एक्स्प्लोर

Pune Corona Scam : पुणे महापालिकेत कोविड घोटाळा, तात्कालीन आरोग्य प्रमुख डॉ. आशिष भारतीसह तिघांवर गुन्हा दाखल

पुणे कथित कोविड टेस्टिंग किट (Pune Covid Ghotala) घोटाळ्याप्रकरणी पुणे महानगरपालिकेचे तत्कालीन आरोग्य प्रमुख डॉ. आशिष भारती यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुणे : पुणे कथित कोविड टेस्टिंग किट (Pune Covid Ghotala) घोटाळ्याप्रकरणी पुणे महानगरपालिकेचे तत्कालीन आरोग्य प्रमुख डॉ. आशिष भारती यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्यासोबतच  मेडिकल ऑफिसर डॉ. अरुणा सूर्यकांत तरडे, डॉ. ऋषिकेश हनुमंत गार्डी यांच्या विरोधात सुद्धा वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

कोविड काळात 80 ते 90 लाख रुपयांचा घोटाळा केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार 2021 मध्ये कोरोना काळात पुण्यातील कै. अरविंद बारटक्के रुग्णालय येथील आहे. महापालिकेचे आरोग्य अधिकारी सतीश बाबुराव कोळुसरे यांनी या संदर्भात फिर्याद दिली होती. 

मिळालेल्या माहितीनुसार, डॉक्टर तारडे, डॉ. गार्डी आणि डॉ. भारती यांनी आपापसात संगणमत करून कोविड काळामध्ये बारटक्के हॉस्पिटलमध्ये कोविड तपासणीसाठी लागणारे साहित्य पुरवले होते. यामध्ये टेस्टिंग किट, सॅनिटायझर, औषधे यांचा समावेश होता. या सर्वांनी स्वतःच्या हितासाठी आणि स्वार्थासाठी अन्यसाथीदारांना हाताशी धरले. 

महाराष्ट्र शासन आणि पुणे महानगरपालिकेला काही कागदपत्र सादर करून पैसे कमावण्याच्या हेतूने कोविड टेस्ट तपासणीसाठी येणाऱ्या लोकांच्या खोट्या नोंदी केल्या. नागरिकांसाठी आलेल्या टेस्टिंग किड्स वापरल्या असल्याचे भासविण्यात आले.  त्या टेस्टिंग किट प्रायव्हेट लॅब आणि खाजगी व्यक्तींना विकल्या. त्यामधून जवळपास 80 ते 90 लाख रुपयांची अफरातफर केल्याचे फिर्यादीमध्ये नमूद करण्यात आले आहे. पुढील तपास सुरू आहे.

कोविड काळात राज्य सरकारकडून कीट आणि औषधं पुरवली जात होती. ती औषध बोगस पेशंटला दिल्याचा आरोप आहे. याच बोगस पेशंटच्या नावाने हे औषधं आणि कीट्स वापरण्यात आले होते. जवळपास 80 ते 90 लाखांचा हा घोटाळा असल्याचा आरोप या तक्रारीत करण्यात आला आहे. सरकार कडून आलेली सर्व औषधं खासगी दवाखान्यात विकण्यात आल्याचा ठपका या डॉक्टरांवर ठेवण्यात आला आहे. 

डॉक्टर की कसाई?

कोरोना काळात अनेकदा लोकांना औषधं उपलब्ध होत नव्हती. पर्यायी औषधं परवडत नसल्याने अनेक रुग्णांच्या नातेवाईकांनी सरकारी दवाखान्यासमोर रांगा लावल्या होत्या. याच दरम्यान औषधांचा मोठा तुटवडा निर्माण झाला होता. परिणामी औषधं मिळत नसल्याने अनेक रुग्णांना जीव गमवावा लागला. मात्र त्यापलीकडे हे महापालिकेचे अधिकाऱ्यांचा हा असा कारभार सुरु होता. 

