एक्स्प्लोर
PHOTO : मनोज जरांगेंसाठी 'मराठे एकवटले'; आंदोलनातील अंगावर शहारे आणणारे दृष्य
पुणे : मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीसाठी जालना जिल्ह्यातून निघालेली मनोज जरांगे (Manoj Jarange) यांची पायी दिंडी पुण्यात दाखल झाली आहे.

Manoj Jarange Mumbai Rally Live Photo
1/9

जालना, बीड आणि अहमदनगर असे तीन जिल्ह्यांचा प्रवास करून जरांगे पुणे जिल्ह्यात दाखल झाले आहेत.
2/9

तिसऱ्या दिवशी म्हणजेच 22 जानेवारीचा मुक्काम त्यांनी रांजणगाव गणपती येथे केला. आज सकाळी पुन्हा 10 वाजता जरांगे हे लाखो मराठ्यांसह मुंबईकडे निघाले असून, आज रात्रीचा मुक्काम पुण्यातच होणार आहे.
3/9

आज दुपारच भोजन भीमा कोरेगाव येथे केले जाणार आहे. तर, आजचा मुक्काम पुणे जिल्ह्यातील चंदननगर येथे केला जाणार आहे. आज आणि उद्याचा प्रवास करून 26 जानेवारीला मनोज जरांगे मुंबईत धडकणार आहे.
4/9

मनोज जरांगे यांची पायी दिंडी पुण्यात दाखल झाली आहे. मनोज जरांगे यांनी दिलेल्या हाकेला प्रतिसाद देत राज्यभरातील आंदोलक त्यांच्या पायी दिंडीत सहभागी झाले आहेत.
5/9

या आंदोलनात मराठवाड्यासह विदर्भातील मराठा समाजबांधव सहभागी होतांना पाहायला मिळत आहे. मराठा आरक्षण पायी दिंडीत तरुणांसह वयस्कर नागरिक देखील मोठ्याप्रमाणात पाहायला मिळत आहे.
6/9

आंदोलनात सहभागी मराठा बांधवांनी राहण्याची आणि खाण्या-पिण्याची देखील सर्व सोय आपल्या गाडीतच केली आहे.
7/9

आंदोलनाला उशीर झाल्यास अन्नधान्य कमी पडू नयेत यासाठी त्यांनी एक महिना पुरेल एवढ्या प्रमाणात गरजेचे गोष्टी आणल्या आहेत.
8/9

तर आता कितीही दिवस लागले तरीही आरक्षण घेतल्याशिवाय परत जाणार नसल्याची भूमिका या आंदोलकांनी बोलून दाखवली.
9/9

या आंदोलनात सहभागी झालेला प्रत्येक आंदोलन मिळेल त्या गाडीने दाखल होतांना पाहायला मिळत आहे. तसेच, आरक्षण घेतल्याशिवाय आता माघार घेणार नसल्याची भूमिका प्रत्येकजण बोलावून दाखवत आहेत.
Published at : 23 Jan 2024 06:19 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
राजकारण
आयपीएल
बीड
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
