Russia Ukraine War : युक्रेनला भारताकडून मदतीचा हात; पहिली खेप आज होणार रवाना
Russia Ukraine War : भारताने युक्रेनला मदत पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. या पूर्व युरोपीय देशात रशियाच्या हल्ल्यामुळे हजारो लोक सीमाभागाकडे निघाले आहेत, त्यामुळे तेथे संकट निर्माण झाले आहे.
Russia Ukraine War : भारताने युक्रेनला मदत पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. या पूर्व युरोपीय देशात रशियाच्या हल्ल्यामुळे हजारो लोक सीमाभागाकडे निघाले आहेत, त्यामुळे तेथे मानवी संकट निर्माण झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचा आढावा घेण्यासाठी एका उच्चस्तरीय बैठक घेण्यात आली. परराष्ट्र मंत्रालयाने बैठकीच्या अध्यक्षतेखाली सांगितले की मंगळवारी युक्रेनला मदत सामग्री पाठवली जाईल.
भारताचे संयुक्त राष्ट्रातील स्थायी प्रतिनिधी टी.एस. तिरुमूर्ती यांनी सांगितले की, 'युक्रेनमधील मानवतावादी गरजा लक्षात घेत भारत सरकारने औषधांसह तत्काळ मदत पुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे. ही मदत मंगळवारी युक्रेनला पाठवण्यात येईल.' युक्रेनमधील घडामोडींबद्दल भारत चिंतेत आहे. हिंसाचार तात्काळ संपवण्याची आमची मागणी तातडीची अत्यावश्यक आहे, असंही त्यांनी म्हटलं आहे.
परराष्ट्र मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे, 'युक्रेनच्या सीमेवरील मानवी संकटाचा सामना करण्यासाठी मदतसामग्रीची पहिली खेप उद्या पाठवली जाईल याची पंतप्रधानांनी दखल घेतली. भारतातील युक्रेनचे राजदूत इगोर पोलिखा यांनी मानवतावादी मदत मागितल्यानंतर भारताने मदत पुरवठ्याची पहिली खेप पाठविण्याची घोषणा करण्यात आली आहे.'
भारताकडून युक्रेनमधून अडकलेल्या भारतीयांना बाहेर काढण्यासाठी सतत प्रयत्न सुरु आहेत. मंगळवारी पहाटे 5.30 वाजता परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी ट्विट करून 'ऑपरेशन गंगा'चे नववे उड्डाण दिल्लीला रवाना झाल्याची माहिती दिली.
त्यांनी ट्विटमध्ये लिहिले की, 'भारतीयांच्या सुरक्षेची खात्री होईपर्यंत प्रयत्न सुरूच राहतील. नववे ऑपरेशन गंगा विमान 218 भारतीय नागरिकांसह बुखारेस्ट येथून नवी दिल्लीला रवाना झाले.'
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- Russia Ukraine War : युक्रेनमधून 2000 भारतीयांना सुखरुप बाहेर काढले, 249 लोकांसह पाचवे विमान दिल्लीला रवाना
- Russia Ukraine War : रशिया-युक्रेन युद्धावर UNGA मध्ये 'आपत्कालीन विशेष सत्र', UNSC मध्ये भारत राहिला मतदानातून बाहेर
- Operation Ganga : युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना मायदेशात आणण्यासाठी केंद्र सरकारचे ‘ऑपरेशन गंगा’
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha