एक्स्प्लोर
Nanded Crime News: विवाहित लेकीसह प्रियकराला संपवलं, विहिरीत फेकलं अन् पोलिस ठाण्यात जाऊन सगळंच सांगितलं, नांदेडमध्ये नेमकं काय घडलं?
Nanded Crime News: घटनेनंतर वडिलांनी पोलिस स्टेशनमध्ये जाऊन घटनेची माहिती दिली आहे, मुलीचा मृतदेह आधी हाती लागला, तर मुलाचा मृतदेह सोमवारी रात्री 12 वाजण्याच्या सुमारास विहिरीतून बाहेर काढला.
Nanded Crime News
1/8

नांदेड जिल्ह्यातील उमरी तालुक्यातील गोळेगाव येथे विवाहित मुलगी आणि तिच्या प्रियकराची निर्घृण हत्या करून मृतदेह विहिरीत टाकल्याची धक्कादायक घटना उघड झाली आहे.
2/8

सोमवारी सायंकाळी ही घटना समोर आली असून परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
3/8

मिळालेल्या माहितीनुसार, मृतांमध्ये संजीवनी कमळे (19, रा. गोळेगाव) आणि लखन भंडारे (19, रा. बोरजुनी) यांचा समावेश आहे. हे दोघे गेल्या काही वर्षांपासून प्रेमसंबंधात होते.
4/8

दरम्यान, संजीवनीचा विवाह वर्षभरापूर्वी गोळेगावातील एका तरुणाशी झाला होता. विवाहानंतरही तिचे प्रियकरासोबत गुप्तपणे संपर्क सुरू असल्याने घरच्यांकडून या संबंधांना तीव्र विरोध होता.
5/8

सोमवारी दुपारी संजीवनीच्या सासरच्या मंडळी बाहेर गेल्याने तिने प्रियकराला घरी बोलावले. मात्र अचानक परतलेल्या पती आणि कुटुंबीयांनी दोघांना अवैध अवस्थेत पाहिल्याने संताप व्यक्त केला. त्यानंतर वडील आणि नातेवाईकांना बोलावण्यात आले.
6/8

यानंतर मुलीचे वडील, काका आणि आजोबा यांनी संजीवनी आणि प्रियकराला ताब्यात घेतले. करकाळा शिवारात दोघांवर मारहाण करून त्यांचा खून करण्यात आला.
7/8

मृतदेह चाळीस फूट खोल विहिरीत फेकण्यात आले. प्रथम मुलीचा मृतदेह हाती लागला, तर प्रियकराचा मृतदेह रात्री उशिरा बाहेर काढण्यात आला.
8/8

घटनेनंतर आरोपी वडील मारोती सुरणे हे स्वतः उमरी पोलीस ठाण्यात हजर झाले आणि खून केल्याची कबुली दिली. पोलिसांनी मुलीचे वडील, काका, पती, सासू-सासरे यांना ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे.
Published at : 26 Aug 2025 03:35 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
व्यापार-उद्योग
पुणे
राजकारण
























