Russia-Ukraine Conflict : "क्योंकि हिम्मत से हमारी पुरानी यारी है", मिशन एअरलिफ्टसाठी AIR INDIA सज्ज
Russia Ukraine Conflict : युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठी AIR INDIA ची विशेष विमान दिल्ली आणि मुंबईतून जाणार आहे.
Russia Ukraine Conflict : सध्या रशिया-युक्रेन सीमेवर (Russia-Ukraine Conflict) युद्ध सुरू आहे. रशिया-युक्रेनमधल्या या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारला युक्रेनमध्ये वास्तव्याला असलेल्या आपल्या नागरिकांची चिंता आहे. युद्धामुळे युक्रेनमध्ये अडकलेल्या हजारो भारतीयांसाठी आनंदाची बातमी आहे. या लोकांच्या सुटकेसाठी भारत सरकारने एअर इंडियाची 2 विमाने पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. एअर इंडियाने ट्विट करत ही माहिती दिली आहे.
भारत सरकारने AIR INDIA चं 1 B787 हे विशेष विमान दिल्ली आणि मुंबईतून जाणार आहे. युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना मायदेशी आणण्याच्या प्रयत्नांना वेग आला असून रोमानियाची राजधानी बुखारेस्ट आणि हंगेरीची राजधानी बुडापेस्टसाठी एअर इंडियाची दोन विमाने 26 फेब्रुवारीला रवाना होणार आहे. एअर इंडियाने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, टाटा समुहाचे आणि एअर इंडियाचे राष्ट्रहितासाठी उभे राहण्याचे समान ध्येय गाठण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. आमचे कर्मचारी देखील या ऑपरेशनसाठी उत्सुक आहेत. राष्ट्रहित हे आपले ध्येय आहे. आपण नाही केले तर कोण करणार?
#FlyAI : @TataCompanies pic.twitter.com/f3lyxD08nX
— Air India (@airindiain) February 25, 2022
युक्रेनमधील सीमाभागाजवळ असणाऱ्या चेकपोस्टवरून पश्चिमेकडून अडकलेल्या भारतीयांना बाहेर काढण्यात येणार आहे. त्यानंतर बुडापेस्ट येथून विशेष विमानं असणार आहे. हंगेरी, पोलंड, रोमानियासह अनेक देशांमार्गे युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना बाहेर काढणार आहे. सीमा भागात असणाऱ्या भारतीयांना प्राधान्य दिले जाणार आहे. भारतीयांना बाहेर पडताना आपल्या कॉन्ट्रॅक्टरसोबत संपर्कात राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहे. तसेच सीमा भागाकडे येताना पासपोर्ट, कॅश (अमेरीकी डाॅलर) आणि इतर गरजू वस्तू सोबत ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत तसेच प्रवास करण्यासाठी बाहेर पडताना गाडी किंवा बसवर भारताचा झेंडा लावावा अशा भारतीयांना प्रमुख सूचना दिला आहे. मागच्या वर्षी अफगाणिस्तानातून भारतीय नागरिकांना सुरक्षित आणण्यासाठी इंडियन एअर फोर्सने आपली विशेष विमान पाठवली होती.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- Russia Ukraine Conflict : 'जसा भारतासाठी पाकिस्तान, तसा रशियासाठी युक्रेन'
- Russia Ukraine War : सायकलस्वारावर आदळला रशियन तोफेचा गोळा; युक्रेन हल्ल्याचा व्हिडिओ व्हायरल
- Russia Ukraine War Highlights : घनघोर युद्ध; रशियन फौजा युक्रेनच्या राजधानीजवळ दाखल, जाणून घ्या महत्त्वाच्या घडामोडी