एक्स्प्लोर
पब्जी गेम आणि इन्स्टाग्रामचा वापर करुन चेन स्नॅचिंग, चोरट्यांचा अनोखा फंडा, टोळीचा पर्दाफाश
सोशल मीडिया किंवा गेमिंग अॅपचा वापर मनोरंजनासाठी असतो हे आपल्याला माहिती आहे. मात्र या अॅप्सचा वापर करुन चोरटे आपला हेतू साध्य करत असल्याचा प्रकार समोर आला आहे. चोरट्यांच्या अनोख्या फंड्याने पोलिस देखील चक्रावले आहेत.
![पब्जी गेम आणि इन्स्टाग्रामचा वापर करुन चेन स्नॅचिंग, चोरट्यांचा अनोखा फंडा, टोळीचा पर्दाफाश chain snatching robbery pub G insta in Pimpari chinchwad police arrested thief पब्जी गेम आणि इन्स्टाग्रामचा वापर करुन चेन स्नॅचिंग, चोरट्यांचा अनोखा फंडा, टोळीचा पर्दाफाश](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2020/02/03015728/pimpari.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
पिंपरी : पब्जी गेम आणि इन्स्टाग्रामवरून संपर्कात राहून चेन स्नॅचिंग करणाऱ्या चोरट्यांच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. गेल्या सात ते आठ महिन्यापासून या टोळीने चेन स्नॅचिंगचे अशाप्रकारे सत्र सुरू ठेवलं होतं. पण पिंपरी चिंचवडच्या सांगवी पोलिसांनी या टोळीचे अखेर बिंग फोडले आहे. सांगवी पोलिसांच्या हद्दीत ही टोळी टप्प्याटप्प्याने चेन स्नॅचिंग करायची. विविध भागात राहणारे हे चोरटे एकमेकांशी संपर्क साधायचे, परिसरात रेकी करायचे, टार्गेट सेट करून चेन हिसकावून पसार व्हायचे.
इतकंच नव्हे तर पोलीस चौकशी करून गेले की टोळीतील इतरांना खबर ही पोहोचायची. हे नेमकं कसं घडतंय? याची पोलिसांना कानोकान खबर लागत नव्हती. मोबाईल नंबर वरूनही ट्रेस होत नव्हतं. त्यामुळे पोलीस पुरते हैराण झाले होते, महिला-तरुणी भयभीत झाल्या होत्या. पोलिसांच्या नावाने शिमगा ही सुरू होता. या टोळीला जेरबंद करण्यासाठी सांगवी पोलिसांनी सापळा रचला. काही दिवसांपूर्वी याच सापळ्यात दोन चोरटे फसले. त्यांच्याकडून दहा गुन्हे उघडकीस आले आणि पोलिसांनी सुटकेचा निश्वास सोडला.
पण काही दिवसांच्या अंतराने पुन्हा एकदा चेन स्नॅचिंगचा गुन्हा घडला, पुन्हा तोच फंडा चोरटे अवलंबवू लागले. मग आधी बेड्या ठोकलेल्या दोन्ही चोरट्यांना पोलिसी खाक्या दाखवला गेला आणि चोरीचा नवा आधुनिक फंडा समोर आला. चेन स्नॅचिंग कुठं, कशी आणि कधी करायची यासाठी कसं भेटायचं हा कट पब्जी गेम आणि इन्स्टाग्राम वर रचला जायचा. इतकंच नव्हे तर एकाकडे पोलीस चौकशी करायला आले आहेत याची माहिती इतर सदस्यांना यावरूनच दिली जायची. पोलीस मोबाईल नंबर वरून चोरट्यांचा माग काढतात याची पूर्ण कल्पना असल्याने हा नवा आणि आधुनिक फंडा चेन स्नॅचिंग साठी अवलंबला गेला. पण हा ही फंडा पोलिसांनी खोडून काढला आणि अन्य दोन चोरट्यांना ही जेरबंद करत, या टोळीचा पर्दाफाश केला. त्यांच्याकडून एकूण सतरा गुन्हे उघडकीस आलेले आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
परभणी
राजकारण
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)