एक्स्प्लोर
डॉक्टर पतीच्या छळाला कंटाळून आयटी इंजिनियर पत्नीची आत्महत्या
पाच वर्षांपूर्वी दोघे लग्नाच्या बेडीत अडकले. दोन वर्षांनी एका मुलाला जन्मही दिला, तो सध्या तीन वर्षांचा आहे. संसार सुखाने सुरू होता, दरम्यान त्यांचं एक फ्लॅट घ्यायचं ठरलं. अन् इथून संसाराला विघ्न लागलं.
पिंपरी : जीव वाचवण्याची जबाबदारी असणाऱ्या डॉक्टरने आयटी अभियंता पत्नीला जीव देण्यास भाग पाडलं आहे. पिंपरी चिंचवडमध्ये ही धक्कादायक घटना शनिवारी दुपारी घडली. डॉक्टर पती आणि सासू-सासऱ्यांनी 25 लाख रुपयांसाठी लावलेला ससेमिरा आणि यासाठी टोमण्यांवर टोमणे मारले. हे सहन न झाल्याने महिला आयटी इंजिनियर असलेल्या पत्नीने पाचव्या मजल्यावरून उडी मारून जीवनयात्रा संपवली. मेघा पाटील असं आत्महत्या केलेल्या विवाहित महिला आयटी इंजिनियरचं नाव आहे. तर तिच्या जीवावर उठलेल्या डॉक्टरचे संतोष पाटील असे नाव आहे. दरम्यान, डॉक्टर पतीस अटक करण्यात आली आहे. डॉक्टरचे संतोष पाटील हा पुण्याच्या केईएम रुग्णालयात कामाला आहे.
पाच वर्षांपूर्वी दोघे लग्नाच्या बेडीत अडकले. दोन वर्षांनी एका मुलाला जन्मही दिला, तो सध्या तीन वर्षांचा आहे. संसार सुखाने सुरू होता, दरम्यान त्यांचं एक फ्लॅट घ्यायचं ठरलं. अन् इथून संसाराला विघ्न लागलं. फ्लॅटसाठी पैशाची जुळवाजुळव करताना डॉक्टर पती संतोषने पत्नी मेघाकडे ससेमिरा सुरू केला. माहेरहून तब्बल पंचवीस लाख रुपये आणण्यासाठी संतोषने हट्ट धरला. मात्र मेघाने यास नकार दिला, यामुळे सासू-सासरे रागावले. मग सुनेला टोमणा मारण्याची अन् नको ते बोलण्याची दोघांनी एकही संधी सोडली नाही, अशी तक्रार मेघाच्या वडिलांनी दिली आहे. पैशाच्या कारणावरून पती-पत्नीत वारंवार कलगीतुरा रंगला. जीव लावणारा डॉक्टर नवराच फ्लॅटसाठी आपल्या पत्नीच्या जीवावर उठू लागला असल्याचेही तक्रारीत म्हटले आहे.
यातूनच मेघाची सहनशीलता संपली आणि तिने पुष्पांगण सोसायटीच्या पाचव्या मजल्यावरील राहत्या घराच्या गॅलरीतून उडी घेतली आणि स्वतःची जीवनयात्रा संपवली. याप्रकरणी मेघाच्या वडिलांनी चिंचवड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे. जीव वाचवण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करण्याची शपथ घेणारा हा डॉक्टर स्वतःच्या पत्नीच्या मात्र जीवावर उठला असल्याची चर्चा शहरात यानिमित्ताने रंगली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बॉलीवूड
जळगाव
करमणूक
परभणी
Advertisement