एक्स्प्लोर
पुण्यात दुकानाचं शटर उघडून पैसे चोरणाऱ्या महिला कॅमेरात कैद
बाणेर रोड परिसरातील दोन दुकानांतून 16 नोव्हेंबरला पहाटेच्या वेळी रोकड लंपास करतानाचा व्हिडिओ समोर आला आहे.

पुणे : पुण्यातील बाणेर परिसरात बंद दुकानातील रोकड लंपास करणाऱ्या महिला सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाल्या आहेत.
चोरी करणाऱ्या महिलांच्या टोळीचे दोन व्हिडिओ समोर आले आहेत. या प्रकरणी चतु:श्रुंगी पोलिस ठाण्यात अज्ञात चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बाणेर रोड परिसरातील दोन दुकानांतून 16 नोव्हेंबरला पहाटेच्या वेळी रोकड लंपास करतानाचा व्हिडिओ समोर आला आहे. व्हिडिओमध्ये टोळीत सात ते आठ महिला आणि एक पुरुष असल्याचं दिसत आहे.
या महिला चोरीसाठी पहाटेची वेळ निवडून रेकी केलेल्या दुकानासमोर घोळका घालून बसतात. त्यामुळे रस्त्यावर ये-जा करणाऱ्या पादचाऱ्यांना कोणताही संशय येत नाही. हळूच शटर उघडून दुकानातली रोकड त्या लंपास करतात. या मोडस ऑपरेंडीने त्यांनी आतापर्यंत अनेक दुकानांमधली रोकड पळवल्याची माहिती आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
पुणे
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
