एक्स्प्लोर

Pune Crime: पुण्यात आणखी एक धक्कादायक घटना, कॉल सेंटरमधली महिला गाडीत बसल्यावर ड्रायव्हरकडून हस्तमैथून, आरोपी उत्तर प्रदेशचा

Pune Crime: पुण्यात गेल्या काही दिवसांमध्ये महिलासंबंधीच्या गुन्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. स्वारगेटमध्ये एका प्रवासी तरूणीवरती अत्याचाराची घटना घडली आहे. त्यानंतर आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे.

पुणे: पुणे शहर परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर गुन्हेगारी वाढल्याचं चित्र आहे. शहरात महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवरती आला आहे. मंगळवारी स्वारगेट परिसरामध्ये बस डेपोमध्ये एका प्रवासी तरूणीवर बलात्कार केल्याची संतापजनक घटना घडली असताना आता दुसरीकडे कल्याणीनगर परिसरात एका 20 वर्षीय कॅब ड्रायव्हरने महिला सॉफ्टवेअर इंजिनिअरसमोर गैरवर्तन केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. 21 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी 7:30 वाजता, कल्याणीनगरमधील एका कंपनीतील महिला सॉफ्टवेअर इंजिनिअरने प्रवास करण्यासाठी कॅब बुक केली. संगमवाडी रोडवर तिला घेण्यासाठी एक कॅब आली. गाडी चालवत असताना, आरोपी तरुण ड्रायव्हरने रियर व्ह्यू मिररमधून महिलेकडे पाहून हस्तमैथून करण्यास सुरुवात केली. यामुळे भयभीत झालेल्या महिलेने सिग्नलला गाडी थांबताच पळ काढला आणि थेट पोलिस स्टेशन गाठले.

रविवारी खडकी पोलिसांनी 20 वर्षीय कॅब ड्रायव्हरला अटक केली. खडकी पोलिसांचे निरीक्षक गजानन चोरमले यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सुमित कुमार हा मूळचा उत्तर प्रदेशातील उन्नाव येथील असून, तो नुकताच मुंबईतून पिंपरी-चिंचवडला कामासाठी आला होता. जेव्हा कल्याणीनगरमधील एका कंपनीतील महिला सॉफ्टवेअर इंजिनिअरने प्रवास करण्यासाठी कॅब बुक केली. तेव्हा तो संगमवाडी रोडवर तरूणीला घेण्यासाठी गेला. गाडी चालवत असताना, आरोपी तरुण ड्रायव्हरने रियर व्ह्यू मिररमधून महिलेकडे पाहून हस्तमैथून करण्यास सुरुवात केली. यामुळे भयभीत झालेल्या महिलेने थेट पोलिस स्टेशन गाठले आणि तक्रार केली त्यानंतर संबंधित आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर

पुण्यातील आयटी कंपनीतील महिलेला कॅब प्रवासात धक्कादायक अनुभवाला सामोरे जावे लागले. या महिलेच्या तक्रारीनंतर ही बाब उघडकीस आली. आयटी कंपनीतील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. याप्रकरणी खडकी पोलिसांनी परप्रांतीय 20 वर्षीय कॅब चालकास अटक केली आहे.

खडकी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका आयटी कंपनीत कार्यरत असलेल्या 41 वर्षीय महिला अभियंता (टेक्नोलॉजी प्रोफेशनल) यांनी तक्रार दाखल केली आहे. पीडित महिलेने एका प्रसिद्ध ॲग्रीगेटर ॲपद्वारे कॅब बुक केली. कल्याणीनगर येथील आपल्या कार्यालयातून सायंकाळी साडेसातच्या सुमारास पिंपळे सौदागर येथे घरी जाण्यासाठी त्या निघाल्या होत्या. गाडी शहदवाल बाबा चौकात पोहोचली आणि संगमवाडी रोडमार्गे पाटील इस्टेट चौकाच्या दिशेने जाऊ लागली. तेव्हा चालकाने आरसा महिलेचा चेहरा दिसेल असा सेट केला. यानंतर तो आरशात महिलेला पाहून चालत्या गाडीत अश्लिल कृत्य करू लागला. पिडीत महिला घाबरली. गाडी सिग्नलपाशी थांबताच तिने दरवाजा उघडून बाहेर पळ काढला. यानंतर महिलेने थेट खडकी पोलीस ठाणे गाठले आणि या प्रकरणी तक्रार दिली.

दरम्यान कॅब चालकाने पुढे जाऊन महामार्गावर गाडी एका बाजूला थांबवली आणि तेथून पळ काढला. पोलिसांनी महिलेकडून कॅब बुकिंगचा तपशील आणि वाहन क्रमांक घेतला. त्याआधारे कॅब मालकाचा शोध लागल्यावर चालकाला अटक करण्यात आली. आरोपी मूळचा उत्तर प्रदेशातील असून काही दिवसांपूर्वीच पिंपरी-चिंचवड येथे स्थलांतरीत झाला आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल केल्याची माहिती सहा. पोलीस निरीक्षक चोरमोले यांनी दिली. मात्र पुणे शहरात गुन्हेगारीच्या प्रमाणात वाढ होत असून, महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

