एक्स्प्लोर

Maharashtra Budget 2026: मेट्रो ते रस्त्याचे सहा पदरीकरण... मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अर्थसंकल्पात पुणे शहरासाठी कोणत्या महत्त्वाच्या घोषणा केल्या?

Maharashtra Budget 2026: अर्थसंकल्पात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुणे शहरासाठी काय काय मोठ्या घोषणा केल्या आहेत, त्या जाणून घ्या सविस्तर.

Maharashtra Budget 2026: राज्याचं अर्थसंकल्पीय (Maharashtra Budget 2026) अधिवेशन सध्या सुरू आहे. या पार्श्वभूमीवर आज (6 मार्च) राज्याचा अर्थसंकल्प मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडला. उपमुख्यमंत्री आणि राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर आज अर्थसंकल्प देवेंद्र फडणवीस सादर करण्यात आला. या अर्थसंकल्पात (Maharashtra Budget 2026) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुणे शहरासाठी काय काय मोठ्या घोषणा केल्या आहेत, त्या जाणून घ्या सविस्तर.(Maharashtra Budget 2026)

अर्थसंकल्पात पुणे शहराला काय काय मिळालं?

१) पुणे लोणावळा तिसऱ्या व चौथा रेल्वे मार्गीकेच्या पाच हजार 100 कोटी रुपयांचा प्रकल्पास मान्यता देण्यात आली आहे या प्रकल्पाचा पिंपरी चिंचवड आकुर्डी आणि तळेगाव या औद्योगिक पट्ट्यांना थेट लाभ होईल. 

२) पुणे महानगर मेट्रो टप्पा दोन मधील खडकवासला स्वारगेट हडपसर खराडी या मेट्रो मालिकेच्या उपमार्गीका हडपसर ते लोणी काळभोर हडपसर बस डेपो ते सासवड रोड या प्रकल्पास मान्यता देण्यात आली आहे. 

३) पुण्यातील रामवाडी ते वाघोली दरम्यान 11 किलोमीटर लांबीच्या मेट्रो प्रकल्पा लादेखील मान्यता देण्यात आली आहे. 

४) येरवडा ते कात्रज आणि हिंजवडी ते सिंहगड रोड या 54 किलोमीटर दुहेरी दुहेरी मार्गाचा अहवाल तयार करण्यात येत आहे.

५) पुणे ते शिरूर 53 किलोमीटर लांबीची 7514 कोटी रुपये किमतीचे काम मंजूर करण्यात आले आहे 

६) तळेगाव चाकण हा 6499 कोटी रुपयांचा 25 किलोमीटर लांबीचा उन्नत मार्ग चाकण शिक्रापूर या 5232 कोटी रुपयांच्या 28 किलोमीटर लांबीच्या रस्त्याच्या सहा पदरीकरणाची कामे हाती घेण्यात आली आहेत. 

७) पुणे ते छत्रपती संभाजी नगर जलद व सुलभ प्रवासासाठी शिरूर ते छत्रपती संभाजी नगर या १९२ किलोमीटर लांबीच्या 14886 कोटी रुपये किमतीच्या ग्रीनफिल्ड महामार्गाचा प्रकल्प अहवाल तयार करण्यात येत आहे.

८) हडपसर यवत या 5262 कोटी रुपये किमतीच्या 31. 50 किलोमीटर लांबीच्या सहा पदरी रस्त्याचे काम हाती घेण्यात आले आहे.

९) याशिवाय देहू येथे विकास आराखडा राबविण्याची घोषणा करण्यात आली. संत तुकाराम महाराजांच्या पवित्र स्थळाच्या विकासासाठी हा आराखडा महत्त्वाचा ठरणार असल्याचे सांगण्यात आले. 

