एक्स्प्लोर

Nitin Gadkari: 'मैं डंडा लेके बैठा हूँ, मुझे मैनेज करने वाला पैदा नहीं हुआ', पेट्रोलियम लॉबीविरोधात नितीन गडकरींची जोरदार टोलेबाजी

Nitin Gadkari : केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी पुण्यात आयोजित करण्यात आलेल्या इंडियन फेडरेशन ऑफ ग्रीन एनर्जी कार्यक्रमाच्या उद्घाटनावेळी जोरदार टोलेबाजी केलीय.

Nitin Gadkari : केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी पुण्यात (Pune) आयोजित करण्यात आलेल्या इंडियन फेडरेशन ऑफ ग्रीन एनर्जी कार्यक्रमाच्या उद्घाटनावेळी पेट्रोलियम लॉबीवर जोरदार टीका करत स्पष्ट शब्दांत इशारा दिला. 'मैं डंडा लेके बैठा हूँ, मुझे मैनेज करने वाला पैदा नहीं हुआ', असे त्यांनी म्हटले आहे. 

कार्यक्रमात बोलताना गडकरी म्हणाले की, “आपला देश आत्मनिर्भर झाला पाहिजे. मी याआधी अनेक योजना सांगितल्या तेव्हा लोक माझ्यावर हसायचे आणि मला वेड म्हणायचे. पण मी त्या क्षेत्रात काम करून दाखवले आहे.” ग्रीन एनर्जीच्या क्षेत्रात काम करणाऱ्यांना प्रोत्साहन देताना त्यांनी कठोर भूमिकाही व्यक्त केली. “मैं डंडा लेके बैठा हूँ, मुझे मैनेज करने वाला पैदा नहीं हुआ. अच्छा काम करो, नहीं तो मैं ठोकता हूँ,” असे म्हणत त्यांनी उपस्थितांमध्ये एकच हशा आणि टाळ्यांचा कडकडाट निर्माण केला.

Nitin Gadkari: माझ्या विरोधात मोठ्या प्रमाणात पेट्रोलियम लॉबी

गडकरी यांनी पेट्रोलियम लॉबीवर थेट निशाणा साधत सांगितले की, “माझ्या विरोधात पेट्रोलियम लॉबी मोठ्या प्रमाणात आहे. ही लॉबी ग्रीन एनर्जीला सहजपणे काम करू देईल असे वाटत नाही.” मात्र अशा दबावाला आपण घाबरणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

Nitin Gadkari: आम्ही दुसऱ्याच्या छातीवर चढूनही लढू शकतो

“जो लढाई सोडून पळतो तो संपतो. त्यामुळे भीती बाळगण्याची गरज नाही. आम्ही दुसऱ्याच्या छातीवर चढूनही लढू शकतो, जिंकू शकतो आणि यशस्वी होऊ शकतो,” असे सांगत त्यांनी ग्रीन एनर्जी क्षेत्रातील उद्योजकांना आत्मविश्वास न सोडण्याचे आवाहन केले. देशाच्या ऊर्जा सुरक्षेसाठी पर्यायी ऊर्जा स्रोतांचा विकास करणे ही काळाची गरज असल्याचे सांगत गडकरी यांनी जैवइंधन, इथेनॉल, ग्रीन हायड्रोजन आणि इतर पर्यायी ऊर्जेच्या प्रकल्पांना चालना देण्यावर भर दिला. पुण्यातील या कार्यक्रमात गडकरी यांच्या स्पष्टवक्तेपणामुळे आणि पेट्रोलियम लॉबीवर केलेल्या टोलेबाजीमुळे राजकीय तसेच औद्योगिक वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

Iran Israel Conflict Affect In India: ज्याची भीती होती, तेच झालं...इराण आणि अमेरिका-इस्त्रायल युद्धाच्या झळा महाराष्ट्रापर्यंत पोहोचल्या, सरकारकडून महत्वाचे आदेश

Nashik Crime News: कायद्याचा बालेकिल्ला म्हणणाऱ्या नाशिक पोलिसांना रोडरोमिओंचं चॅलेंज, रनिंगला गेलेल्या तरुणीची टवाळखोराने काढली छेड, सोशल मिडियावर सांगितली आपबिती

