एक्स्प्लोर

महाराज भागवत कथा सांगायला आले अन् गावातल्या विवाहितेला घेऊन पळाले

कुटुंबातील एका सुनेला महाराजाने प्रेमाच्या जाळ्यात अडकवलं आणि भागवत सप्ताह आटोपताच विवाहितेला घेवून महाराजांनी पलायन केले. या महाराजाविरुद्ध भंडारा शहर पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

भंडारा : भागवत कथेच्या माध्यमातून संस्काराच्या गोष्टी सांगणाऱ्या भागवत कथाकार महाराजाने सप्ताह सुरु असलेल्या गावातील एका विवाहित महिलेला घेऊन पोबारा केला आहे. भंडारा जिल्ह्यातील मोहदुरा गावात ही खळबळजनक घटना घडली आहे. नागपूर जिल्ह्याच्या सावनेर तालुक्यातील कुबाडा गावातील 35 वर्षीय महाराजाचे नाव दिनेश मोहतुरे असं आहे. भंडाराजवळच्या मोहदूरा येथे दरवर्षीप्रमाणे भागवत सप्ताह कथाचे आयोजन 27 जानेवारी ते 3 फेब्रुवारीपर्यंत करण्यात आले होते. या दरम्यान दिनेश मोहतुरे गावातील एका कुटुंबातच मुक्कामी थांबला होता. त्याच कुटुंबातील एका सुनेला महाराजाने प्रेमाच्या जाळ्यात अडकवलं आणि भागवत सप्ताह आटोपताच विवाहितेला घेवून महाराजांनी पलायन केले. या महाराजाविरुद्ध भंडारा शहर पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. भंडाराजवळच्या मोहदूरा येथे उघडकीस आलेल्या या घटनेने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. आता सदर महिलेचा पती पोलिसांच्या मदतीने महाराज आणि पत्नीचा शोध घेत आहे. मोहदूरा येथे दरवर्षीप्रमाणे भागवत सप्ताह कथाचे आयोजन केले होते. दरवर्षी कथावाचन करणाऱ्या दिनेश मोहतुरे महाराजांना आमंत्रित करण्यात आले होते. कथा सप्ताहात महाराजांनी आपल्या रसाळ वाणीने गावकऱ्यांना मंत्रमुग्ध केले. महाराज भागवत कथा सांगायला आले अन् गावातल्या विवाहितेला घेऊन पळाले अशातच त्यांची नजर सप्ताहातील एका विवाहितेवर गेली. तिच्या कुटुंबियांशी जवळीक साधत त्या विवाहितेला मोहपाशात अडकवले. 3 फेब्रुवारीला भागवत सप्ताहाचा समारोप झाला. मात्र पाच फेब्रुवारीला बुधवारी सायंकाळी महाराज सदर विवाहितेला घेऊन पळाले. विवाहिता घरी नसल्याची माहिती होताच शोधाशोध केली. मात्र ती मिळून आली नाही. विशेष म्हणजे विवाहितेला पाच वर्षांची मुलगीही आहे. महाराजांचेच हे कृत्य असावे, असा संशय कुटुंबीयांना आला. यानंतर भंडारा पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली. पोलिसांना सोबत घेऊन सदर विवाहितेच्या पतीने महाराजाचे मूळ गाव सावनेर तालुक्यातील कुबडा गाव गाठले. मात्र महाराज गावात आले नसल्याचे त्यांना कळाले. पोलीस महाराज आणि त्या विवाहितेचा शोध घेत आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

ऊस दराचा तिढा कायम! साखर कारखानदार 3150 वर ठाम, शेतकरी संघटनेची भूमिका काय? बैठकीत नेमकी काय झाली चर्चा?  
ऊस दराचा तिढा कायम! साखर कारखानदार 3150 वर ठाम, शेतकरी संघटनेची भूमिका काय? बैठकीत नेमकी काय झाली चर्चा?  
काही लोकांनी खूप मोठ्या बैठका घेतल्या, जिल्हाभर फिरुन निवडून लढवण्याची तयारी केली, पण... जयकुमार गोरेंचा नाव न घेता मोहिते पाटलांना टोला
काही लोकांनी खूप मोठ्या बैठका घेतल्या, जिल्हाभर फिरुन निवडून लढवण्याची तयारी केली, पण... जयकुमार गोरेंचा नाव न घेता मोहिते पाटलांना टोला
सत्ताधारी शेतकऱ्यांना उध्वस्त करतायेत, फायनान्सवाले आले तर पैसे नाहीत म्हणायचं, जरांगे पाटलांचा हल्लाबोल
सत्ताधारी शेतकऱ्यांना उध्वस्त करतायेत, फायनान्सवाले आले तर पैसे नाहीत म्हणायचं, जरांगे पाटलांचा हल्लाबोल
दादर रेल्वे स्थानकाला ‘चैत्यभूमी’ नाव देण्याच्या हालचाली गतीमान; विधिमंडळ अधिवेशनात पूर्तता, मुख्यमंत्र्यांचे सूतोवाच
दादर रेल्वे स्थानकाला ‘चैत्यभूमी’ नाव देण्याच्या हालचाली गतीमान; विधिमंडळ अधिवेशनात पूर्तता, मुख्यमंत्र्यांचे सूतोवाच