अर्थसंकल्पात 10 इतर मोठ्या घोषणा 

1. हा अर्थसंकल्प 2047 च्या विकासाकडे जाणारा आहे. ⁠महात्मा फुले यांच्या जन्माला 200 वर्ष पूर्ण होत आहे. यासाठी एक समिती स्थापन करुन विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यासाठी निधी दिला जाईल. संत गाडगेबाबा तीर्थक्षेत्र सर्किट विकसित करण्यात येणार आहे. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शताब्दी वर्षानिमित्त रायगड येथे पायाभूत सुविधा केल्या जातील. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचं काम पूर्ण झालं आहे. ग्रामसमृद्धी अभियान राबवलं जाणार आहे. 

2. अजित दादा पवार यांनी 11 वेळा अर्थसंकल्प मांडला. त्यांच्या करडी स्वभावामुळे शिस्त राहिली. त्यांना श्रद्धांजली म्हणून अजित दादा पवार यांचे भव्य स्मारक उभारले जाईल. त्यांच्या नावाने नागरी पुरस्कार सुरु केला जाईल. हा अर्थसंकल्प मी त्यांना समर्पित करतो, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. 

3. मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेचा तिसरा टप्पा मंजूर करण्यात आला आहे.  ग्रामसडक योजनेअंतर्गत ३० हजार गावे जोडली.  २४५० किमी रस्त्यांची कामं पूर्ण झाली असून २३ हजार पूलांचं काम हाती घेतलं आहे.  मुंबई-पुणे जलदगती ट्रेनसाठी तरतूद करण्यात आली आहे. 

4. गोपीनाथ मुंडे अपघात योजनेत शेतमजूरांचा हा सहभाग करणार असल्याची घोषणा देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. पाणंद रस्त्यांना मान्यता दिली आहे. 30 लाखांहून अधिक शेतकऱ्यांना हवामान, बाजारभाव माहिती दिली जात आहे. चारही कृषि विद्यापीठात एआयची मदत घेतली जात आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यास मदत होत आहे. अॅग्रीस्टॅक योजना राबविण्यात येत आहे. १ कोटी ३१ लाख फार्मर आयडी फेब्रुवारी पर्यंत झाले आहे. चार वर्षांत भांडवली गुंतवणूक वाढवून पायाभूत सुविधा निर्माण केल्या जातील. आगामी दोन वर्षांत महाराष्ट्र नैसर्गिक शेती अभियानाची सुरुवात होणार आहे. 

5. राज्याचे नवे गुंतवणूक धोरण जाहीर करण्यात आले आहे. प्रत्येक जिल्ह्यात सुक्ष्म व लघू केंद्र स्थापन केले जातील. सूक्ष्म, लघु आणि मध्य उद्योग केंद्र उभारणार आहोत. ५० लाख प्रत्यक्ष रोजगार निर्माण होणार आहे.  प्रधानमंत्री सौर योजनेअंतर्गत रुफ टॉप सोलर बसवणार,  बांबू विकास प्रकल्प वाढवणार,  परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्र अव्वल आहे. मुंबई आणि पुण्यात 50 अब्ज डॉलरचे केंद्र तयार करण्याचे उद्दिष्ट आहे. गडचिरोली नवं स्टील हब म्हणून उदयास आले आहे. 

6. मुंबईत केंद्राच्या मदतीने इंडियन इन्स्टिट्यूट क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी सुरु,  पुणे हे जीसीसीसाठी देशात सर्वाधिक पसंतीचे शहर आहे.  जगात गेमिंग क्षेत्रात अव्वल होण्यासाठी महाराष्ट्रात 295 पेक्षा जास्त गेमिंग स्टुडिओ तयार करणार असल्याची माहिती त्यांनी दिली. 

7. सातारा जिल्ह्यातील वासोटा किल्ल्यावर पर्यटकांसाठी रोप वे प्रकल्प उभारणार आहोत. नागपूरच्या रामटेकमध्ये तिसरी चित्रसृष्टी उभारणार आहोत.  

