एक्स्प्लोर

EVM वर आक्षेप, बॅलेट पेपरवर निवडणूक घेणाऱ्या मारकडवाडीमध्ये जमावबंदीचे आदेश लागू, मतदान घेता येणार नसल्याचा इशारा

Markadwadi Voting : माळशिरसमधील मारकडवाडीमध्ये मंगळवारी बॅलेट पेपरवर मतदान घेण्याचा निर्णय ग्रामस्थांनी जाहीर केला होता. आता प्रशासनाने त्यावर आक्षेप घेत जमावबंदी लागू केली आहे. 

सोलापूर: माळशिरसमधील मारकडवाडी गावात जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहेत. आज, सोमवारपासून ते 5 डिसेंबरपर्यंत मारकडवाडीमध्ये जमावबंदी लागू करण्यात आले आहेत.  गावात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी प्रशासनाने जमावबंदी लागू केली आहे. मारकडवाडी गावकऱ्यांनी ईव्हीएमवर आक्षेप घेत मंगळवारी 3 डिसेंबर रोजी बॅलेट पेपरवर निवडणूक घेण्याचं जाहीर केलं होतं. 

मारकडवाडीमध्ये मंगळवारी बॅलेट पेपरवर मतदान घेण्याची भूमिका इथल्या ग्रामस्थांनी घेतली. यानंतर जमावबंदी लागू करण्यात आली आहे. निवडणूक आयोगाशिवाय इतर कोणतीही यंत्रणा अशा पद्धतीने मतदान घेऊ शकत नाही असं प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे. त्यामुळे मंगळवारी मतदानाची प्रक्रिया राबल्यास त्या नागरिकांवर कारवाई करण्याचा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे. 

माळशिरच्या निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी विजया पांगरकर यांनी तसे आदेश जाहीर केले आहेत. भारतीय न्याय संहितेचे कलम 163 नुसार ही जमावबंदी लागू करण्यात आली आहे. जर आदेशाचे भंग करून मतदान प्रक्रिया राबविली तर सहभागी होणाऱ्या ग्रामस्थांवर फौजदारी कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

मारकडवाडी गावाला पोलीस छावणीचं स्वरुप

बॅलेट पेपरवर उद्या मतदान प्रक्रिया राबवणाचा निर्णय घेतलेल्या माळशिरसमधील मारकडवाडी गावाला पोलीस छावणीचं स्वरुप आलं आहे. मात्र मतदान प्रक्रिया राबवू नये यासाठी प्रशासनाकडून दबाव टाकण्यात आाल होता. प्रशासनाच्या कठोर भूमिकेनंतर ग्रामस्थांनी बैठक घेतली. आता जमावबंदीच्या पार्श्वभूमीवर मारकटवाडी गावात पोलिसांचा मोठा फौजफाटा गावात दाखल झाल्याने परिस्थिती काहीशी तणावाची बनली आहे.

मतदान बॅलेट पेपरवर घेण्याचा निर्णय

विधानसभेच्या निवडणुकीत झालेल्या मतदानात उत्तम जानकर यांना केवळ 843 मते तर विरोधी भाजप उमेदवार राम सातपुते यांना 1003 मते मिळाल्याचं समोर आलं. यापूर्वी झालेल्या 2009, 2014, 2019 सालच्या विधानसभा निवडणूक आणि पाच महिन्यापूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत गावाचे 80 टक्के मतदान जानकर यांच्या गटाला झाल्याचे पुरावे जोडले आहेत. यावेळी निवडणुकीत मोठे घोटाळे झाल्याचा आक्षेप घेत हे तपासण्यासाठी पुन्हा 3 डिसेंबर रोजी बॅलेट पेपरवर चाचणी मतदान घेण्याचा ठराव गावाने केला. यासाठी शासकीय कर्मचारी मिळावेत, अशी मागणी करीत संपूर्ण खर्च भरण्यास गाव तयार असल्याचे निवेदन तहसीलदारांना या आधी देण्यात आले आहे. पण प्रशासनाने त्याला नकार दिला आहे.

ही बातमी वाचा: 

मुंबई विद्यापीठातून पत्रकारितेचे शिक्षण घेतलेलं असून एबीपी माझामध्ये मागील 9 वर्षांपासून कार्यरत आहे. मुंबईत assistant प्रोड्यूसर म्हणून काम केल्यानंतर मागील 7 वर्षांपासून सोलापूर जिल्हा प्रतिनिधी पदावर कार्यरत.

Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

महाराष्ट्र तापला! मार्चच्या पहिल्या आठवड्यातच तापमानाच्या पाऱ्यानं गाठला उच्चांक, अकोल्यात 40 अंशाची नोंद 
महाराष्ट्र तापला! मार्चच्या पहिल्या आठवड्यातच तापमानाच्या पाऱ्यानं गाठला उच्चांक, अकोल्यात 40 अंशाची नोंद 
अवैध वाळू उपसा प्रकरण! कारवाईसाठी गेलेल्या महसूल पथकावर प्राणघातक हल्ला, आरोपीच्या अटकेसाठी बेमुदत आंदोलन सुरु
अवैध वाळू उपसा प्रकरण! कारवाईसाठी गेलेल्या महसूल पथकावर प्राणघातक हल्ला, आरोपीच्या अटकेसाठी बेमुदत आंदोलन सुरु
Pandharpur Viral Video : पंढरपुरात ट्रक चालकाला पोलिसांकडून बेदम मारहाण, नो एन्ट्री कारवाईचा पोलिसांचा दावा, व्हिडीओने खळबळ
पंढरपुरात ट्रक चालकाला पोलिसांकडून बेदम मारहाण, नो एन्ट्री कारवाईचा पोलिसांचा दावा, व्हिडीओने खळबळ
सोलापुरात रंगणार 4 थी 'महिला महाराष्ट्र केसरी'; तारीख ठरली, मानाची गदा अन् बक्षीस देऊन गौरव
सोलापुरात रंगणार 4 थी 'महिला महाराष्ट्र केसरी'; तारीख ठरली, मानाची गदा अन् बक्षीस देऊन गौरव

व्हिडीओ

Donald Trump on Iran : बलाढ्य अमेरिकेवर इराण भारी? Special Report
Mojtaba Khamenei Iran :  मोजतबा खामेनींच्या नावाला अमेरिकेचा विरोध Special Report
Gas Shortage India : शिगेला युद्धज्वर; भारत 'गॅस'वर Special Report
Amravati SSC Exam : पेपर लिहिला घरात, कोण जाणार तुरुंगात? Special Report
Shetkari KarjMafi : कर्जमाफी मिळणार, कधी, कशी आणि किती? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ameria Israel Iran War live Update: अमेरिका-इस्रायल-इराण युद्ध आठव्या दिवशीही सुरूच; 5 हजारांवर बॉम्ब फेकले, 1200 हून अधिक ठार; युद्धखोर मानवी क्रौर्याची परिसीमा गाठणारे 15 फोटो
अमेरिका-इस्रायल-इराण युद्ध आठव्या दिवशीही सुरूच; 5 हजारांवर बॉम्ब फेकले, 1200 हून अधिक ठार; युद्धखोर मानवी क्रौर्याची परिसीमा गाठणारे 15 फोटो
Ameria Israel Iran War live Update: युद्धाचे आठ दिवस होऊन चिवट इराण शरण येईना; इकडं आज रात्री अमेरिकेची आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या हल्ल्याची थेट धमकी, तिकडं इराणी मिसाईलींचा नवा लाॅट इस्त्रायलच्या दिशेनं डागला
युद्धाचे आठ दिवस होऊन चिवट इराण शरण येईना; इकडं आज रात्री अमेरिकेची आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या हल्ल्याची थेट धमकी, तिकडं इराणी मिसाईलींचा नवा लाॅट इस्त्रायलच्या दिशेनं डागला
Harshwardhan Sapkal and PM Modi: पंतप्रधान मोदी आणि सावरकरांचा AI फोटो, काँग्रेसच्या हर्षवर्धन सपकाळांची बोचरी टीका, फोटो व्हायरल
शाब्बास…तुम्ही परंपरा जपली! काँग्रेसच्या हर्षवर्धन सपकाळांची पंतप्रधान मोदींवर बोचरी टीका
Gas Cylinder Price Hiked : युद्धाचा भडका, सर्वसामान्यांना महागाईचा चटका! घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमती महागल्या; आजपासून नवे दर लागू
युद्धाचा भडका, सर्वसामान्यांना महागाईचा चटका! घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमती महागल्या; आजपासून नवे दर लागू
Ind vs Nz Final Pitch Report : भारत-न्यूझीलंड फायनल सामन्यासाठी लाल की काळ्या मातीचा पिच? नरेंद्र मोदी स्टेडियमच्या खेळपट्टीबाबत मोठी अपडेट
भारत-न्यूझीलंड फायनल सामन्यासाठी लाल की काळ्या मातीचा पिच? नरेंद्र मोदी स्टेडियमच्या खेळपट्टीबाबत मोठी अपडेट
Arjun Tendulkar : लग्न झालं, अक्षता डोक्यावर पडल्या अन् दुसऱ्याच दिवशी अर्जुन तेंडुलकर मैदानात, चाहत्यांच्या अपेक्षाभंग; वैभव सूर्यवंशीही ठरला फेल
लग्न झालं, अक्षता डोक्यावर पडल्या अन् दुसऱ्याच दिवशी अर्जुन तेंडुलकर मैदानात, चाहत्यांच्या अपेक्षाभंग; वैभव सूर्यवंशीही ठरला फेल
लेकाने सीफेसिंग फ्लॅट विकला, 15 दिवसातंच बिग बींची आयोध्येत मोठी गुंतवणूक; रामजन्मभूमीत किती कोटींची डील?
लेकाने सीफेसिंग फ्लॅट विकला, 15 दिवसातंच बिग बींची आयोध्येत मोठी गुंतवणूक; रामजन्मभूमीत किती कोटींची डील?
Vishwas Patil : ‘संभाजी’ कादंबरीतील अंत्यसंस्काराचा उल्लेख काल्पनिक, कोरेगाव भीमा आयोगासमोर विश्वास पाटील यांची कबुली
‘संभाजी’ कादंबरीतील अंत्यसंस्काराचा उल्लेख काल्पनिक, कोरेगाव भीमा आयोगासमोर विश्वास पाटील यांची कबुली
Embed widget