एक्स्प्लोर

एक्झिट पोल 2024

(Source:  Poll of Polls)

Pune Crime : पुरंदरमध्ये अंधाराचा फायदा घेत विद्युत तारांची चोरी; पोलिसांनी सापळा रचून टोळीला घेतलं ताब्यात; टोळीत विशीतील तरुणांचा समावेश

Pune Crime : पुरंदर तालुक्यात वीज वितरण आणि महा पारेषणच्या ट्रान्सफॉर्मर आणि अल्युमिनियम तारा चोरणाऱ्या टोळीला ताब्यात घेतलं आहे. त्यांच्याकडून 6 लाख 34 हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे

Purandar Crime News :पुरंदर तालुक्यात वीज वितरणआणि महा पारेषणच्या ट्रान्सफॉर्मर आणि अल्युमिनियम तारा चोरण्याचा अनेक घटना घडल्या होत्या. मात्र चोर सापडत नव्हते. अखेर या चोरांच्या टोळीला पकडण्यात पोलिसांना यश आलं आहे. सासवड पोलिसांनी या प्रकरणी आठ जणांच्या टोळीला ताब्यात घेतलं आहे. त्यांच्याकडून चोरीला गेलेल्या सहित्यांपैकी 6 लाख 34 हजाराचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे. त्याचबरोबर गुन्ह्यात वापरलेले दोन टेम्पो देखील पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत.

यातील सहाय्यक अभियंता आकाश नामदेव गायकवाड यांनी 28 जानेवारी 2023 रोजी सासवड पोलिसांत तक्रार दिली होती.  29 ऑक्टोबर 2022 ते  27 जानेवारी 2023 दरम्यान मौजे गराडे हद्दी आणि दूरकरवाडी, गराडे परिसरातील टाॅवरच्या अॅल्युमिनिअम धातुच्या विदयुत वाहक तारा अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्या. या तारांची किंमत 21 लाख 40 हजार एवढी असल्याचं तक्रारीत नमूद केलं होतं. 

Purandar crime news : सखोल तपास करण्याच्या सूचना

हा गुन्हा गंभीर स्वरुपाचा असून  चोरांनी शासनाच्या मालकीच्या वीज वाहक तारा चोरुन नेल्या असल्याने पोलिसांनी तपासी अंमलदार आणि गुन्हे शोध पथकाला गुन्हा सखोल तपास करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्या अनुषंगाने गुन्हे शोध पथकाने सासवड, गराडे, कोंढवा, कात्रज पुणे असे वेगवेगळ्या ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज तपासले त्यावेळी चोरांच्या एका संशयित टेम्पोची माहिती मिळाली.

Purandar crime news : आरोपींना शिताफीने ताब्यात घेतले

त्याअनुषंगाने वेगवेगळ्या मार्गाने तपास करत असताना पथकाला गोपनीय माहिती मिळाली की, कात्रज परिसरातील जावेद शेख आणि समाधान कसबे हे दोघे काही लोकांना सोबत घेत मागील एक वर्षापासून गराडे येथील रात्रीच्या वेळी अंधाराचा फायदा घेऊन शासनाच्या मालकीच्या वीज वाहक अॅल्युमिनिअमच्या तारा चोरी करुन दोन टेम्पोमधून नेत आहेत. त्याप्रमाणे पथकाने पद्मावती, तळजाई, शनीनगर, कात्रज, कोंढवा पुणे येथे जाऊन माहिती घेऊन शोध घेतला असता संशयित आरोपी आणि गुन्ह्यातील टेम्पो सापडले. आरोपींना शिताफीने ताब्यात घेतले त्यांना सासवड पोलीस स्टेशनला आणून त्यांच्याकडे चौकशी केली असता चोरीची कबुली दिली. 

