहे. पाकिस्तानविरुद्ध टीम इंडियाचा अलिकडचा रेकॉर्डही मजबूत आहे. भारताने आशिया कपमध्ये पाकिस्तानला तीन वेळा पराभूत केले आहे आणि एकदिवसीय सामन्यांमध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीमध्येही त्यांचा पराभव केला आहे.
इतर महत्वाच्या बातम्या























