एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Pune : दुर्दैवी! शौचालयाची टाकी साफ करताना पडून चार तरुणांचा मृत्यू, पुण्यातील घटना
Pune News Updates : शौचालयाची टाकी साफ करताना चार तरुण टाकीत पडले. यात चौघांचाही मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. पुण्यातील लोणी काळभोर परिसरातील हॉटेल प्यासा जवळ ही घटना घडली आहे.
![Pune : दुर्दैवी! शौचालयाची टाकी साफ करताना पडून चार तरुणांचा मृत्यू, पुण्यातील घटना Maharashtra News Three youths died while cleaning toilet tank in Pune Updates Pune : दुर्दैवी! शौचालयाची टाकी साफ करताना पडून चार तरुणांचा मृत्यू, पुण्यातील घटना](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/03/02/978db2f4b854a2ea7545f9f1d797020d_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Pune News Updates
Pune News Updates : पुण्यात एक दुर्दैवी घटना घडली आहे. शौचालयाची टाकी साफ करताना चार तरुण टाकीत पडले. या घटनेत चौघांचाही मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. पुण्यातील लोणी काळभोर परिसरातील हॉटेल प्यासा जवळ ही घटना घडली आहे. घटनेची माहिती कळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
लोणी काळभोर कदमवाकवस्ती ग्रामपंचायत हद्दीतील लोणी स्टेशन परिसरातील प्यासा हॉटेलच्या पाठीमागे एका इमारतीच्या शौचालयाची टाकी साफ करताना टाकीत पडून चौघांचा मृत्यू झाल्याची ही दुर्दैवी घडली आहे. ही घटना सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेमुळे लोणी काळभोरसह कदमवाकवस्ती परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
कदमवाक वस्ती ग्रामपंचायत हद्दीतील प्यासा हॉटेलच्या पाठीमागे राजेंद्र जयसिंग काळभोर यांची जय मल्हार कृपा नावाची बिल्डिंग आहे. त्या बिल्डिंगच्या शौचालयाची टाकी साफ करण्याचे काम सुरु होते. टाकी साफ करताना त्यांच्यापैकी एक जण टाकीत पाईप टाकताना तोल जावून टाकीत पडला. सदर पडलेल्या व्यक्तीला वाचवण्यासाठी गेलेल्या व्यक्ती पण या टाकीत पडल्या. यावेळी टाकीत पडलेल्या दोघांना वाचविताना वरील दोघेही टाकीत पडले आणि यामध्येच या चौघांचाही मूत्यू झाला.
या घटनेची माहिती मिळताच लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस घटनास्थळी दाखल झाले. अग्निशामक दलाचे देखील जवान या ठिकाणी पोहोचले आणि मृतदेह शौचालयाच्या टाकीच्या बाहेर काढले.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- Sanjay Raut Press Confarnce : बाप-बेटे जेलमध्ये जाणारच, संजय राऊतांचा सोमय्यांवर हल्लाबोल
- Disha Salian Case : राणे पिता-पुत्र हाजीर हो; दिशा सालियन प्रकरणी मालवणी पोलिसांची नोटीस
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह | ABP Majha
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नाशिक
क्रिकेट
राजकारण
निवडणूक
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)