Maharashtra Breaking LIVE Updates: राज्यसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीकडून शरद पवारांचा अर्ज दाखल
Maharashtra Breaking LIVE Updates: देश-विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा फक्त एका क्लिकवर...
LIVE

Background
Maharashtra Breaking LIVE Updates: देश-विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा फक्त एका क्लिकवर...
Rajya Sabha Election 2026 Shivsena Shinde Group Candidate: राज्यसभेच्या एका जागेसाठी शिंदेंच्या शिवसेनेत (Shivsena Shinde Group) ऐनवेळी इच्छुकांची गर्दी (Rajya Sabha Election 2026) पाहायला मिळत आहे. राज्यसभेच्या एका जागेसाठी शिवसेनेत ज्येष्ठ नेत्यांपासून अनेक माजी खासदार इच्छुक असल्याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना निर्णय घेण्यात उशीर होत असल्याची सूत्रांची माहिती आहे.
राज्यसभेच्या एका जागेसाठी माजी खासदार आणि पक्षाचे ज्येष्ठ नेते गजानन किर्तीकर आणि आनंद अडसूळ हे इच्छुक असल्याचं सांगण्यात येत आहे. दोन टर्म खासदार राहिलेल्या गजानन किर्तीकर यांनी यंदा लोकसभेत उमेदवारी न स्विकारता रविंद्र वायकर यांना पाठिंबा दिला. सिटिंग सीट सोडल्याने गजानन किर्तीकर यांनी राज्यसभेसाठी आपला विचार करावा असा प्रस्ताव शिंदेंना दिल्याचे कळते. तर शिवसेना फूट पडल्यानंतर पक्षात शिंदेसोबत आलेल्या माजी खासदार आनंदराव अडसूळ यांना राज्यपाल हे पद देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र ते शक्य न झाल्याने पक्षाने आता राज्यसभेसाठी विचार करावा अशी गळ अडसूळ यांच्याकडून एकनाथ शिंदेंना घातली गेल्याचे कळते. तर दुसरीकडे नाशिकचे शिवसेनेचे माजी खासदार हेमंत गोडसे आणि कोल्हापूरचे माजी खासदार संजय मंडलिक यांनीही आज शिंदेंची नंदनवनला भेट घेऊन खासदारकीबाबत इच्छा दर्शवल्याचे समोर आले आहे. (Rajya Sabha Election 2026 Shivsena Shinde Group Candidate)
मुंबई महानगरपालिका प्रभाग समिती अध्यक्ष निवडणूक; कुठे बिनविरोध, कुठे थेट लढत? संपूर्ण चित्र स्पष्ट
मुंबई महानगरपालिकेच्या 17 प्रभाग समिती अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल झाल्यानंतर संपूर्ण चित्र स्पष्ट झाले आहे. 11 ठिकाणी एकच अर्ज आल्याने अध्यक्ष बिनविरोध निवडले जाणार आहेत, तर 6 प्रभाग समित्यांमध्ये दोन उमेदवार रिंगणात असल्याने मतदान होणार आहे. जी-नॉर्थमध्ये ठाकरे बंधूंमध्ये समझोता झाल्याची चर्चा असली तरी प्रत्यक्षात दोन्ही पक्षांकडून अर्ज दाखल झाले आहेत. त्यामुळे अखेर कोण उमेदवारी मागे घेणार की दादरमध्ये ‘फ्रेंडली फाईट’ होणार, याकडे लक्ष लागले आहे.
Beed Crime News: बीडमध्ये दुचाकी चोरीच्या रॅकेटचा पर्दाफाश; 17 दुचाकीसह 25 लाखांचे साहित्य जप्त, 3 आरोपी अटकेत
बीडमध्ये दुचाकी चोरीच्या रॅकेटचा पर्दाफाश; 17 दुचाकीसह 25 लाखांचे साहित्य जप्त, 3 आरोपी अटकेत
Anc:बीड जिल्ह्यातील दुचाकी चोरीच्या रॅकेटचा पोलिसांनी पर्दाफाश केला. गेवराई परिसरातून चोरीला गेलेल्या दुचाकींचा तपास करताना पोलिसांनी नेकनूर परिसरातील एका गोडाऊनवर धाड टाकली. या ठिकाणी चोरीच्या दुचाकींचे स्पेअर पार्ट बदलून मॉडीफाय करून बाजारात विक्री केल्या जात होत्या. या कारवाईत दोन आयशर टेम्पो भरून 17 दुचाकी आणि साहित्य असा २५ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणात तीन आरोपींना पोलिसांनी अटक केली. जिल्ह्यातील दुचाकी चोरीच्या सर्वात मोठ्या कारवाईंपैकी ही एक कारवाई असल्याची माहिती पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांनी दिली.
बाईट: नवनीत कॉवत - पोलीस अधीक्षक बीड
युगेंद्र पवार आता पुन्हा एकदा राजकारणात सक्रिय; बारामती तालुक्यातील जिरायती भागातील केली पाहणी
युगेंद्र पवार आता पुन्हा एकदा राजकारणात सक्रिय झालेले पाहायला मिळतात. योगेंद्र पवारांनी आज बारामती तालुक्यातील जिरायती भागातील पाणी संदर्भात जानाई शिरसाई योजनेची पाहणी केलीय.. शेतकऱ्यांना उन्हाळ्यात पिण्याच्या आणि शेतीच्या पाण्यासाठी कोणतीही अडचण निर्माण होऊ शकते या अनुषंगाने पाहणी दौरा केला आहे.. यावेळी जिरायती भागातील शेतकऱ्यांशी त्यांनी संवाद साधून समस्या देखील जाणून घेतल्या आहेत. यंदा जिरायती भागातील शेतकऱ्यांना पाणीटंचाई होऊ देणार नाही असं आश्वासन युगेंद्र पवार यांनी यावेळी शेतकऱ्यांना दिलंय..ल
महत्त्वाच्या बातम्या





















