MP Sanjay Raut Tweet: पिक्चर अभी बाकी है, संजय राऊतांकडून मकाऊतील 6 सेकंदाचा व्हिडीओ शेअर, बावनकुळेंच्या अडचणी वाढणार?
MP Sanjay Raut Tweet: भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे परदेशात कसिनो खेळत असल्याचा आरोप याआधीच संजय राऊतांनी केला होता. त्याबाबतचा कथित फोटो राऊतांनी शेअर केला होता.
Thackeray Group MP Sanjay Raut Tweet: मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत यांनी (Sanjay Raut Shiv Sena) पुन्हा एकदा भाजप (BJP) प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांना अप्रत्यक्षरित्या डिवचलं आहे. राऊतांनी मकाऊतील एक व्हिडीओ शेअर केला आहे. पिक्चर अभी बाकी है असं म्हणत राऊतांनी 6 सेकंदाचा व्हिडीओ शेअर केला. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे परदेशात कसिनो खेळत असल्याचा आरोप याआधीच संजय राऊतांनी केला होता. त्याबाबतचा कथित फोटो राऊतांनी शेअर केला होता. त्यावरुन उठलेली आरोपांची राळ खाली बसण्यापूर्वीच राऊतांनी आता व्हिडीओची झलक शेअर केली आहे.
नव्या व्हिडीओमध्ये नेमकं काय?
संजय राऊत यांनी आज मकाऊतील नवा व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये एका कसिनोसदृश्य ठिकाण दिसत आहे. एक व्यक्ती कॅमेरा घेऊन चालत आहे.आजूबाजूला अनेक लोक टेबल खुर्चीवर बसले आहेत. त्यामुळे या व्हिडीओमध्ये नेमकं काय आहे, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. त्यामुळेच संजय राऊतांनी या सहा सेकंदाच्या व्हिडीओला पिक्चर अभी बाकी है, असं कॅप्शन दिलं आहे.
An Evening in Macau..
— Sanjay Raut (@rautsanjay61) November 24, 2023
मकाऊ की रातें..
पिक्चर अभी बाकी है..@BJP4Maharashtra @AUThackeray @Dev_Fadnavis @ShivSenaUBT_ @supriya_sule pic.twitter.com/0QHRCRgWcQ
आधी केलेला फोटो शेअर
संजय राऊतांनी चार दिवसापूर्वी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांचा मकाऊमधील फोटो शेअर केला होता. यामध्ये बावनकुळे हे कसिनो खेळत असल्याचा दावा खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केला होता. त्यावेळी राऊतांनी "19 नोव्हेंबर मध्यरात्री मुक्काम पोस्ट मकाऊ,veneshine. साधारण 3.50 कोटी कॅसिनो जुगारात उडवले असे प्रत्यक्षदर्शी सांगतात. हिंदुत्ववादी असल्याने महाशय द्युत खेळले तर बिघडले कोठे? ते तेच आहेत ना?" असं म्हटलं होतं. यावरुन त्यांनी चंद्रशेखर बावनकुळेंकडे अप्रत्यक्ष बोट केलं होतं.
भाजपनं केलेला पलटवार
दरम्यान, या सर्व वादानंतर महाराष्ट्र भाजपने स्पष्टीकरण देत, संजय राऊतांवर हल्लाबोल केला होता. संजय राऊतांच्या ट्वीटला भाजपने उत्तर दिले होते. भाजपने उत्तर देताना आदित्य ठाकरेंचा (Aaditya Thackeray) एका पार्टीतील फोटो ट्वीट केला होता. "आमचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे त्यांच्या आयुष्यात कधी जुगार खेळलेले नाहीत.ते ज्या हॉटेलमध्ये सहकुटुंब मुक्कामी तेथील हा परिसर. असो, ज्यांच्या आयुष्याचा जुगार झालाय, त्यांची दृष्टी त्यापलिकडे जाऊ शकत नाही. आम्हाला फक्त एक सांगा संजुभाऊ आदित्य ठाकरेंच्या ग्लासमध्ये कोणत्या ब्रँडची व्हीस्की?" असं ट्विट भाजपने केलं होतं.
महत्त्वाच्या इतर बातम्या :