एक्स्प्लोर

Vishwajeet Kadam : लोकसभा सोडली, विधानसभेला आवाज काढायचा नाही : विश्वजीत कदम

काँग्रेसच्या सांगलीतील मेळाव्यात विश्वजीत कदम यांनी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासमोर आपली नाराजी बोलून दाखवली. सांगलीची जागा ठाकरेंच्या शिवसेनेला देणं चुकीचंच आहे, मी इथे काँग्रेस नेत्यांना उघडं पाडण्यासाठी सांगलीत बोलावलं नाही. पण हे सगळे होत असताना कोण काय करत होते हा माझा सवाल आहे, असं विश्वजीत कदम म्हणाले. 

सांगली : महाविकास आघाडीमध्ये (MVA) सांगली लोकसभेच्या (Sangli Lok Sabha) जागेचा तिढा सुटला असताना, काँग्रेस आमदार विश्वजीत कदम ( Vishwajeet Kadam) यांनी पुन्हा एकदा खदखद बोलून दाखवली. काँग्रेसच्या सांगलीतील मेळाव्यात विश्वजीत कदम यांनी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासमोर आपली नाराजी बोलून दाखवली. सांगलीची जागा ठाकरेंच्या शिवसेनेला देणं चुकीचंच आहे, मी इथे काँग्रेस नेत्यांना उघडं पाडण्यासाठी सांगलीत बोलावलं नाही. पण हे सगळे होत असताना कोण काय करत होते हा माझा सवाल आहे, असं विश्वजीत कदम म्हणाले. 

सांगलीतला आमचा तोंडचा घास हिसकावून घेतला. मित्रपक्षाला सांगा, 100 टक्के काँग्रेसची मते मिळणार आहेत, पण पुढे विधानसभेला आवाज काढायाचा नाही. यापुढे मी होऊ देणार नाही.  सांगलीत मविआच्या उमेदवारला मतदान होईल, पण पुन्हा  मित्रपक्षांना समजावून सांगा, विधानसभेला पुन्हा हा वाद होणार नाही याची काळीज घ्या. याचा वचपा नक्की विधानसभामध्ये काढू, असं विश्वजीत कदम म्हणाले.

काँग्रेसच्या या मेळाव्याला बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण, नाना पटोले यांच्यासह काँग्रेसचे सर्व दिग्गज पदाधिकारी उपस्थित होते.  सांगलीत आम्ही  सर्व काँगेस नेते एकत्र आलो आणि त्याला दृष्ट लागली, पण ती दृष्ट आम्हाला काढता देखील येते, असं विश्वजीत कदम म्हणाले. 

विश्वजीत कदम काय म्हणाले?  (Vishwajeet Kadam speech)

सांगली जिल्ह्याचा इतिहास सर्वांना माहीत आहे. काँग्रेस पक्षाने स्वातंत्र्यच्या विचारला बळ दिलेय. अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी काँग्रेसचा विचार लक्षात घेऊन लढ्यात सहभागी झाले.  राजारामबापूंचे देखील जिल्ह्याच्या विकासात योगदान आहे असं म्हणत, राजारामबापू पाटील यांचा विश्वजित कदम यांच्याकडून आवर्जून उल्लेख करण्यात आला.  भाजपने पहिल्यांदा सत्तेवर येताना जनतेला फसवलं आणि तात्पुरता स्वार्थ साधून घेतला. 2014 ते 19 मध्ये अनेक बाबतीत जनतेची फसवणूक झाली.  मागील 5 वर्षात तर अनेक कटकारस्थान सत्ताधारी मंडळीकडून करण्यात आली.  यंत्रणाचा वापर करून लोकशाहीला घातक करण्याचे काम केले जातेय.  केंद्रीय यंत्रणेची गैर वापर करुन गांधी कुटुंबातील लोकांची पायी चालवून चौकशी केली. ज्या पद्धतीने भाजपाचे कारभार सुरू आहे,ते पाहून डॉ बाबासाहेब आंबेडकरांना वाईट वाटत असेल. गांधी कुटुंबावर यंत्रणा वापरून चौकशी लावली जातेय, असं विश्वजीत कदम म्हणाले.

काँग्रेस कार्यकर्त्यांवर मोठे आघात

सांगली जिल्ह्यातील दुष्काळ हटवण्यासाठी सर्व पक्षातील नेत्यांनी काम केले. आज अनेक दुष्काळ भागात सुबत्ता येऊ लागली आहे. गेल्या 5 वर्षात काँग्रेस कार्यकर्त्यांवर मोठे आघात झाले.  ज्येष्ठ मंडळी निघून गेले, त्यामुळे तरुण पिढीवर पक्षाची जिल्ह्यातील जबाबदारी आली. अनेक आक्रमणे आमच्यावर झाली पण काँग्रेस कार्यकर्त्यांमुळे आम्ही टिकून राहिलो. जिल्ह्यात 200 किलोमीटर आम्ही जनसंवाद पदयात्रा काढली. काँगेसची जागा ही काँग्रेसला मिळाली पाहिजे हा आग्रह होता.  आमच्यात गटबाजी होती, पण यावेळी आम्ही गटबाजीला पूर्णविराम दिला. एकच काँगेस पक्ष हा एकच गट आहे, असं विश्वजीत कदम यांनी सांगितलं.