8. मुंबईत अजून एक भुयारी मेट्रो करणार, अटल सेतू मुंबई विमानतळाला जोडणार, राज्यात 1 हजार 200 किमीचे मेट्रो मार्ग उभारणार आहोत. 6 हजार किमीचे द्रुतगती मार्ग विकसित करणार आहोत. 2029 पर्यंत 165 किमी मेट्रो मार्गिका तयार करणार आहोत. दक्षिण मुंबईला 2028 पर्यंत समृद्धी महामार्गासोबत जोडणार आहोत. वर्सोवा-भाईंदर किनारी मार्ग डिसेंबर 2028 पर्यंत पूर्ण करणार, पनवेल ते कर्जत मार्ग अंतिम टप्प्यात, लवकरच वाहतुकीसाठी खुला करणार असल्याची घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी केली.

9. कर्जमाफी योजना राबवण्याचं आश्वासन दिलं होतं. 30 सप्टेंबर 2025 रोजी पीक कर्ज थकित असलेल्या शेतकऱ्यांना 2 लाख रुपयांपर्यंत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना जाहीर करत असल्याची घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी केली.

महत्त्वाच्या बातम्या

CNG PNG Price Hike Pune: पुणेकरांना पुन्हा महागाईचा फटका; सीएनजी अन् पीएनजीच्या दरात तिसऱ्यांदा वाढ, डिझेल आणि एटीएफ बाबतच्या निर्णयानंतर पेट्रोल-डिझेलही महागणार?
पुणेकरांना पुन्हा महागाईचा फटका; सीएनजी अन् पीएनजीच्या दरात तिसऱ्यांदा वाढ, डिझेल आणि एटीएफ बाबतच्या निर्णयानंतर पेट्रोल-डिझेलही महागणार?
धक्कादायक! पुण्यात तरुणीला धरणाच्या कालव्यात ढकललं, तरुणानेही उडी मारली; पोलिसांनी आरोपीला पकडलं
धक्कादायक! पुण्यात तरुणीला धरणाच्या कालव्यात ढकललं, तरुणानेही उडी मारली; पोलिसांनी आरोपीला पकडलं
Tukaram Mundhe: पुण्यात नव्या दुचाकीची खरेदी, मिठाईतून 7 जणांना विषबाधा; थेट तुकाराम मुंढेंशी संपर्क अन् स्वीट मार्ट सील
Tukaram Mundhe: पुण्यात नव्या दुचाकीची खरेदी, मिठाईतून 7 जणांना विषबाधा; थेट तुकाराम मुंढेंशी संपर्क अन् स्वीट मार्ट सील
मुख्यमंत्री विद्यार्थ्यांच्या स्वागताला, देवेंद्र फडणवीस अन् सुनेत्रा पवारांची 'शाळा' ठरली; एकनाथ शिंदेंनी सायकल वाटल्या
मुख्यमंत्री विद्यार्थ्यांच्या स्वागताला, देवेंद्र फडणवीस अन् सुनेत्रा पवारांची 'शाळा' ठरली; एकनाथ शिंदेंनी सायकल वाटल्या

व्हिडीओ

Ambadas Danve On Operation Tiger : दम असेल तर निवडून आणा, दुसऱ्यांची पोरं का लागतात
Nitin Deshmukh On Operation Tiger : फुटणाऱ्यांना लाज वाटू दे, मशालीवर निवडून आलात
Operation Tiger : ऑपरेशन टायगर - दिल्लीत हालचालींना वेग, एकनाथ शिंदे आणि UBT खासदार दिल्लीत
Maharashtra Operation Tiger : ठाकरेंचे सहा खासदार शिंदेंच्या गळाला? कोण कुठे आहे? आत्ताची मोठी अपडेट
Raju Waghmare On Operation Tiger Zero Hour : २०२९ पर्यंत उद्धव ठाकरे यांचा पक्ष संपलेला असेल? | Zero Hour

