एक्स्प्लोर
(Source: ECI | ABP NEWS)
Nagpur Crime News: पावसामुळे लाईट गेली! चोरांनी डाव साधला, व्यापाऱ्याने कारमध्ये ठेवलेलं 1 कोटीचं सोनं कारसह पळवलं, नागपुरातील घटना
Nagpur Crime News: पावसामुळे लाईट गेली! घरी जाण्यासाठी सराफा व्यापाऱ्याने 1 कोटीचे दागिने कारमध्ये ठेवले, चार ते पाच जणांनी धमकावत हवेत गोळीबार करत ऐवजासह कार केली गायब
Nagpur Crime News
1/5

नागपुरातील खापरखेडा पोलीस स्टेशन अंतर्गत पिपळा डाग बंगला या ठिकाणी सराफा व्यापाराची तब्बल 1 कोटी 15 लाखांची लूट करण्यात आली आहे.
2/5

पिपळा डाग बंगला येथे निहारिका ज्वेलर्स नावाने दुकान असलेले रवी मुसळे यांचे सोन्या चांदीच्या दागिन्यांचे दुकान आहे, काल रात्री परिसरात पाऊस सुरू झाल्याने रस्त्यावरील पथदिवे बंद होते.
3/5

रवी मुसळे त्याच्या एका नातेवाईकांसह दुकान बंद करून घराकडे परत निघाले असता त्यांनी तब्बल 1 किलो सोने आणि 15 किलो चांदी असलेली बॅग त्यांच्या दुकानासमोर उभ्या असलेल्या कार मध्ये ठेवली.
4/5

दोघेही कारमध्ये बसून घराकडे निघणार त्याच्या आधीच चार ते पाच जणांनी त्या ठिकाणी येऊन दोघांना जबर मारहाण केली आणि बंदुकीचा धाक दाखवत हवेत गोळीबार केला.
5/5

त्यानंतर लुटारू रवी मुसळे यांची कार घेऊन सोने-चांदीची बॅगसह पसार झाले. नागपूर पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे लुटारूंचा शोध सुरू केला असून अद्याप त्यांना पकडण्यात यश आलेलं नाही.
Published at : 03 Apr 2025 08:22 AM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
महाराष्ट्र
नाशिक
क्राईम
