व्हिडीओ

Shaina NC Balasaheb Thackeray Photo : होता काँग्रेसशी 'सामना', फोटोमुळे वादात शायना Special Report
Maharashtra Jilha bank Politics : घराणेशाहीचं 'सहकार', जिल्हा बँकांमध्ये 'वारसदार' Special Report
Sanjay Raut Delhi : अश्विनी भिडेंच्या पत्राची दखल घेत ३०० प्रकल्पांना तात्काळ स्थगिती द्यावी
Shiv Sena PC : सोनिया गांधींच्या पुस्तकाचा निषेध,शिवसेनेने पुस्तकाचा 'तो' मजकूर फाडला
Shaina NC Balasaheb Thackeray Photo: ओहहह नोनोनो....; शिंदेंच्या शायना एनसींनी चुकून बाळासाहेबांचा फोटो फाडला, पेडणेकर संतापल्या

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gold Silver Rate : सोने चांदी खरेदी करणाऱ्यांची दिवाळी, सलग सातव्या दिवशी सोनं स्वस्त, चांदी 5000 रुपयांनी स्वस्त
सोने चांदी खरेदी करणाऱ्यांची दिवाळी, सलग सातव्या दिवशी सोनं स्वस्त, चांदी 5000 रुपयांनी स्वस्त
दम होता तर बँकेची निवडणूक स्वतंत्र लढायची होती; जयकुमार गोरेंचा शंभुराज देसाईंवर सोलापुरातून पलटवार
दम होता तर बँकेची निवडणूक स्वतंत्र लढायची होती; जयकुमार गोरेंचा शंभुराज देसाईंवर सोलापुरातून पलटवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 नोव्हेंबर 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 नोव्हेंबर 2026 | बुधवार
दादर रेल्वे स्थानकाला ‘चैत्यभूमी’ नाव देण्याच्या हालचाली गतीमान; विधिमंडळ अधिवेशनात पूर्तता, मुख्यमंत्र्यांचे सूतोवाच
दादर रेल्वे स्थानकाला ‘चैत्यभूमी’ नाव देण्याच्या हालचाली गतीमान; विधिमंडळ अधिवेशनात पूर्तता, मुख्यमंत्र्यांचे सूतोवाच
Sudhir Mungantiwar: सरकार इंग्रजापेक्षा वाईट असा मेसेज जाऊ नये; सुधीर मुनगंटीवारांचा बैठकीत आग्रह, सरकारला घरचा अहेर
सरकार इंग्रजापेक्षा वाईट असा मेसेज जाऊ नये; सुधीर मुनगंटीवारांचा बैठकीत आग्रह, सरकारला घरचा अहेर
Satara DCC Bank : दोन पदांसाठी प्रत्येकी एकच अर्ज, वचपा काढल्याचा दावा करणं चुकीचं, मकरंद पाटील म्हणाले महायुती म्हणून तिन्ही पक्ष एकत्र आल्यानं जिल्ह्यात चांगला संदेश गेला...
दोन पदांसाठी प्रत्येकी एकच अर्ज, निवडणूक बिनविरोध,वचपा काढल्याचा दावा करणं चुकीचं: मकरंद पाटील
शायना एनसी असू, नाहीतर कोणीही...; शिवसेना प्रवक्त्यांनी बाळासाहेबांचा फोटो फाडला, एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
शायना एनसी असू, नाहीतर कोणीही...; शिवसेना प्रवक्त्यांनी बाळासाहेबांचा फोटो फाडला, एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
Belonging: A Journey of Love : सोनिया गांधींच्या पुस्तकाची किती झाली कमाई? 2 लाखांहून अधिक प्रती विकल्या, किती कोटींची विकली पुस्तकं?
सोनिया गांधींच्या पुस्तकाची किती झाली कमाई? 2 लाखांहून अधिक प्रती विकल्या, किती कोटींची विकली पुस्तकं?
Embed widget