एक्स्प्लोर

Abu Azmi : औरंगजेबबाबतचं वक्तव भोवलं, आमदार अबू आझमींवर गुन्हा दाखल

Abu Azmi : औरंगजेबबाबतचं वक्तव भोवलं, आमदार अबू आझमींवर गुन्हा दाखल

Abu Azmi : औरंगजेबबाबतचं वक्तव सपाचे आमदार अबू आझमी यांना चांगलंच भोवलंय. अबू आझमी यांच्या विरोधात ठाण्याच्या वागळे इस्टेट पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के यांनी दिलेल्या तक्रारीनंतर वागळे इस्टेट पोलिसांनी बीएनएस २९९,३०२,३५६(१),३५६(२) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. 

मरीन ड्राइव्ह परिसरात सपाचे आमदार अबू आझमी यांनी माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत औरंगजेब उत्तम प्रशासक असल्याचे म्हटले होते. यासह केलेल्या अन्य वक्तव्यामुळे धार्मिक भावना दुखावल्याने खासदार म्हस्केंनी दिलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. 

फिर्यादीत काय काय म्हटलंय? 

समाजवादी पक्षाचे विदयमान आमदार अबु असीम आझमी यांनी आज दि. 03/03/2025 रोजी 15:00वा. चे सुमारास महाराष्ट्र राज्याचे विधानभवनाचे परिसरात, मरीन ड्राइव्ह, मुंबई या ठिकाणी प्रसारमाध्यमांना मुलाखत दिली असून त्यांनी त्यांचे मुलाखतीमध्ये औरंगजेबाच्या राज्यकारभारावर स्तुतीसुमने उधळली आहेत. त्यामध्ये त्यांनी औरंगजेब हा उत्तम प्रशासक असल्याचे बोलुन औरंगजेबाच्या काळात भारताला ' सोने की चिडीया' असे बोलले जात होते. तसेच औरंगजेबाच्या राजवटीत भारताचा जी.डी.पी. 24 टक्के होता. त्यामुळेच इंग्रज भारतात आले असे अबु आझमी बोलले. औरंगजेबाने हिंदुच्यांच देशामध्ये हिंदू धर्मियांना देवाचे दर्शन करण्यासाठी जिजिया कर लावुन हिंदुची लुट केली अशा लुटारु औरंगजेबाला अबु आझमी चांगला शासक म्हणतात. सदर मुलाखतीमध्ये अबु आझमी याने " हमने जो पढ़ा है हमने जो पढ़ा है हमने जो देखा है औरंगजेब रहमतउल्ला अल वो कभी भी वो ऐसे शासक थे की उन्होंने कभी भी शासन का एक रूपया नही लिया अपने अपने के लिये उन्होने जो है उनकी उनके सर उनकी जो है सरकार मे भारतवर्ष की सरहद जो थी बर्मा, अफगाणीस्तान तक थी, देश सोने की चिडिया उनके जमाने में था लोगो के घरो मे सोना था इसलिए अग्रेज यहॉपर देश आया में समजता हूँ की वह शासन अच्छा कर रहे थे बाकी उनकी फौज मे हिंदु जो कमांडर हिंदु कमांडर थे यह कोई हिंदु-मुस्लीम की लडाई नही थी" असे बोलुन सकल हिंदु बांधवांच्या भावना दुखावल्या आहेत. तसेच पत्रकारांच्या प्रश्नावर उत्तर देतांना अबू आझमी याने भारतीय सत्ताधारी पक्षांविशयी बोलतांना" यह जो लोग है देश के अंदर मुसलमानो को तबाह बरबाद कर देना चाहते है" असे बोलुन हिंदु-मुस्लीम धर्मियांमध्ये तेढ निर्माण केली आहे. वास्तविक पाहता औरंगजेबाने हिंदुची मंदीरे तोडली, गरीबांवर अन्याय अत्याचार केले. देव देश आणि धर्मासाठी छत्रपती संभाजी महाराजांचे बलिदान कोणीही विसरू शकत नाही असे असतांना औरंगजेबाने 40 दिवस छत्रपती संभाजी महाराजांचे हाल केले व धर्म परिवर्तनासाठी जुलुम जबरदस्ती केली. रयतेवर केलेले अगणित अन्याय, देव धर्माची विटंबना करणा-या औरंगजेबाचा कारभार हा भारतीय इतिहासातील काळा अध्याय आहे, असे असतांनाही व अबु आझमी यांनी औरंगजेबाची स्तुती करून हिंदु धर्मीयांच्या भावना दुखावल्या असून सत्ताधारी पक्ष देशातील मुसलमानांना बरबाद करत असल्याचे बोलुन सत्ताधारी पक्षाची बदनामी करून हिंदु-मुस्लीम धर्मियांच्या भावना दुखावल्या आहेत. म्हणून माझी अबू असीम आझमी, वय- 69 वर्षे, राहणार- 4/58, कमलमेंशन, 4 था माळा, हाजर्जीनियाज अहमद आझमी मार्ग, कुलाबा, मुंबई - 400005 याचे विरोधात तक्रार आहे.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

Anjali Damania : काळीज पिळवटून टाकणारे देशमुख हत्येचे फोटो, दमानियांचा कंठ दाठला,म्हणाल्या; तरीही कराडला जेलमध्ये व्हिआयपी ट्रीटमेंट