कॅबिनेट मंत्री नोटा मोजण्यात गुंग, मंत्र्याच्या PAला फाईल पास करण्यासाठी 20 लाख दिले; आपल्याच सरकारवर माजी भाजप मंत्र्याच्या आरोपाने खळबळ!
कॅबिनेट मंत्री नोटा मोजण्यात गुंग, मंत्र्याच्या PAला फाईल पास करण्यासाठी 20 लाख दिले; आपल्याच सरकारवर माजी भाजप मंत्र्याच्या आरोपाने खळबळ!
साखरपूडा सुरु असतानाच वधूची मैत्रिण आली आणि म्हणाली, माझे तिच्याशी समलैंगिक संबंध अन् थेट बंद खोलीत घेऊन गेली; प्रसंग पाहून गांगरलेल्या वराने...
Video : साखरपूडा सुरु असतानाच वधूची मैत्रीण आली आणि म्हणाली, माझे तिच्याशी समलैंगिक संबंध अन् थेट बंद खोलीत घेऊन गेली; प्रसंग पाहून गांगरलेल्या वराने...
पंकजा मुंडेंनी सुसंस्कृतपणा दाखवला, पण धनंजय मुंडेंनी...; सरपंच हत्याप्रकरणात सुप्रिया सुळेंची मोठी मागणी
पंकजा मुंडेंनी सुसंस्कृतपणा दाखवला, पण धनंजय मुंडेंनी...; सरपंच हत्याप्रकरणात सुप्रिया सुळेंची मोठी मागणी
Abu Azmi: औरंगजेबाचे गोडवे गाणाऱ्या अबू आझमींचं आयुष्य संकटात, म्हणाले, 'माझ्या जीवाचं बरंवाईट झालं तर....'
औरंगजेबाचे गोडवे गाणाऱ्या अबू आझमींचं आयुष्य संकटात, म्हणाले, 'माझ्या जीवाचं बरंवाईट झालं तर....'
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 04 PM TOP Headlines 04 PM 05 March 2025Abu Azmi : यूपी विधानपरिषदेत अबू आझमींच्या वक्तव्याचे पडसाद, आझमींची हकालपट्टी करा:योगी आदित्यनाथManikrao Kokate : माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, कोकाटेंच्या शिक्षेला स्थगितीBhaskar Jadhav Mumbai | सरकारचा महाराजांवरील प्रेमाचा बुरखा आज फाटला, भास्कर जाधवांचा संताप

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कॅबिनेट मंत्री नोटा मोजण्यात गुंग, मंत्र्याच्या PAला फाईल पास करण्यासाठी 20 लाख दिले; आपल्याच सरकारवर माजी भाजप मंत्र्याच्या आरोपाने खळबळ!
कॅबिनेट मंत्री नोटा मोजण्यात गुंग, मंत्र्याच्या PAला फाईल पास करण्यासाठी 20 लाख दिले; आपल्याच सरकारवर माजी भाजप मंत्र्याच्या आरोपाने खळबळ!
साखरपूडा सुरु असतानाच वधूची मैत्रिण आली आणि म्हणाली, माझे तिच्याशी समलैंगिक संबंध अन् थेट बंद खोलीत घेऊन गेली; प्रसंग पाहून गांगरलेल्या वराने...
Video : साखरपूडा सुरु असतानाच वधूची मैत्रीण आली आणि म्हणाली, माझे तिच्याशी समलैंगिक संबंध अन् थेट बंद खोलीत घेऊन गेली; प्रसंग पाहून गांगरलेल्या वराने...
पंकजा मुंडेंनी सुसंस्कृतपणा दाखवला, पण धनंजय मुंडेंनी...; सरपंच हत्याप्रकरणात सुप्रिया सुळेंची मोठी मागणी
पंकजा मुंडेंनी सुसंस्कृतपणा दाखवला, पण धनंजय मुंडेंनी...; सरपंच हत्याप्रकरणात सुप्रिया सुळेंची मोठी मागणी
Abu Azmi: औरंगजेबाचे गोडवे गाणाऱ्या अबू आझमींचं आयुष्य संकटात, म्हणाले, 'माझ्या जीवाचं बरंवाईट झालं तर....'
औरंगजेबाचे गोडवे गाणाऱ्या अबू आझमींचं आयुष्य संकटात, म्हणाले, 'माझ्या जीवाचं बरंवाईट झालं तर....'
Aaditya Thackeray : पण, शिवाजी महाराजांचा अपमान केला त्या कोरटकर आणि सोलापूरकरची पाठराखण सरकारला करायची होती; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
पण, शिवाजी महाराजांचा अपमान केला त्या कोरटकर आणि सोलापूरकरची पाठराखण सरकारला करायची होती; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
बीड जिल्ह्यात आभाळातून कोसळले 2 दगड; अंतराळ विज्ञान केंद्राचे अभ्यासक पोहोचले गावात
बीड जिल्ह्यात आभाळातून कोसळले 2 दगड; अंतराळ विज्ञान केंद्राचे अभ्यासक पोहोचले गावात
होळी दहन कोणी पाहू नये?
होळी दहन कोणी पाहू नये?
शिफारशीने मिळालेला आयोग कार्पोरेट पार्ट्यापुरता, भुरट्याताईसुद्धा चकार शब्द काढत नाहीत; सुषमा अंधारेंचा संताप
शिफारशीने मिळालेला आयोग कार्पोरेट पार्ट्यापुरता, भुरट्याताईसुद्धा चकार शब्द काढत नाहीत; सुषमा अंधारेंचा संताप
Embed widget