एक्स्प्लोर
"त्यांच्या फिल्ममध्ये एक छोटासा रोल मिळाला, तर मी तयार"; सैफला रुग्णालयात घेऊन जाणाऱ्या ऑटो ड्रायव्हर भजन सिंह राणाची इच्छा
Saif Ali Khan Met Auto Driver: सैफ अली खाननं त्याचा जीव वाचवणाऱ्या ऑटो ड्रायव्हरची भेट घेऊन त्याचे आभार मानले. दोघांच्या भेटीचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

Saif Ali Khan Met Auto Driver
1/8

मंगळवारी सैफ अली खाननं रुग्णालयात ऑटो चालक भजन सिंह राणा यांची भेट घेतली. जिथे सैफ आणि त्याच्या आईनं भजन सिंह यांचे आभार मानले.
2/8

सैफनं आवर्जुन भेट घेऊन विचारपूस केली आणि आभार मानले, हे पाहून भजन सिंह खूप आनंदी आहे. यावर बोलताना ऑटो ड्रायव्हर म्हणाला की, सर्वांनी त्यांचे आभार मानले आणि नमस्ते म्हटलं, ज्यामुळे त्यांना खूप आनंद झाला. सैफनं मला पुन्हा भेटण्याचं आश्वासन दिलं आणि सांगितलं की, जेव्हा जेव्हा मला काही मदत लागेल, तेव्हा माझी आठवण नक्की काढ...
3/8

भजन सिंह म्हणाला की, त्यांचं आयुष्य बदललं आहे. लोक त्याला खूप आदर, सन्मान देऊ लागले आहेत. सैफ अली खान आणि त्यांची आई शर्मिला टागोर यांची नम्रता पाहुन मला खूप आनंद झाला आहे.
4/8

घटनेच्या दिवशी रात्री काय घडलं ते सांगताना, सैफ म्हणाला की, तू रिक्षा इतक्या वेगानं चालवत होतास की, त्यामुळे मला जास्त वेदना होत होत्या, पण तू मला तिथे लवकर घेऊन गेलास. त्यासाठी तुझे आभार.
5/8

भजन सिंह राणा म्हणाला की, जर तो सैफचा ड्रायव्हर बनला किंवा त्याच्या चित्रपटात छोटासा रोल मिळाला तर तो त्यासाठी तयार आहे.
6/8

मंगळवारी रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर सैफ घरी परतला असून डॉक्टरांनी त्याला एक महिना बेड रेस्ट घेण्याचा सल्ला दिला आहे.
7/8

सैफच्या पाठीच्या कण्यावर शस्त्रक्रिया झाली आहे. त्यानंतर त्याला विशेष काळजी घेण्याचा सल्लाही डॉक्टरांनी दिला आहे.
8/8

या घटनेनंतर सैफ आणि त्याच्या संपूर्ण कुटुंबाची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. मुंबई पोलिसांनी त्यांची सुरक्षा वाढवली आहे.
Published at : 23 Jan 2025 07:08 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
बुलढाणा
बॉलीवूड
ट्रेडिंग न्यूज
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
