Baramati Crime : हट्टामुळे जीव दिला! आईने नवीन मोबाईल घेऊन न दिल्याने नववीतील मुलाने आयुष्य संपवलं
आईने नवीन मोबाईल घेऊन न दिल्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक घडला घडली आहे. पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यातील कऱ्हावागज गावात ही घटना घडली आहे.
Baramati Crime : आईने नवीन मोबाईल घेऊन न दिल्याने अल्पवयीन मुलाने गळफास घेऊन आत्महत्या (Pune crime) केल्याची धक्कादायक घडला घडली आहे. पुणे (Pune) जिल्ह्यातील बारामती तालुक्यातील कऱ्हावागज गावात ही घटना घडली आहे. शुभम मोतीराम धोत्रे असे या आत्महत्या (Suicide) केलेल्या मुलाचे नाव आहे. तो अंजनगाव येथील सोमेश्वर विद्यालयात इयत्ता नववीमध्ये शिक्षण घेत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शुभमचे वडील हयात नाहीत आणि त्याची आई मोलमजुरी करुन उदरनिर्वाह करते. शुभम गेल्या काही दिवसांपासून आईकडे नवीन मोबाईल घेण्यासाठी हट्ट करत होता. मात्र परिस्थितीमुळे मुलाच्या मोबाईल फोनची किंमत परवडणारी नसल्याने त्याची आई त्याला मोबाईल घेऊन देऊ शकत नव्हती. त्यामुळे अनेकदा दोघांमध्ये थोड्या प्रमाणात वाद झाला होता. मात्र याच कारणामुळे शुभम निराश झाला आणि त्याने गळफास घेत स्वत:चं आयुष्य संपवलं.
हट्ट न पुरवल्याने निराश
आईने मोबाईलचा हट्ट पुरवला नाही त्यामुळे शुभम निराश झाला होता. त्यातून त्याने टोकाचं पाऊल उचललं. या सगळ्या धक्कादायक घटनेची माहिती मिळताच माळेगाव पोलिसांनी घटनास्थळाला भेट देत पंचनामा केला. शुभमचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून अधिक तपास माळेगाव पोलीस करत आहेत. त्याच्या अचानक जाण्याने आई एकटी पडली आहे आणि धोत्रे कुटुंबियांवर दुख:चा डोंगर पसरला आहे.
अल्पवयीन आणि तरुणांच्या आत्महत्येत वाढ
अल्पवयीन आणि तरुणांच्या आत्महत्येत वाढ झाल्याचं चित्र आहे. काही दिवसांपूर्वीच पुण्याच्या तळेगाव येथे सीआरपीएफ वायरलेस विभागातील जवानाने गळफास घेऊन आत्महत्या केली होती. अमरेशकुमार गिरी असं आत्महत्या केलेल्या जवानाच नाव होतं. अमरेश हे नुकतेच सुट्टीवरुन आले होते. वायरलेस विभागाच्या स्टोअर रुममध्ये जाऊन त्यांनी केबलच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. मृत हा मूळचा उत्तर प्रदेशातील मिर्झापूर जिल्ह्यातील होता, असं पिंपरी चिंचवड हद्दीतील तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्याच्या अधिकार्यांनी सांगितलं होतं. गिरी हे पुणे शहरापासून सुमारे 30 किलोमीटर अंतरावर असलेल्या सीआरपीएफ कॅम्पसच्या वायरलेस कम्युनिकेशन युनिटमध्ये तैनात होते.
मरण स्वस्त झालंय का?
राज्यात रोज अनेक आत्महत्येच्या घटना घडतात. फार क्षृल्लक कारणामुळे आत्महत्या केल्याचं अनेकदा समोर येत. ताणतणावातून, प्रेम संबंधातून, हट्टामुळे, कर्जामुळे अशा काही कारणामुळे आत्महत्या केल्याच्या घटना सातत्याने घडतात. सातत्याने होत असलेल्या या आत्महत्याच्या प्रकरणामुळे अनेक कुटुंबियांमध्ये तणावाचं वातावरण निर्माण होतं. त्यामुळेच मरण स्वस्त झालं आहे का?, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
इतर महत्वाच्या बातम्या