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sanjay Raut on Operation Tiger: उद्धव ठाकरेंनी तुमच्यावर भावासारखं प्रेम केलं, पण हे भोसxxx यांच्या अंगात गद्दारी भिनलीय; संजय राऊतांची फुटीर खासदारांवर आगपाखड
उद्धव ठाकरेंनी तुमच्यावर भावासारखं प्रेम केलं, पण हे भोसxxx यांच्या अंगात गद्दारी भिनलीय; संजय राऊतांची फुटीर खासदारांवर आगपाखड
Operation Tiger UBT Shivsena: 'ऑपरेशन टायगर' फत्ते! ठाकरे गटाचे 6 खासदार लोकसभा अध्यक्षांना पत्र देणार; वेळही ठरली, ठाकरे गटात पुन्हा मोठा भूकंप
'ऑपरेशन टायगर' फत्ते! ठाकरे गटाचे 6 खासदार लोकसभा अध्यक्षांना पत्र देणार; वेळही ठरली, ठाकरे गटात पुन्हा मोठा भूकंप
Operation Tiger UBT Shivsena: सहा खासदार फुटताच उद्धव ठाकरेंचं मोठं पाऊल, सर्व खासदारांना व्हीप धाडला, संसदीय दलाची बैठक बोलावली
सहा खासदार फुटताच उद्धव ठाकरेंचं मोठं पाऊल, सर्व खासदारांना व्हीप धाडला, संसदीय दलाची बैठक बोलावली
Operation Tiger UBT Shivsena: एकनाथ शिंदेंच्या ‘त्या’ एका आश्वासनावर 6 खासदार उद्धव ठाकरेंना सोडायला तयार झाले; ऑपरेशन टायगरची सर्वात मोठी अपडेट
एकनाथ शिंदेंच्या ‘त्या’ एका आश्वासनावर 6 खासदार उद्धव ठाकरेंना सोडायला तयार झाले; ऑपरेशन टायगरची सर्वात मोठी अपडेट
Operation Tiger Live updates: ‘बाळासाहेबांनी ज्यांच्यावर मुलासारखं प्रेम केलं, उद्धवजींनी भावासारखं..., त्यांच्यासोबत गद्दारी’; संजय राऊतांचा हल्लाबोल
Operation Tiger Live updates: ‘बाळासाहेबांनी ज्यांच्यावर मुलासारखं प्रेम केलं, उद्धवजींनी भावासारखं..., त्यांच्यासोबत गद्दारी’; संजय राऊतांचा हल्लाबोल
Operation Tiger UBT Shivsena: मोठी बातमी : ठाकरेंच्या 6 फुटीर खासदारांचा गट स्थापन, आता शिंदेंच्या शिवसेनेत विलीन होणार!
मोठी बातमी : ठाकरेंच्या 6 फुटीर खासदारांचा गट स्थापन, आता शिंदेंच्या शिवसेनेत विलीन होणार!
Shivsena : ठाकरेंच्या सहा खासदारांपाठोपाठ एकनाथ शिंदेही दिल्लीच्या दिशेने, लोकसभा अध्यक्षांची भेट घेऊन पाठिंब्याचं पत्र देणार, सूत्रांची माहिती
ठाकरेंच्या सहा खासदारांपाठोपाठ एकनाथ शिंदेही दिल्लीच्या दिशेने, लोकसभा अध्यक्षांची भेट घेऊन पाठिंब्याचं पत्र देणार, सूत्रांची माहिती
अभिनेत्री संचिताचे उज्ज्वल शर्मासोबतचे चॅट समोर, 3000 रुपये घेतलेले; नातेवाईकांचे आरोप, तोच मुलीला त्रास द्यायचा
अभिनेत्री संचिताचे उज्ज्वल शर्मासोबतचे चॅट समोर, 3000 रुपये घेतलेले; नातेवाईकांचे आरोप, तोच मुलीला त्रास द्यायचा
Embed widget