एक्स्प्लोर
PHOTO : 'फँड्री'तला जब्या येतोय... सोमनाथचा बदललेला लूक पाहून हैराण व्हाल!

PHOTO
1/10

दिग्दर्शक नागराज मंजुळे वेगळ्या धाटणीच्या चित्रपटांसाठी ओळखले जातात. त्यांनी आपल्या सिनेमांमधून अनेक नव्या चेहऱ्यांना स्टार बनवलं.
2/10

त्यातलाच एक चेहरा म्हणजे 'फँड्री'तला जब्या अर्थात सोमनाथ अवघडे. पहिल्याच सिनेमात उत्कृष्ट अभिनयासाठी सोमनाथ अवघडे याच्या ‘जब्या’च्या भूमिकेला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता.
3/10

त्यानंतर हा अभिनेता दुसऱ्या कोणत्याही चित्रपटात दिसला नाही. पण आता तो पु्न्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
4/10

‘फ्री हिट दणका’या मराठी चित्रपटात सोमनाथ पुन्हा एकदा झळकणार आहे. या चित्रपटात तो हटके भूमिकेत असून त्याचा वेगळा लुक देखील चर्चेत आला आहे.
5/10

‘फ्री हिट दणका’हा चित्रपट येत्या 16 एप्रिल रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
6/10

या चित्रपटात सैराट फेम अरबाज आणि तानाजी देखील दिसणार आहे.
7/10

‘फँड्री’तील सोमनाथची जब्याची भूमिका पाहून पाहून मिस्टर परफेक्शनिस्ट भारावला होता. आमिर खानने सोमनाथचं तोंड भरून कौतुक केलं होतं.
8/10

'फँड्री'मध्ये जब्या अर्थात सोमनाथ, पिऱ्या म्हणजे सूरज पवार आणि शालू म्हणजे राजेश्वरी खरात या तिघांनी जबरदस्त अभिनय केला होता.
9/10

'फँड्री'साठी सोमनाथ तयार नव्हता. त्याला या चित्रपटासाठी कसं तयार केलं याचे किस्से त्याने आणि नागराज मंजुळे यांनी अनेकदा सांगितले आहेत.
10/10

मी 'फँड्री'साठी तयार नव्हतो. त्यामुळे जेव्हा मला याबाबत लोक विचारायला यायचे. मी तिथून पळून जायचो, गावाच्या टाकीवर जाऊन बसायचो, असं सोमनाथनं सांगितलं होतं.
Published at : 19 Mar 2021 08:56 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बातम्या
राजकारण
करमणूक
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
