एक्स्प्लोर
गुडघाभर पाण्यातून अंत्ययात्रा, खांदेकरांना पुढे सरकण्यासाठी दोरखंड बांधला, मुखेडमध्ये पाऊस काळ बनून आला!
Nanded Rain Update : गुडघाभर पाण्यातून अंत्ययात्रा, खांदेकरांना पुढे सरकण्यासाठी दोरखंड बांधला, मुखेडमध्ये पाऊस काळ बनून आला!
Nanded Rain Update
1/10

Nanded Rain Update : गेल्या दोन दिवसांपासून महाराष्ट्रासह मराठवाड्यात पावसाने जोरदार हजेरी लावलीये. मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यात पूर परिस्थिती निर्माण झालीये.
2/10

दरम्यान, पावसामुळे मराठवाड्यात भीषण परिस्थिती निर्माण झालीये. नांदेडमधील मुखेडमध्ये पाऊस आणि पूर परिस्थितीमुळे अंत्ययात्रा गुडघाभर पाण्यातून नेण्याची वेळ आलीये.
3/10

शिवाय यावेळी पाण्यातून सुखरुप बाहेर पडता यावं, यासाठी दोरखंड बांधण्यात आलाय.
4/10

मराठवाड्यामध्ये गेल्या दोन दिवसांपासून जोरदार पाऊस बरसतो आहे. मराठवाड्यातील लातूर नांदेड आणि बीड जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस झालाय. यामध्ये एका दिवसात पाच लोकांचा मृत्यू झाला आहे ,एक जण जखमी झाला आहे. तर अनेकांना पुरामुळे स्थलांतरित करण्याची वेळ आली आहे.
5/10

नांदेड आणि लातूर या ठिकाणी अनेक लोकांना स्थलांतरित करण्यात आले. एसडीआरएफची दोन पथक नांदेडमध्ये बचाव कार्य करत आहेत, तर लातूरमध्ये स्थानिक पथक बचाव कार्य करत आहे. काल झालेल्या पावसामध्ये हजारो हेक्टर शेतीचे नुकसान झालंय. जवळपास 125 जनावरं दगावली आहेत..
6/10

नांदेडमधील लेह धरणाच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे. कर्नाटक भागातून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलाय आहे. परिणामी, लडो नदीच्या पाणी पातळीत लक्षणीय वाढ झालेली असून काही गावांमध्ये पूर परिस्थिती निर्माण झालीये.
7/10

पुनर्वसित रावनगाव, भासवाडी,हासना या गावांतील काही नागरिक मूळ ठिकाणी वास्तव्यास राहत असल्यामुळे पुराच्या पाण्यात अडकण्याच्या घटना घडल्या आहेत.
8/10

दरम्यान, पावसामुळे अडकलेल्या लोकांसाठी मुखेड तालुक्यातील गावांमध्ये बचावकार्य सुरु करण्यात आलंय.
9/10

जवळपास 225 नागरिकांना सुखरूप बाहेर काढण्यास बचाव पथकाला यश आलंय.
10/10

शोथ व बचाव कार्यासाठी सैन्य दलाला प्राचारण करण्यात आले आहे.
Published at : 18 Aug 2025 01:06 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
क्रीडा
राजकारण
नागपूर
व्यापार-उद्योग























