Maharashtra Budget 2026: अजितदादांच्या विमान अपघातानंतर बारामती विमानतळाबाबत मोठी घोषणा; देवेंद्र फडणवीसांनी अर्थसंकल्पातून A टू Z सांगितलं!
Maharashtra Budget 2026: राज्याचे मुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज महाराष्ट्राचा अर्थसंकल्प सादर केला.

Maharashtra Budget 2026: राज्याचे मुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आज (6 मार्च) महाराष्ट्राचा अर्थसंकल्प (Maharashtra Budget 2026) सादर केला. महाराष्ट्राच्या इतिहासात प्रथमच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अर्थसंकल्प सादर केला. विशेष म्हणजे अजित पवारांनी अर्थसंकल्पाची बहुतांश तयारी केलेली होती. मात्र अजित पवारांच्या अपघाती मृत्यूनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्प मांडला.
आजचा अर्थसंकल्प 2047 च्या विकासाकडे जाणारा आहे. महात्मा फुले यांच्या जन्माला 200 वर्षे पुर्ण होत आहे. यासाठी एक समिती स्थापन करुन विविध कार्यक्रम आयोजन करण्यासाठी निधी दिला जाईल. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शताब्दी वर्षा निमित्त रायगड येथे पायाभूत सुविधा केल्या जातील. सामाजीक समरसता वर्ष म्हणुन साजरा केला जाईल. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाच काम पुर्ण झालं आहे. तर राज्यात काही योजना सुरु केल्या जातील, अशी मोठी घोषणा देवेंद्र फडणवीसांनी केली.
बारामती विमानतळाबाबत मोठी घोषणा- (Devendra Fadnavis Announce On Baramati Airport)
राज्याचे दिवंगत उमुख्यमंत्री अजित पवारांच्या विमानाला 28 जानेवारीला अपघात (Ajit Pawar Plane Crash) झाला. बारामती विमानतळावर लँड होत असताना विमान कोसळलं आणि अजित पवारांसह पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. यानंतर चौकशी अहवालात बारामती विमानतळाबाबत विविध त्रुटी आढळून आल्या होत्या. याच बारामती विमानतळासह लातूर आणि अमरावती विमानतळासाठी देवेंद्र फडणवीसांनी अर्थसंकल्पात मोठी घोषणा केली आहे. लातूर, बारामती आणि अमरावती विमानतळावर रात्रीच्या उड्डाणांसाठी सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.
महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पात विमानतळांसाठी कोणत्या घोषणा? (Devendra Fadnavis On Maharashtra Airport)
- 25-12-25 पासून नवी मुंबई विमानतळावरुन देशांतर्गत उड्डाणांना सुरुवात
- पुरंदर-पुणे विमानतळासाठी विशेष प्राधिकरण, भूसंपादन अंतिम टप्प्यात
- गडचिरोली विमानतळासाठी भूसंपादन
- लातूर, बारामती आणि अमरावती विमानतळावर रात्रीच्या उड्डाणांसाठी सुविधा
- शिर्डी, नाशिका, संभाजीनगर, अमरावती, अकोला, रत्नागिरी, यवतमाळ, कराड विमान विस्तारीकरण
अजितदादांचं लवकरच स्मारक बांधणार- (Devendra Fadnavis On Ajit Pawar)
माझं अंतःकरण जड झालं आहे. अजितदादा यांनी 11 वेळा अर्थसंकल्प मांडला. त्यांच्या करडी स्वभावामुळे शिस्त राहिली. त्यांना श्रद्धांजली म्हणुन त्यांच भव्य स्मारक उभारलं जाईल. नागरी पुरस्कार त्यांच्या नावाने सुरु केला जाईल.हा अर्थसंकल्प त्याना सादर करतो, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. तसेच अजित पवार आज आपल्यात नाहीत त्याच्या जाण्यामुळे त्यांची पोकळी भरून निघू शकत नाही. काम करणारा माणूस अशी त्यांची ओळख होती. लवकरच अजितदादांचं स्मारक बनवण्यात येईल, अशी माहितीही देवेंद्र फडणवीसांनी यावेळी दिली.
महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पाचे सर्व अपडेट्स, VIDEO:
संबंधित बातमी:
महत्त्वाच्या बातम्या






















