(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Russia-Ukraine Conflict : भारत सरकारचं मिशन एअरलिफ्ट, AIR INDIA चे दोन विशेष विमान तयार ठेवण्याचे आदेश
Russia Ukraine Conflict : युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठी भारत मिशन AIRLIFT राबवणार आहे.
Russia Ukraine Conflict : सध्या रशिया-युक्रेन सीमेवर (Russia-Ukraine Conflict) मोठा तणाव आहे. रशिया-युक्रेनमधल्या या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारला युक्रेनमध्ये वास्तव्याला असलेल्या आपल्या नागरिकांची चिंता आहे. त्यासाठीच भारताने मिशन AIRLIFT सुरू करणार आहे. युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठी दोन विमान पाठवणार आहे.
भारत सरकार AIR INDIA चे दोन विमान युक्रेनमध्ये पाठवणार आहे. एक विमान मुंबईतून आणि एक दिल्लीतून युक्रेनमध्ये पाठवणार आहे. युक्रेनमधून भारतीयांना सुरक्षित आणण्यासाठी AIR INDIA च्या दोन विमांनाना तयार राहण्याचे आदेश दिले आहे. ही विमाने मुंबई आणि दिल्लीहून बुडापेस्टला पाठवण्यात येणार आहेत. भारत सरकारने याआधी सुद्धा युद्धग्रस्त प्रदेशातून भारतीय नागरिकांना सुरक्षित आणण्यासाठी मिशन एअरलिफ्ट राबवलं आहे. एअर इंडियाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कोणत्या मार्गाने भारतीयांना एअरलिफ्ट करण्यात येणार याची माहिती दिलेली नाही. युक्रेनमधील सीमाभागाजवळ असणाऱ्या चेकपोस्टवरून पश्चिमेकडून अडकलेल्या भारतीयांना बाहेर काढण्यात येणार आहे. त्यानंतर बुडापोस्ट येथून विशेष विमानं असणार आहे.
मागच्यावर्षी अफगाणिस्तानातून भारतीय नागरिकांना सुरक्षित आणण्यासाठी इंडियन एअर फोर्सने आपली विशेष विमान पाठवली होती. हंगेरी, पोलंड, रोमानियासह अनेक देशांमार्गे युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना बाहेर काढणार आहे. सीमा भागात असणाऱ्या भारतीयांना प्राधान्य दिले जाणार आहे. भारतीयांना बाहेर पडताना आपल्या कॉन्ट्रॅक्टरसोबत संपर्कात राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहे. तसेच सीमा भागाकडे येताना पासपोर्ट, कॅश (अमेरीकी डाॅलर) आणि इतर गरजू वस्तू सोबत ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत तसेच प्रवास करण्यासाठी बाहेर पडताना गाडी किंवा बसवर भारताचा झेंडा लावावा अशा भारतीयांना प्रमुख सूचना दिला आहे.
संबंधित बातम्या :