Sikandar Box Office Day 4: 'छावा'ला पछाडता पछाडता, स्वतःच गळपटला 'सिकंदर'; 100 कोटींचा टप्पा गाठताना नाकी नऊ
Sikandar Box Office Collection: 'सिकंदर' बॉक्स ऑफिसवर खूपच खराब कामगिरी करत आहे. चित्रपटाची सुरुवात चांगली झाली असली तरीसुद्धा, चित्रपटाला संमिश्र प्रतिसाद मिळत असल्याचं पाहायला मिळत आहे. चौथ्या दिवशी मात्र चित्रपटाच्या कमाईला मोठा फटका बसला आहे.

Sikandar Box Office Collection Day 4: बॉलिवूडचा दबंग भाईजान सलमान खान (Salman Khan) आणि रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) स्टारर 'सिकंदर' (Sikandar) ईदनिमित्त प्रेक्षकांच्या भेटीला आला. पण, नुकत्याच रिलीज झालेल्या या चित्रपटानं मात्र, अवघ्या चारच दिवसांत बॉक्स ऑफिसवर (Box Office) गटांगळ्या खायला सुरुवात केली आहे. चित्रपटाची सुरुवात चांगली झाली असली तरी त्याला संमिश्र आणि नकारात्मक प्रतिक्रिया मिळाल्या. त्यानंतर ईदच्या दिवशीही त्याच्या कमाईत वाढ झाली पण त्यानंतर मात्र कलेक्शन फारच कमी होऊ लागलं. 'सिकंदर'नं रिलीजच्या चौथ्याच दिवशी किती कोटी कमावले?
'सिकंदर'नं चौथ्या दिवशी किती कमावले?
'सिकंदर' हा त्या वर्षातील बहुप्रतिक्षित चित्रपट होता. 'सिकंदर'ची लोकप्रियता पाहून असं वाटत होतं की, हा चित्रपट बॉक्स ऑफिसवरील सर्व रेकॉर्ड तोडेल. पण थिएटरमध्ये आल्यानंतर तो प्रेक्षकांच्या अपेक्षा पूर्ण करू शकला नाही. 'सिकंदर'ची बॉक्स ऑफिसवरची कामगिरी खूपच सुमार आहे. या चित्रपटाला ना बंपर ओपनिंग मिळाली आणि ना ईदच्या निमित्तानं चांगलं कलेक्शन करता आलं. आता चित्रपटाच्या कमाईत मोठी घसरण नोंदवली जात आहे. सॅक्निल्कच्या अहवालानुसार, 'सिकंदर'चं कलेक्शन...
- 'सिकंदर'नं रिलीजच्या पहिल्या दिवशी 26 कोटी रुपये कमावले होते.
- दुसऱ्या दिवशी चित्रपटाचं कलेक्शन 29 कोटी रुपये होतं.
- तिसऱ्या दिवशी 'सिकंदर'नं 19.5 कोटी रुपयांचा व्यवसाय केला.
- आता चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या चौथ्या दिवशीच्या कमाईचे सुरुवातीचे आकडे समोर आले आहेत.
- सॅक्निल्कच्या सुरुवातीच्या ट्रेंड रिपोर्टनुसार, 'सिकंदर'नं रिलीजच्या चौथ्या दिवशी 9.75 कोटी रुपये कमावले आहेत.
- यासह, 'सिकंदर'ची चार दिवसांत एकूण कमाई आता 84.25 कोटी रुपये झाली आहे.
View this post on Instagram
'सिकंदर'ला 100 कोटींचा टप्पा गाठणंही अशक्य
'सिकंदर' बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला आहे. 'सिकंदर' रिलीज होण्यापूर्वी 'छावा'चा रेकॉर्ड मोडणार अशा चर्चा रंगल्या होत्या. पण, 'सिकंदर' बॉक्स ऑफिसवर एवढा जोरात आपटलाय की, दिवसेंदिवस त्याच्या कमाईत कमालीची घट पाहायला मिळत आहे. रिलीजच्या चौथ्या दिवशीच 'सिकंदर'ची कमाई सिंग डिजिटवर पोहोचली आहे. सातत्यानं घटणाऱ्या कमाईकडे पाहिलं तर, 'सिकंदर'चं आता बजेट वसूल करणंही अवघड होऊन बसलं आहे. अशातच निर्मात्यांना आशा आहे की, येत्या विकेंडला 'सिकंदर'च्या कमाईत वाढ होण्याची शक्यता आहे. जरी असं झालंच, तरीसुद्धा चित्रपटाच्या कमाईत फारसा फरक पडेल, असं वाटत नाही.
महत्त्वाच्या इतर बातम्या :























