एक्स्प्लोर
Gaganyaan Mission : इस्रोच्या गगनयान चाचणी यशस्वी, जाणून घ्या मोहिमविषयी!
Gaganyaan Mission Test Flight Launch: गगनयानाच्या प्रो मॉड्युलची चाचणी यशस्वी झाली असून इस्रोनो गगनयान मोहिमेमध्ये आपलं आणखी एक पाऊल पुढे टाकलं आहे.

Gaganyaan Mission
1/8

मोठ्या अडथळ्यांची शर्यत आणि आव्हानांचा सामना करुन अखेर भारताच्या ‘गगनयान’च्या (Gaganyaan) प्रो मॉड्युलनं गगनभरारी घेतली.(Photo Credit : PTI)
2/8

भारतीय अंतराळ संस्था इस्रो गगनयान मोहिमेच्या क्रू एस्केप सिस्टमची चाचणी घेणार आहे. यासाठी पहिली मोठी चाचणी होणार आहे. (Photo Credit : PTI)
3/8

इस्रोसाठी आजचा दिवस खूप महत्त्वाचा आहे. गगनयान मोहिमेची पहिली मोठी चाचणी आज यशस्वीरित्या पार पडली. गगनयान मोहीम यशस्वी करण्यासाठी इस्रोचे शास्त्रज्ञ पूर्ण तयारी करत आहेत.(Photo Credit : PTI)
4/8

रविवारी सकाळी 10 च्या सुमारास इस्रोच्या श्रीहरीकोटा इथल्या सतीश धवन अंतराळ केंद्रावरुन गगनयानचं क्रू मॉडेल लाँच करण्यात आलं. यालाच टेस्ट व्हिकल अबॉर्ट मिशन-1(Test Vehicle Abort Mission -1) आणि टेस्ट व्हिकल डेवलपमेंट फ्लाईट (TV-D1) असंही म्हणलं जात आहे.(Photo Credit : PTI)
5/8

इस्रोच्या गगनयान मोहिमेअंतर्गत श्रीहरीकोटा इथे काही क्षणात पहिलं चाचणी उड्डाण प्रक्षेपित करण्यात आलं.(Photo Credit : PTI)
6/8

आधी ही चाचणी खराब हवामान आणि तांत्रिक कारणामुळे रद्द करण्याची घोषणा झाली होती. मात्र आता तांत्रिक अडचणी दूर करण्यात आल्या असून उड्डाण चाचणी सकाळी दहा वाजता करण्यात आली.(Photo Credit : PTI)
7/8

गगनयान मोहिमेदरम्यान अंतराळवीरांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी हे चाचणी उड्डाण करण्यात येणार आहे. या चाचणी दरम्यान मॉड्यूल अंतराळात नेलं जाईल.(Photo Credit : PTI)
8/8

अंतराळात ते ठराविक उंचीपर्यंत नेऊन पुन्हा पृथ्वीवर परत आणून बंगालच्या उपसागरात उतरवले जाईल. इस्रोकडून या उड्डाण चाचणीला अबॉर्ट टेस्ट असं नाव देण्यात आलं आहे.(Photo Credit : PTI)
Published at : 22 Oct 2023 02:14 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
निवडणूक
भारत
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
