Special Report Ukkalgaon MPSC Success Story : एकाच कुटुंबातील 3 सख्ख्या भावांना एमपीएससीत लखलखीत यश
अहिल्यानगर जिल्ह्यातल्या एक अत्यंत प्रेरणादायी बातमीने बुलेटीनची सुरुवात करुयात..
श्रीगोंदा तालुक्यातील उखलगाव या दुर्गम गावातील एकाच कुटुंबातील तीन सख्ख्या भावांनी एमपीएससी लखलखीत यश मिळवलं आहे. दोघा भावांच्या पावलावर पाऊल टाकत तिसरा भावानेही प्रशासकीय सेवेत स्थान मिळवलंय.
ग्रामीण भागातून, प्रतिकुल परिस्थितीवर मात करत चंदन कुटुंबानं मिळवलेलं हे यश आज अनेक तरुणांसाठी आशेचा किरण ठरत आहे.
पाहूयात हा खास रिपोर्ट…
गाव खेड्यातील विद्यार्थ्यांचं यश हे नेहमीच प्रेरणा देणारं असतं… तसंच यश मिळवलंय श्रीगोंदा तालुक्यातील उखलगावच्या मुलांनी तिथे चंदन कुटुंबातील तीन सख्ख्या भावांनी एमपीएससी परीक्षेत यश मिळवत दुर्मिळ कामगिरी केली आहे. एकाच कुटुंबातील तीन सख्ख्या भावांनी एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण करण्याची कदाचित ही पहिलीच वेळ असू शकते. अतिशय प्रतिकूल परिस्थिती… दुर्गम भाग… आणि जिल्हा परिषद शाळेतील शिक्षण… या सगळ्यावर मात करत अजय मालन चंदन यांनी राज्य कर निरीक्षक
अजय यांचे मोठे भाऊ दिलीप मालन चंदन हे सध्या नागपूर गुन्हे शाखेत पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत आहेत… तर दुसरे भाऊ विजय मालन चंदन हे पुण्यात सहाय्यक पोलीस निरीक्षक पदावर कार्यरत आहेत… तिसरे भाऊ विनोद चंदन हे बांधकाम व्यावसायिक आहेत. विशेष म्हणजे दिलीप आणि विजय हे दोघेही सुरुवातीला शिक्षक होते… मात्र एमपीएससी परीक्षेचा ध्यास घेत त्यांनी २०१० आणि २०१२ साली पोलीस सेवेत प्रवेश केला. आता त्यांच्या पावलावर पाऊल ठेवत अजय चंदन यांनीही एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण केली आहे.
इतकंच नव्हे तर, दिलीप चंदन अधिकारी झाल्यानंतर उखलगाव गावातून जवळपास १५ तरुणांनी एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण केल्याचं ग्रामस्थ सांगतात.
अजय यांनी उखलगाव येथील जिल्हा परिषद शाळेतून प्राथमिक शिक्षण घेतलं… तर पुण्यातील आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून समाजशास्त्र विषयात पदवी पूर्ण केली. केडगाव, अहिल्यानगर येथे स्पर्धा परीक्षेची तयारी केली. तर २०२४ मध्ये राज्य कर निरीक्षक पदाची निवड निश्चित केली
सातत्य… जिद्द… चिकाटी… आणि योग्य नियोजन… याच्या जोरावर यश मिळवता येतं, असा संदेश देणारे चंदन कुटुंबातील हे तीन भाऊ आज संपूर्ण महाराष्ट्रासाठी प्रेरणास्थान ठरत आहेत. स्वतःपुरतं यश न ठेवता गावातील इतर मुलांनाही दिशा देणारी ही यशोगाथा निश्चितच कौतुकास्पद आहे. सुनील भोंगळ, एबीपी माझा, अहिल्यानगर
All Shows

