लोकसभा लढवण्याचा मलाही आग्रह

मलाही सतत लोकसभा लढवण्याचे आवाहन करण्यात आले.  मात्र मी विधानसभा लढवण्यावर  ठाम राहिलो, कारण पतंगराव कदम यांच्या कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडायचे नव्हते.  एका तरुण सहकाऱ्याला तयार करून मी लोकसभेसाठी एकजण तयार केले. नावदेखील लोकसभेसाठी पाठवले. 

ठाकरेंनी सांगलीची जागा कशी काय जाहीर केली?

जिल्ह्यात एकसंघ काँग्रेस ठेवली, पण 3 महिन्यात खूप काही घडले. सांगलीची जागा काँग्रेसकडेच राहील असे सांगितले आणि आम्ही लोकांना सांगत गेलो की यंदा काँग्रेसचा खासदार असेल.  पण जागा वाटप चर्चा सुरू झाल्यावर सांगली आणि कोल्हापूरचा संबंध कुठे आला?  शाहू महाराज ज्या पक्षाकडून लढतील त्यावर ते लढतील, असे ठरले होते, सांगलीवर कसा काय हक्क सांगितला?  उद्धव ठाकरे आले आणि चंद्रहार पाटील यांची उमेदवारी जाहीर केली, हे असे चालते का? असा सवाल विश्वजीत कदम यांनी विचारला. 

दृष्ट काढता येईल 

सांगलीची  जागा देणे हे चुकीचेच होते. पण हे सगळे होत असताना कोण काय करत होते? सांगलीत आम्ही  सर्व काँगेस नेते एकत्र आलो आणि त्याला दृष्ट लागली, पण ती दृष्ट काढता देखील येईल. गल्ली टू दिली आम्ही विशाल ,जयश्री पाटील यांना सोबत घेऊन गेलो, काँगेसकडेच जागा राहावी यासाठी प्रयत्न केले. एकतर्फी कशी काय उमेदवारी जाहीर केली.राजकारणामध्ये वादळात दिवा लावायची माझी तयारी आहे. हे सगळे प्रयत्न करत असताना शेवटी काय झाले हे कार्यकर्ते विचारत होते. सापशिडीच्या खेळा प्रमाणे दुर्दैवाने आम्हला साप चावला. पण शेवटी विजय हा आमचाच असेल, असं विश्वजीत कदम म्हणाले. 

कटकारस्थान करणाऱ्यांना सोडणार नाही

ज्यांनी हे कटकारस्थान केले त्यांना सोडणार नाही. पतंगराव कदम यांचे गुण माझ्यात आहेत, तसेच माझ्यातील स्वत:चे गुणही आहेत.   विशाल पाटील यांना विनंती केली की भावा अपक्ष लढून नको. राज्यसभा भेटेल. पुढची लोकसभा लढवू, जिंकू. काँगेसचा हात टिकवण्याची जबाबदारी माझ्याकडे होती.  तोंडावरचा घास हिसकावून घेतला, पुन्हा असे होऊ देऊ नका, असं आवाहन विश्वजीत कदम यांनी केलं. 

संजय राऊतांवर हल्लाबोल

कुणाचे विमान कुठे गेले हे मला सांगायची गरज नाही. शेवटी सांगलीची जागा काँग्रेसकडे राहावी यासाठी चंद्रहार पाटील यांना विधापरिषद दिली अशीही ऑफर दिली. सांगलीत मविआच्या उमेदवारला मतदान होईल पण पुन्हा  मित्रपक्षांना समजावून सांगा, विधानसभेला पुन्हा हा वाद होणार नाही याची काळीज घ्या. याचा वचपा नक्की विधानसभामध्ये काढू, असा इशारा विश्वजीत कदम यांनी दिला. 

विधानसभेला आवाज काढायचा नाही

आम्ही सांगलीची जागा मिळावी ,हाताचा पंजा मिळावे यासाठी प्रयत्न केले. सांगलीतला आमचा तोंडावरचा घास हिसकावून घेतला. मित्रपक्षाला सांगा, 100 टक्के काँग्रेसची मते मिळणार आहेत, पण  सांगा,पुढे विधानसभेला आवाज काढायाचे नाही. यापुढे मी होऊ देणार नाही.  सांगली जिल्ह्याचे विमान छत्रपती शिवाजी महाराज,शाहू फुले यांच्या चरणी आहे,लँडिंग देखील तिथेचं होईल. व्यक्तीगत मला विरोधी पक्षाचा आमदार म्हणून खूप त्रास सहन केले आहे, असं विश्वजीत कदम म्हणाले. 

