ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 डिसेंबर 2025 | शनिवार
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

1. टी-20 विश्वचषक 2026 आणि न्यूझीलंड विरूद्धच्या मालिकेसाठी भारताचा संघ जाहीर,सूर्यकुमार यादव कर्णधार, शुभमन गिलचा पत्ता कट https://tinyurl.com/y48wewsc बीसीसीआयनं नॅशनल कॉन्ट्रॅक्टमधून हाकललं, ना वन डे, ना कसोटी संघात स्थान, आता SMAT गाजवून ईशान किशनचं दमदार कमबॅक https://tinyurl.com/2n88u3wz
2. 23 नगरपरिषदा आणि नगरपंचायंतीसाठी मतदान पूर्ण, काही ठिकाणी राडा तर काही ठिकाणी पैसे वाटप अन् बोगस मतदानाचे आरोप प्रत्यारोप,288 नगरपरिषदा आणि नगरपंचायतींसाठी उद्या मतमोजणी https://tinyurl.com/26adyrfx अहिल्यानगरच्या कोपरगावमध्ये भाजप-राष्ट्रवादीत जोरदार राडा, काही काळ तणावाचं वातावरण,पोलिसांसमोरच कार्यकर्ते भिडले https://tinyurl.com/mpv824nh
3. काँग्रेस मुंबई महापालिका निवडणूक स्वबळावर लढणार,महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्निथलांची घोषणा https://tinyurl.com/mr33rb4t मुंबई महापालिका निवडणुकीतील युतीच्या चर्चेसाठी संजय राऊतांकडून राज ठाकरेंची भेट https://tinyurl.com/ydte5v4v
4. राष्ट्रवादीचे नेते माणिकराव कोकाटेंच्या आमदारकीवर टांगती तलवार, मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाची प्रत हाती येताच सर्वोच्च न्यायालयात धाव घेणार असल्याची माहिती https://tinyurl.com/5362fujm माणिकराव कोकाटेंच्या रिक्त मंत्रीपदासाठी राष्ट्रवादीत जोरदार लॉबिंग; इंद्रनील नाईकांना 'कॅबिनेट' मिळण्याची शक्यता, तर आमदार सना मलिकांची राज्यमंत्रिपदी वर्णी लागणार असल्याची चर्चा https://tinyurl.com/bdexd242
5. पुण्यात भाजपचा राष्ट्रवादीच्या दोन्ही पक्षांसह ठाकरे गटाला धक्का; अनेक माजी नगरसेवकांच्या हाती 'कमळ', शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार बापू पठारेंचा मुलगा सुरेंद्र पठारेचं भाजपमध्ये कमबॅक https://tinyurl.com/mncf28ry भाजपचा अवघ्या 24 तासांत 'यू-टर्न', नाशिकमध्ये देवयानी फरांदेंसोबत राहुल ढिकलेंवरही निवडणुकीची जबाबदारी https://tinyurl.com/4kcxjpuy
6. मुंबईतील घाटकोपरमध्ये वाहतूक नियम उल्लंघनामुळं भाजप आमदार पराग शाह यांचा पारा चढला, चुकीच्या दिशेनं येणाऱ्या रिक्षा चालकाला कानफटीत मारलं, व्हिडिओ समोर https://tinyurl.com/yc62pej7
7. दिवंगत माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या पत्नी शालिनीताई पाटील यांचं निधन, 94 व्या वर्षी मुंबईतील माहिम येथील घरी घेतला अखेरचा श्वास, कोरेगावातील मूळगावी अंत्यसंस्कार https://tinyurl.com/bdhfh3bh
8. मोदी सरकारने 'मनरेगा'वर बुलडोझर चालवला, लाखो शेतकरी, कामगार, भूमिहीन ग्रामीण गरिबांच्या हितावर हल्ला, या काळ्या कायद्याविरुद्ध लढणार, सोनिया गांधींचा हल्लाबोल https://tinyurl.com/4evu8fty
9. एपस्टीनच्या मेलमध्ये 'मोदी ऑन बोर्ड'चा उल्लेख, मंत्री हरदीप पुरींचंही नाव, पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, सरकारने खुलासा करण्याची मागणी https://tinyurl.com/afhr5h8w एपस्टीन फाईल्सचा 300 जीबीचा डेटा, सध्या अशंत:डेटा समोर, अमेरिकेत ट्रम्प आणि सरकार संघर्षाला सुरुवात, पृथ्वीराज चव्हाण यांची माहिती https://tinyurl.com/3b3s2wj9
10. राज्यात हाडं गोठवणारी थंडी, निफाडमध्ये पारा 5 अंशांवर, नीचांकी तापमानाची नोंद, बाळापूरमध्ये आज दाट धुक्याची चादर https://tinyurl.com/3twzpveu
एबीपी माझा स्पेशल
शौर्य पाटील आत्महत्या प्रकरणाच्या चौकशीसाठी एसआयटीची स्थापना, सुप्रिया सुळेंच्या नेतृत्वाखालील खासदारांच्या शिष्टमंडळासोबत झालेल्या बैठकीनंतर अमित शाह यांचे निर्देश https://tinyurl.com/33puk2hx
एबीपी माझा Whatsapp Channel- https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w
