गेल्या दहा वर्षांपासून एबीपी माझा मध्ये कार्यरत. पुण्यासह दिल्ली पंजाब आणि गुवाहाटी मध्ये काम करण्याची संधी मिळाल्यामुळे कृतज्ञ. वार्तांकन व्यतिरिक्त पर्यटनाचा छंद...
Read More
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Satara : एकनाथ शिंदेंच्या सभेच्या बॅनरवरुन महेश शिंदेंचा फोटो गायब, पक्षविरोधी भूमिका घेतल्याने कार्यकर्ते नाराज असल्याची चर्चा
एकनाथ शिंदेंच्या सभेच्या बॅनरवरुन महेश शिंदेंचा फोटो गायब, पक्षविरोधी भूमिका घेतल्याने कार्यकर्ते नाराज असल्याची चर्चा
NCP Sangli News: राष्ट्रवादी काँग्रेसमधील पक्षांतर्गत संघर्ष उफाळला; 35 पदाधिकाऱ्यांनी शहर जिल्हाध्यक्षांकडे दिले राजीनामे, नेमकं प्रकरण काय?
राष्ट्रवादी काँग्रेसमधील पक्षांतर्गत संघर्ष उफाळला; 35 पदाधिकाऱ्यांनी शहर जिल्हाध्यक्षांकडे दिले राजीनामे, नेमकं प्रकरण काय?
Ratnagiri Bauxite Mining Project: बागायतींपासून पाण्यापर्यंत सर्वकाही धोक्यात, गंभीर आजारांचंही सावट, रत्नागिरीतील बॉक्साईट प्रकल्पाला ठाकरे गटाचा तीव्र विरोध, कोकणात पुन्हा 'रिफायनरी'सारखा लढा?
बागायतींपासून पाण्यापर्यंत सर्वकाही धोक्यात, गंभीर आजारांचंही सावट, रत्नागिरीतील बॉक्साईट प्रकल्पाला ठाकरे गटाचा तीव्र विरोध, कोकणात पुन्हा 'रिफायनरी'सारखा लढा?
Vijay Wadettiwar on Navneet Rana: 'नवनीत राणा जातीय विष पसरवणारी विषवल्ली', विजय वडेट्टीवारांची बोचरी टीका, 'हिरवे साप' म्हणत राणांचा पलटवार
'नवनीत राणा जातीय विष पसरवणारी विषवल्ली', विजय वडेट्टीवारांची बोचरी टीका, 'हिरवे साप' म्हणत राणांचा पलटवार
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Shyam Manav Akola : अशोक खरात प्रकरण सरकारचंच पाप, श्याम मानव यांची प्रतिक्रिया
Vijay Wadettiwar PC : नवनीत राणा जातीय विष पेरण्यासाठी पोसलेली आणि पाणी घालून जिवंत ठेवणारी विषवल्ली
Vishwas Nangare Patil : 5 मिनिटात प्रेरणादायी विचार नांगरे पाटलांचे कोकरूडमधील भाषण
Rohit Pawar Latur : VSR कंपनीच्या मालकांना सरकार एवढे का घाबरत आहे? रोहित पवार यांचा सवाल
PM Modi UNCUT : काँग्रेसने महिलांच्या अधिकारांची भ्रूणहत्या केली, स्वप्नांचा चक्काचूर केला- मोदी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'अब नहीं आऊंगा दोस्त' गॅस सिलेंडर मिळेना, वस्त्रोद्योग थांबला, गुजरातमधून लाखो यूपी बिहारी कामगारांची दैना, भीषण गर्मीत सुरत रेल्वे स्टेशनवर हजारोंचा जमाव; पोटाला चिमटा काढत आतापर्यंत 3 लाखांवर घरी परतले
'अब नहीं आऊंगा दोस्त' गॅस सिलेंडर मिळेना, वस्त्रोद्योग थांबला, गुजरातमधून लाखो यूपी बिहारी कामगारांची दैना, भीषण गर्मीत सुरत रेल्वे स्टेशनवर हजारोंचा जमाव; पोटाला चिमटा काढत आतापर्यंत 3 लाखांवर घरी परतले
Weather Update: भारतात भीषण उष्णतेची लाट; अनेक राज्यांमध्ये तापमान 45 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचलं, विदर्भ, मध्य प्रदेशात कहर, पुढील तीन दिवस पावसाचा सुद्धा इशारा
भारतात भीषण उष्णतेची लाट; अनेक राज्यांमध्ये तापमान 45 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचलं, विदर्भ, मध्य प्रदेशात कहर, पुढील तीन दिवस पावसाचा सुद्धा इशारा
साताऱ्यात पाळीव जनावरांसाठी राज्यातील पहिलं ब्युटी पार्लर, थेट शॉवर आणि स्वच्छतेची सोय
साताऱ्यात पाळीव जनावरांसाठी राज्यातील पहिलं ब्युटी पार्लर, थेट शॉवर आणि स्वच्छतेची सोय
Video: मृतदेहासोबत चक्क '8888' नंबरची आलिशान कार सुद्धा दफन! भलत्याच अखेरच्या निरोपाने एकच खळबळ; वाद वाढल्यानंतर प्रशासनाने गंभीर दखल घेताच आता भेदरलेल्या कुटुंबीयांनी..
Video: मृतदेहासोबत चक्क '8888' नंबरची आलिशान कार सुद्धा दफन! भलत्याच अखेरच्या निरोपाने एकच खळबळ; वाद वाढल्यानंतर प्रशासनाने गंभीर दखल घेताच आता भेदरलेल्या कुटुंबीयांनी..
Sharad Ponkshe : मराठा साम्राज्य अटकेपार नेणाऱ्या बाजीराव पेशव्यांवर साधी एक सिरीयल येत नाही, फक्त मस्तानी... शरद पोंक्षेंच्या मनातली खंत
मराठा साम्राज्य अटकेपार नेणाऱ्या बाजीराव पेशव्यांवर साधी एक सिरीयल येत नाही, फक्त मस्तानी... शरद पोंक्षेंच्या मनातली खंत
Ajit Agarkar: अनेक धाडसी निर्णयांनी चकित केलेल्या अजित आगरकरांना बीसीसीआयकडून मोठं गिफ्ट, पण रोहित, विराट अन् शमीसह अनेकांना बॅड न्यूज!
अनेक धाडसी निर्णयांनी चकित केलेल्या अजित आगरकरांना बीसीसीआयकडून मोठं गिफ्ट, पण रोहित, विराट अन् शमीसह अनेकांना बॅड न्यूज!
दोरीने हात बांधलेल्या अवस्थेत विहिरीतून सख्ख्या बहिणींचे मृतदेह बाहेर काढले; गावात सन्नाटा, पोलीसही चक्रावले
दोरीने हात बांधलेल्या अवस्थेत विहिरीतून सख्ख्या बहिणींचे मृतदेह बाहेर काढले; गावात सन्नाटा, पोलीसही चक्रावले
Ravichandran Ashwin: चेन्नईचा सरसेनापती बदलणार? आयपीएलच्या मध्यावरच आर. आश्विनच्या भविष्यवाणीने खळबळ
चेन्नईचा सरसेनापती बदलणार? आयपीएलच्या मध्यावरच आर. आश्विनच्या भविष्यवाणीने खळबळ
Embed widget