एक्स्प्लोर

Russia Ukraine Conflict : हवाई प्रवास महागणार; युक्रेन-रशिया युद्धामुळे हवाई इंधनाच्या किमती विक्रमी पातळीवर

Air Travel Price Hike : महागड्या कच्च्या तेलामुळे तेल कंपन्यांनी हवाई इंधनाच्या किमती वाढवल्या आहेत, त्यामुळे हवाई प्रवास महाग होऊ शकतो. दोन महिन्यांपेक्षा कमी कालावधीत एटीएफच्या दरात झालेली ही पाचवी वाढ आहे.

Air Travel Price Hike : येत्या काळात हवाई प्रवास महागण्याची शक्यता आहे. विमान कंपन्या विमान प्रवासाचे दर वाढवू शकतात. युक्रेन-रशिया संघर्षामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती वाढल्यामुळे सरकारी तेल कंपन्यांनी विमान इंधनाच्या किमती (ATF) 3.2 टक्क्यांनी वाढवल्या आहेत, त्यानंतर देशातील एटीएफच्या किमती विक्रमी उच्चांकावर पोहोचल्या आहेत. दोन महिन्यांपेक्षा कमी कालावधीत एटीएफच्या किमतीत झालेली ही पाचवी वाढ आहे, परंतु क्रूड महाग होऊनही पेट्रोल आणि डिझेलचे दर सलग 118 व्या दिवशी स्थिर राहिले.

सार्वजनिक क्षेत्रातील पेट्रोलियम कंपन्यांनी सांगितले की, राष्ट्रीय राजधानीत एटीएफ (Air Turbine Fuel) ची किंमत 3.2 टक्क्यांनी वाढून 93,530 रुपये प्रति किलोलीटर झाली आहे. ही एटीएफच्या किंमतीचा सर्वोच्च दर आहे. ऑगस्ट 2008 मध्ये ATF ची किंमत 71,028.26 रुपये प्रति किलोलिटर होती.

आंतरराष्ट्रीय कच्च्या तेलाची किंमत मंगळवारी प्रति बॅरल यूएस डॉलर 147 वर पोहोचली, तेव्हा ब्रेंट क्रूड तेल प्रति बॅरल 100 डॉलरच्या वर होते. तेल कंपन्या दर 15 दिवसांना हवाई इंधनाच्या किमतींचा आढावा घेतात. 15 मार्च रोजी आढावा घेतला जाईल तेव्हा हवाई इंधनाच्या किमती पुन्हा वाढू शकतात, अशी शक्यता वर्तवली आहे.

पेट्रोल, डिझेल आणि हवाई इंधनाच्या किमती ठरवण्याचा अधिकार सरकारी तेल कंपन्यांना आहे. या कंपन्या हवाई इंधनाच्या किमतीत सातत्याने वाढ करत आहेत, मात्र उत्तर प्रदेश आणि पंजाबसारख्या राज्यांतील विधानसभा निवडणुकांमुळे पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ केली जात नाही. मात्र, याबाबत अधिकृतपणे काहीही सांगण्यात आलेले नाही.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Donald Trump : अमेरिका-इराण डील रखडली, इकडे डोनाल्ड ट्रम्प यांना आणखी एक धक्का, ट्रम्प यांनी लावलेलं 10 टक्के टॅरिफ रद्द कोर्टाचा मोठा निर्णय
अमेरिका-इराण डील रखडली, इकडे डोनाल्ड ट्रम्प यांना आणखी एक धक्का, ट्रम्प यांनी लावलेलं 10 टक्के टॅरिफ रद्द, कोर्टाचा मोठा निर्णय
धमक्यांवर धमक्या देत सुटलेल्या ट्रम्पकडून दिलासा; पाकिस्तानच्या विनंतीनंतर इराण युद्धावर मोठी घोषणा; गेल्या 24 तासांतील 5 प्रमुख घडामोडी
धमक्यांवर धमक्या देत सुटलेल्या ट्रम्पकडून दिलासा; पाकिस्तानच्या विनंतीनंतर इराण युद्धावर मोठी घोषणा; गेल्या 24 तासांतील 5 प्रमुख घडामोडी
US Iran War : इराणचा अमेरिकन युद्धनौकेवर हल्ला, होर्मुझच्या सामुद्रधुनीवरुन आरपारची लढाई, युद्ध भडकणार?
इराणचा अमेरिकन युद्धनौकेवर हल्ला, होर्मुझच्या सामुद्रधुनीवरुन आरपारची लढाई, युद्ध भडकणार?
Gujarat Maharashtra Day 2026: सातासमुद्रापार मराठी आणि गुजराती संस्कृतीचा संगम; न्यू यॉर्कमध्ये 'गुजरात-महाराष्ट्र दिन' दिमाखात साजरा
सातासमुद्रापार मराठी आणि गुजराती संस्कृतीचा संगम; न्यू यॉर्कमध्ये 'गुजरात-महाराष्ट्र दिन' दिमाखात साजरा