इतर महत्वाची बातमी-

MP Sanjay Raut Tweet: पिक्चर अभी बाकी है, संजय राऊतांकडून मकाऊतील 6 सेकंदाचा व्हिडीओ शेअर, बावनकुळेंच्या अडचणी वाढणार?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी! दाऊद इब्राहिम अन् लॉरेन्स बिश्नोईच्या फोटोंचे टी-शर्ट; फ्लिपकार्टसह विक्रेत्यांवर गुन्हा दाखल
मोठी बातमी! दाऊद इब्राहिम अन् लॉरेन्स बिश्नोईच्या फोटोंचे टी-शर्ट; फ्लिपकार्टसह विक्रेत्यांवर गुन्हा दाखल
Supreme Court on POCSO : 'पाॅस्को' केस परस्पर सामंजस्याने मिटवता येणार नाही, सर्वोच्च न्यायालयाकडून उच्च न्यायालयाचा निर्णय रद्द
'पाॅस्को' केस परस्पर सामंजस्याने मिटवता येणार नाही, सर्वोच्च न्यायालयाकडून उच्च न्यायालयाचा निर्णय रद्द
Pusad Assembly Election:  पुसदमध्ये इंद्रनील नाईक यांच्या विरुद्ध शरद मेंद यांचं आव्हान, दोन्ही राष्ट्रवादी आमने सामने, कोण बाजी मारणार?
पुसदमध्ये इंद्रनील नाईक यांच्या विरुद्ध शरद मेंद यांचं आव्हान, दोन्ही राष्ट्रवादी आमने सामने, कोण बाजी मारणार?
कोणाचा बाप आला तरी माझ्या मतदारसंघातील पाण्याच्या एका थेंबाला धक्का लागू देणार नाही! प्रकाश आबिटकरांचे के पी पाटलांना प्रत्युत्तर
कोणाचा बाप आला तरी माझ्या मतदारसंघातील पाण्याच्या एका थेंबाला धक्का लागू देणार नाही! प्रकाश आबिटकरांचे के पी पाटलांना प्रत्युत्तर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 04 PM TOP Headlines 04 PM 07 November 2024Sandeep Deshpande on Uddhav Thackeray | उद्धव ठाकरेंनी माहीम विधानसभेत सभा घ्यावी- संदीप देशपांडेABP Majha Marathi News Headlines 3PM TOP Headlines 3 PM 07 November 2024Sunil Tatkare :लोकसभेला मला फसवलं,यावेळी तसं करु नका;मुस्लिम कार्यकर्त्यांना तटकरेंचे चिमटे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोठी बातमी! दाऊद इब्राहिम अन् लॉरेन्स बिश्नोईच्या फोटोंचे टी-शर्ट; फ्लिपकार्टसह विक्रेत्यांवर गुन्हा दाखल
मोठी बातमी! दाऊद इब्राहिम अन् लॉरेन्स बिश्नोईच्या फोटोंचे टी-शर्ट; फ्लिपकार्टसह विक्रेत्यांवर गुन्हा दाखल
Supreme Court on POCSO : 'पाॅस्को' केस परस्पर सामंजस्याने मिटवता येणार नाही, सर्वोच्च न्यायालयाकडून उच्च न्यायालयाचा निर्णय रद्द
'पाॅस्को' केस परस्पर सामंजस्याने मिटवता येणार नाही, सर्वोच्च न्यायालयाकडून उच्च न्यायालयाचा निर्णय रद्द
Pusad Assembly Election:  पुसदमध्ये इंद्रनील नाईक यांच्या विरुद्ध शरद मेंद यांचं आव्हान, दोन्ही राष्ट्रवादी आमने सामने, कोण बाजी मारणार?
पुसदमध्ये इंद्रनील नाईक यांच्या विरुद्ध शरद मेंद यांचं आव्हान, दोन्ही राष्ट्रवादी आमने सामने, कोण बाजी मारणार?
कोणाचा बाप आला तरी माझ्या मतदारसंघातील पाण्याच्या एका थेंबाला धक्का लागू देणार नाही! प्रकाश आबिटकरांचे के पी पाटलांना प्रत्युत्तर
कोणाचा बाप आला तरी माझ्या मतदारसंघातील पाण्याच्या एका थेंबाला धक्का लागू देणार नाही! प्रकाश आबिटकरांचे के पी पाटलांना प्रत्युत्तर
Maharashtra Assembly Elections 2024 : विधानसभेची खडाजंगी : नांदगाव मतदारसंघात तिरंगी लढत, सुहास कांदेंसमोर समीर भुजबळ, गणेश धात्रक यांचे आव्हान, कोण उधळणार गुलाल?
विधानसभेची खडाजंगी : नांदगाव मतदारसंघात तिरंगी लढत, सुहास कांदेंसमोर समीर भुजबळ, गणेश धात्रक यांचे आव्हान, कोण उधळणार गुलाल?
Pune Politics: काँग्रेस पक्षांने कारवाई केलेले पुण्याचे दोन बंडखोर उमेदवार नॉट रिचेबल; नेमकं काय घडतंय?
काँग्रेस पक्षांने कारवाई केलेले पुण्याचे दोन बंडखोर उमेदवार नॉट रिचेबल; नेमकं काय घडतंय?
मुंबईत ठाकरेंची मोठी खेळी, मनसेचा बडा मोहरा फोडला, अखिल चित्रे ठाकरे गटात प्रवेश करणार
मुंबईत ठाकरेंची मोठी खेळी, मनसेचा बडा मोहरा फोडला, अखिल चित्रे ठाकरे गटात प्रवेश करणार
Dilip Walse Patil : तर काही ना काही करून गणित घालावं लागेल! शरद पवारांच्या मानसपुत्राकडून समीकरण बदलाचे संकेत?
तर काही ना काही करून गणित घालावं लागेल! शरद पवारांच्या मानसपुत्राकडून समीकरण बदलाचे संकेत?
Embed widget