या प्रकरणी सोहेल उर्फ लादेन मोदीन आसंगी (वय 20 वर्षे), आदित्य उर्फ सोन्या खंडु कांबळे (वय 20 वर्षे), सुरज उर्फ बाॅम्ब नंदु बांदल (वय 18 वर्षे), दत्ता धनाजी पाटोळे (वय 19 वर्षे), समाधान दगडु कसबे (वय 47 वर्षे), ओम उर्फ शिवम समाधान कसबे (वय 19 वर्षे), दिलीप दत्तु देडे (वय 38 वर्षे), सालीक राम लहुरी सरोज (वय 44 वर्षे) या आठ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. आरोपींकडून टेम्पो जप्त केला आहे. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Exit Polls Result 2024:  निवडणुकीत ठाकरे गटाचं काय झालं, एक्झिट पोलमध्ये उद्धव ठाकरेंना किती जागा?
मोठी बातमी: निवडणुकीत ठाकरे गटाचं काय झालं, एक्झिट पोलमध्ये उद्धव ठाकरेंना किती जागा?
Maharashtra Exit Polls Result 2024: कोकणचा गड कोण जिंकणार? कोणत्या पक्षाला किती जागा? एक्झिट पोलच्या आकड्यांनी उमेदवारांची धाकधूक वाढली
कोकणचा गड कोण जिंकणार? कोणत्या पक्षाला किती जागा? एक्झिट पोलच्या आकड्यांनी उमेदवारांची धाकधूक वाढली
Maharashtra Exit Polls Result 2024 : कोल्हापूर, सोलापूर, सांगली, सातारसह पश्चिम महाराष्ट्रात कोणाला किती जागा? एक्झिट पोलमधील आकडेवारी समोर!
कोल्हापूर, सोलापूर, सांगली, सातारसह पश्चिम महाराष्ट्रात कोणाला किती जागा? एक्झिट पोलमधील आकडेवारी समोर!
Exit Poll: मराठवाड्यात भाजपला फटका, जरांगे पॅटर्नमुळे महाविकास आघाडीचं पारडं जड; कोणाला किती जागा?
Exit Poll: मराठवाड्यात भाजपला फटका, जरांगे पॅटर्नमुळे महाविकास आघाडीचं पारडं जड; कोणाला किती जागा?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Maharashtra Exit Poll | महायुती 121, महाविकास आघाडीला 150 जागा मिळण्याची शक्यता ABP MajhaNitesh Karale Master : भर रस्त्यात मारहाण,मुलीलाही लागल; कराळे मास्तरांनी सांगितलं पूर्ण कहाणीSonali Kulkarni on Election : यंदाची निवडणूक संभ्रमित करणारी, सोनाली कुलकर्णींनी दिला सल्लाMaharashtra Exit Poll | 78 जागांसह भाजप सर्वात मोठा पक्ष ठरणार, इलेक्ट्रोल एजचा पोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Exit Polls Result 2024:  निवडणुकीत ठाकरे गटाचं काय झालं, एक्झिट पोलमध्ये उद्धव ठाकरेंना किती जागा?
मोठी बातमी: निवडणुकीत ठाकरे गटाचं काय झालं, एक्झिट पोलमध्ये उद्धव ठाकरेंना किती जागा?
Maharashtra Exit Polls Result 2024: कोकणचा गड कोण जिंकणार? कोणत्या पक्षाला किती जागा? एक्झिट पोलच्या आकड्यांनी उमेदवारांची धाकधूक वाढली
कोकणचा गड कोण जिंकणार? कोणत्या पक्षाला किती जागा? एक्झिट पोलच्या आकड्यांनी उमेदवारांची धाकधूक वाढली
Maharashtra Exit Polls Result 2024 : कोल्हापूर, सोलापूर, सांगली, सातारसह पश्चिम महाराष्ट्रात कोणाला किती जागा? एक्झिट पोलमधील आकडेवारी समोर!
कोल्हापूर, सोलापूर, सांगली, सातारसह पश्चिम महाराष्ट्रात कोणाला किती जागा? एक्झिट पोलमधील आकडेवारी समोर!
Exit Poll: मराठवाड्यात भाजपला फटका, जरांगे पॅटर्नमुळे महाविकास आघाडीचं पारडं जड; कोणाला किती जागा?
Exit Poll: मराठवाड्यात भाजपला फटका, जरांगे पॅटर्नमुळे महाविकास आघाडीचं पारडं जड; कोणाला किती जागा?
Maharashtra Exit Polls Result : राज्यात काँग्रेसला किती जागा मिळणार? एक्झिट पोलची धक्कादायक आकडेवारी समोर
राज्यात काँग्रेसला किती जागा मिळणार? एक्झिट पोलची धक्कादायक आकडेवारी समोर
Maharashtra Exit Polls 2024 : भाजप की काँग्रेस? एक्झिट पोलच्या सर्व्हेनुसार सर्वात मोठा पक्ष कोणता? अजितदादा-ठाकरेंना किती जागा?
भाजप की काँग्रेस? एक्झिट पोलच्या सर्व्हेनुसार सर्वात मोठा पक्ष कोणता? अजितदादा-ठाकरेंना किती जागा?
Exit Poll Result : शरद पवारांचा पक्ष मुसंडी मारणार, अजितदादांपेक्षा ठरणार वरचढ? एक्झिट पोलचा धक्कादायक अंदाज समोर!
शरद पवारांचा पक्ष मुसंडी मारणार, अजितदादांपेक्षा ठरणार वरचढ? एक्झिट पोलचा धक्कादायक अंदाज समोर!
Maharashtra Exit Poll | 78 जागांसह भाजप सर्वात मोठा पक्ष ठरणार, इलेक्ट्रोल एजचा पोल
Maharashtra Exit Poll | 78 जागांसह भाजप सर्वात मोठा पक्ष ठरणार, इलेक्ट्रोल एजचा पोल
Embed widget