व्हिडीओ

SSC Result 2026 : भले शाब्बास... दहावीच्या विद्यार्थ्यांची कामगिरी खास! Special Report
Suvendu Adhikari New CM of Bengal : पश्चिम बंगालचे नवे 'अधिकारी'Special Report
MP Jailer Firoza-Prisoner Dharmendra Love Story :जेलर कैद्याची कारगृहातील प्रेमकहाणी Special Report
Nida Khan Arrested Nashik TCS Case : निदा खानची पाठराखण,जलीलांची भूमिका योग्य? Special Report
Chitra Wagh Mumbai : घरातही मुली सुरक्षित राहिलेल्या नाहीत, अत्याचार कोण करतंय तर बाप, मामा, भाऊ

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Misssing Link Mumbai Pune Traffic : ना ट्रॅफिक जाम, ना खोळंबा, मिसिंग लिंकमुळे मोकळा श्वास, वाहतूक कोंडीची धास्ती मिटली
ना ट्रॅफिक जाम, ना खोळंबा, मिसिंग लिंकमुळे मोकळा श्वास, वाहतूक कोंडीची धास्ती मिटली
शरद पवार आजारातून बाहेर, रयत शिक्षण संस्थेच्या अध्यक्षपदी फेरनिवड; भाषणात म्हणाले, आपण कुठं कमी पडलो ते...
शरद पवार आजारातून बाहेर, रयत शिक्षण संस्थेच्या अध्यक्षपदी फेरनिवड; भाषणात म्हणाले, आपण कुठं कमी पडलो ते...
सुरज बोर्डात चमकला; 10 वीच्या परीक्षेत पठ्ठ्याला 35 टक्के गुण; आई-वडिल खुश, ग्रामस्थांकडून सत्कार
सुरज बोर्डात चमकला; 10 वीच्या परीक्षेत पठ्ठ्याला 35 टक्के गुण; आई-वडिल खुश, ग्रामस्थांकडून सत्कार
Vikas Lawande and Sangram Bhandare: शाईफेक प्रकरणात पोलिसांनी गुन्हा दाखल करताच संग्राम भंडारेंची पहिली प्रतिक्रिया म्हणाले, 'विकास लवांडे पिस्तुल लावण्याच्या पात्रतेचा नाही'
शाईफेक प्रकरणात पोलिसांनी गुन्हा दाखल करताच संग्राम भंडारेंची पहिली प्रतिक्रिया म्हणाले, 'विकास लवांडे पिस्तुल लावण्याच्या पात्रतेचा नाही'
Eknath Shinde and PM Modi: शपथविधी शुभेंदू अधिकारींचा, पण एकनाथ शिंदे ठरले शो-स्टॉपर; स्टेजवरील मोदी-शिंदेंच्या केमिस्ट्रीची चर्चा
शपथविधी शुभेंदू अधिकारींचा, पण एकनाथ शिंदे ठरले शो-स्टॉपर; स्टेजवरील मोदी-शिंदेंच्या केमिस्ट्रीची चर्चा
Sangram Jagtap on Vikas Lawande Attack: विकास लवांडे यांच्यावर शाईफेक, संग्राम जगतापांकडून कीर्तनकार भंडारेंच्या कृत्याचं जाहीर समर्थन; म्हणाले, 'आम्ही हिंदुत्ववादी कार्यकर्ते म्हणून...'
विकास लवांडे यांच्यावर शाईफेक, संग्राम जगतापांकडून कीर्तनकार भंडारेंच्या कृत्याचं जाहीर समर्थन; म्हणाले, 'आम्ही हिंदुत्ववादी कार्यकर्ते म्हणून...'
Suvendu Adhikari West Bengal CM Oath Ceremony: शुभेंदू अधिकारी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान, भव्य शपथविधी सोहळ्याला मोदी-शाह, फडणवीस, शिंदे, सुनेत्रा पवारांची हजेरी
शुभेंदू अधिकारी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान, भव्य शपथविधी सोहळ्याला मोदी-शाह, फडणवीस, शिंदे, सुनेत्रा पवारांची हजेरी
Narendra Modi Takes Bless Of Makhanlal Sarkar: नरेंद्र मोदींनी मंचावर पोहोचताच मिठी मारली, पायाही पडले; कोण आहेत माखनलाल सरकार?
नरेंद्र मोदींनी मंचावर पोहोचताच मिठी मारली, पायाही पडले; कोण आहेत माखनलाल सरकार?
Embed widget