About the author सुरज सावंत

सुरज सावंत हे जवळपास 10 वर्षांपासून माध्यमात कार्यरत आहेत. राजकारण, क्राईम यावर त्यांचा विशेष पकड आहे.
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Sarita Mhaske : मुंबईतील ठाकरे गटाची पहिली नगरसेविका फुटली, उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, कुणाच्या गळाला लागली?
मुंबईतील ठाकरे गटाची पहिली नगरसेविका फुटली, उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, कुणाच्या गळाला लागली?
मुंबईतील कंपन्यांशी स्वित्झर्लंडमध्ये जाऊन करार का? दावोस दौऱ्यावरुन काँग्रेसचा सवाल, कंपन्यांचा मुंबईतला पत्ताच सांगितला
मुंबईतील कंपन्यांशी स्वित्झर्लंडमध्ये जाऊन करार का? दावोस दौऱ्यावरुन काँग्रेसचा सवाल, कंपन्यांचा मुंबईतला पत्ताच सांगितला
Julia Ain: 'माझ्या स्तनांमुळे मला अमेरिकेचा O-1B व्हिसा मिळाला' सोशल मीडिया स्टारची बेधडक प्रतिक्रिया का चर्चेत आली?
'माझ्या स्तनांमुळे मला अमेरिकेचा O-1B व्हिसा मिळाला' सोशल मीडिया स्टारची बेधडक प्रतिक्रिया का चर्चेत आली?
केडीएमसीमध्ये मनसे-शिवसेना एकत्र आली, ठाकरेंच्या शिवसेनेची पहिली प्रतिक्रिया; राऊत म्हणाले, राज ठाकरेंशी बोललो
केडीएमसीमध्ये मनसे-शिवसेना एकत्र आली, ठाकरेंच्या शिवसेनेची पहिली प्रतिक्रिया; राऊत म्हणाले, राज ठाकरेंशी बोललो

व्हिडीओ

Raju Patil MNS on KDMC : सत्तेला चिकटलो तर काहीतरी मिळेल!मनसेचे राजू पाटलांचं धक्कादायक वक्तव्य
Adv Asim Sarode Pune : धनुष्यबाण निवडणूक चिन्ह उद्धव ठाकरेंच्या गटाला मिळणार?असीम सरोदे काय म्हणाले?
Raju Patil On Shiv Sena Mns Alliance In KDMC :राज ठाकरेंनी स्थानिक पातळीवर निर्णय घेण्याचे आदेश दिले, राजू पाटलांची महिती
Samadhan Sarvankar Mumbai :भाजपच्या टोळीने पराभव केला,सरवणकर ठाम;सायबर विभागात तक्रार करणार
Anil Galgali On Mumbai Mayor :मुंबई महापौर पदासाठी 114 चा ‘जादुई आकडा’ आवश्यक नाही, वस्तुस्थिती काय?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sarita Mhaske : मुंबईतील ठाकरे गटाची पहिली नगरसेविका फुटली, उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, कुणाच्या गळाला लागली?
मुंबईतील ठाकरे गटाची पहिली नगरसेविका फुटली, उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, कुणाच्या गळाला लागली?
मुंबईतील कंपन्यांशी स्वित्झर्लंडमध्ये जाऊन करार का? दावोस दौऱ्यावरुन काँग्रेसचा सवाल, कंपन्यांचा मुंबईतला पत्ताच सांगितला
मुंबईतील कंपन्यांशी स्वित्झर्लंडमध्ये जाऊन करार का? दावोस दौऱ्यावरुन काँग्रेसचा सवाल, कंपन्यांचा मुंबईतला पत्ताच सांगितला
Julia Ain: 'माझ्या स्तनांमुळे मला अमेरिकेचा O-1B व्हिसा मिळाला' सोशल मीडिया स्टारची बेधडक प्रतिक्रिया का चर्चेत आली?
'माझ्या स्तनांमुळे मला अमेरिकेचा O-1B व्हिसा मिळाला' सोशल मीडिया स्टारची बेधडक प्रतिक्रिया का चर्चेत आली?
केडीएमसीमध्ये मनसे-शिवसेना एकत्र आली, ठाकरेंच्या शिवसेनेची पहिली प्रतिक्रिया; राऊत म्हणाले, राज ठाकरेंशी बोललो
केडीएमसीमध्ये मनसे-शिवसेना एकत्र आली, ठाकरेंच्या शिवसेनेची पहिली प्रतिक्रिया; राऊत म्हणाले, राज ठाकरेंशी बोललो
निवडणुकीत शिवसेनेनं मोठा त्याग केला, कोल्हापूरचा महापौर शिवसेनेचाच होईल : राजेश क्षीरसागर
निवडणुकीत शिवसेनेनं मोठा त्याग केला, कोल्हापूरचा महापौर शिवसेनेचाच होईल : राजेश क्षीरसागर
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात राहणाऱ्या आदिवासी समाजाला वन विभागाची नोटीस; घरं रिकामं करण्यास सांगण्यात आलं, बस सेवा बंद केल्याचा आरोप
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात राहणाऱ्या आदिवासी समाजाला वन विभागाची नोटीस; घरं रिकामं करण्यास सांगण्यात आलं, बस सेवा बंद केल्याचा आरोप
KDMC Election 2026 Shivsena MNS Alliance: आधी एकमेकांच्या लाजा काढल्या, आता मनसेचे राजू पाटील लाज सोडून म्हणतात, 'सत्तेला चिकटलो तर काहीतरी मिळेल!'
आधी एकमेकांच्या लाजा काढल्या, आता मनसेचे राजू पाटील लाज सोडून म्हणतात, 'सत्तेला चिकटलो तर काहीतरी मिळेल!'
शिंदेंच्या शिवसेनेला मनसेचा पाठिंबा; बाळा नांदगावकरांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, भविष्यात काहीही होऊ शकतं
शिंदेंच्या शिवसेनेला मनसेचा पाठिंबा; बाळा नांदगावकरांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, भविष्यात काहीही होऊ शकतं
Embed widget