Vishwajeet Kadam speech Sangli video : विश्वजीत कदम यांचं संपूर्ण भाषण 

संबंधित बातम्या

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Crime News: मोठी बातमी: लातूर पोलिसांचं पथक बीडमध्ये धडकलं, राजस्थानी मल्टिस्टेटच्या कार्यालयाला ठोकलं सील
मोठी बातमी: लातूर पोलिसांचं पथक बीडमध्ये धडकलं, राजस्थानी मल्टिस्टेटच्या कार्यालयाला ठोकलं सील
Chandu Champion Trailer : 'चंदू चॅम्पियन'चा शानदार ट्रेलर रिलीज! कार्तिक आर्यनच्या दमदार अभिनयाचं होतंय कौतुक
'चंदू चॅम्पियन'चा शानदार ट्रेलर रिलीज! कार्तिक आर्यनच्या दमदार अभिनयाचं होतंय कौतुक
Govinda : गोविंदाच्या लग्नाचे अन् डेटिंगचे कधीही न पाहिलेले फोटो; सुनीताच्या सौंदर्यावर खिळल्या चाहत्यांच्या नजरा
गोविंदाच्या लग्नाचे अन् डेटिंगचे कधीही न पाहिलेले फोटो; सुनीताच्या सौंदर्यावर खिळल्या चाहत्यांच्या नजरा
RCB vs CSK : पाच पराभवानंतर आरसीबीचा विजयाचा षटकार, बंगळुरुच्या प्लेऑफमधील एंट्रीचं जंगी सेलिब्रेशन, पाहा व्हिडीओ
आरसीबीकडून होम ग्राऊंडवर चेन्नईचा हिशोब पूर्ण, प्लेऑफमध्ये एंट्री, बंगळुरुच्या चाहत्यांची दिवाळी
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

J. P. Nadda : RSS ही सांस्कृतिक, सामाजिक संस्था मात्र भाजप राजकीय पक्ष : जे.पी. नड्डा : ABP MajhaTOP 100 : टॉप 100 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 100 न्यूज : 19 May 2024 : ABP MajhaAmit Shaha Amethi Road Show : अमेठीतून स्मृती इराणी पुन्हा संसदेत जाणार : अमित शाहNaresh Mhaske Thane : ठाण्याचे प्रश्न ते गद्दारी कुणी केली? प्रचार थंडावल्यावर म्हस्केंशी बातचीत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Crime News: मोठी बातमी: लातूर पोलिसांचं पथक बीडमध्ये धडकलं, राजस्थानी मल्टिस्टेटच्या कार्यालयाला ठोकलं सील
मोठी बातमी: लातूर पोलिसांचं पथक बीडमध्ये धडकलं, राजस्थानी मल्टिस्टेटच्या कार्यालयाला ठोकलं सील
Chandu Champion Trailer : 'चंदू चॅम्पियन'चा शानदार ट्रेलर रिलीज! कार्तिक आर्यनच्या दमदार अभिनयाचं होतंय कौतुक
'चंदू चॅम्पियन'चा शानदार ट्रेलर रिलीज! कार्तिक आर्यनच्या दमदार अभिनयाचं होतंय कौतुक
Govinda : गोविंदाच्या लग्नाचे अन् डेटिंगचे कधीही न पाहिलेले फोटो; सुनीताच्या सौंदर्यावर खिळल्या चाहत्यांच्या नजरा
गोविंदाच्या लग्नाचे अन् डेटिंगचे कधीही न पाहिलेले फोटो; सुनीताच्या सौंदर्यावर खिळल्या चाहत्यांच्या नजरा
RCB vs CSK : पाच पराभवानंतर आरसीबीचा विजयाचा षटकार, बंगळुरुच्या प्लेऑफमधील एंट्रीचं जंगी सेलिब्रेशन, पाहा व्हिडीओ
आरसीबीकडून होम ग्राऊंडवर चेन्नईचा हिशोब पूर्ण, प्लेऑफमध्ये एंट्री, बंगळुरुच्या चाहत्यांची दिवाळी
Horoscope Today 19 May 2024 : आजचा रविवार खास! मेष, कन्या, मीनसह 'या' राशींचा दिवस भाग्याचा; वाचा आजचे राशीभविष्य
आजचा रविवार खास! मेष, कन्या, मीनसह 'या' राशींचा दिवस भाग्याचा; वाचा आजचे राशीभविष्य
Kalyan : एकटी असल्याचं पाहून अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकला अन् लॅपटॉप घेऊन चोरटे पसार; UPSC ची तयारी करणारी विद्यार्थिनी थोडक्यात वाचली
एकटी असल्याचं पाहून अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकला अन् लॅपटॉप घेऊन चोरटे पसार; UPSC ची तयारी करणारी विद्यार्थिनी थोडक्यात वाचली
पोलीस जनतेसाठी आहेत की भाजपसाठी?; पुण्यातील आमदार रवींद्र धंगेकरांचं थेट पोलीस आयुक्तांना पत्र
पोलीस जनतेसाठी आहेत की भाजपसाठी?; पुण्यातील आमदार रवींद्र धंगेकरांचं थेट पोलीस आयुक्तांना पत्र
मोठा दिलासा... UPSC परीक्षार्थींना दररोज 3000 रुपये द्या; न्यायालयाचे सर्वोच्च आदेश
मोठा दिलासा... UPSC परीक्षार्थींना दररोज 3000 रुपये द्या; न्यायालयाचे सर्वोच्च आदेश
Embed widget